इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 13 – दक्षिण अमेरिका
अभ्यास
दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1) दक्षिण अमेरिका खंडातील लोकांना रेड इंडियन्स असे का म्हणतात ?
उत्तर – 1498 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस दक्षिण अमेरिकेच्या भूखंडावर येऊन पोहोचला आणि त्याने त्याला भारत असे म्हटले.तेथील गोऱ्या रंगाच्या स्थानिक लोकांना रेड इंडियन्स असे म्हटले.त्यामुळे दक्षिण अमेरिका खंडातील लोकांना रेड इंडियन्स असे म्हणतात.
2) दक्षिण अमेरिकेचे स्थान आणि विस्तार सांगा.
उत्तर – दक्षिण अमेरिका खंड पश्चिम गोलार्धात आहे.उत्तरेकडे पनामा कालव्यामुळे हा खंड उत्तर अमेरिका खंडापासून वेगळा झाला आहे.12° उत्तर अक्षांशापासून 56° दक्षिण अक्षांशापर्यंत तसेच 35° पश्चिम रेखांशापासून ते 81° पश्चिम रेखांशापर्यंत याचा विस्तार आहे.
3) दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा व लहान देश कोणता ?
उत्तर – दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हा सर्वात मोठा तर फ्रेंच गयाना हा सर्वात लहान देश होय.
4) दक्षिण अमेरिकेत आढळणारा जगातील सर्वात उंच धबधबा कोणता तो कोणत्या नदीमुळे तयार झाला आहे?
उत्तर – ‘एंजल धबधबा’ (974 मी.) हा दक्षिण अमेरिकेत आढळणारा जगातील सर्वात उंच धबधबा असून तो ओरीनोको नदीची उपनदी चोरन नदीमुळे तयार झाला आहे.
5) दक्षिण अमेरिकेतील प्रमुख गवताळ प्रदेश कोणते ?
उत्तर – लानोस,पंपास आणि कंपोस हे दक्षिण अमेरिकेतील प्रमुख गवताळ प्रदेश होय.
6) दक्षिण अमेरिकेतील प्रमुख वनस्पती आणि प्राण्यांची नावे सांगा.
उत्तर – दक्षिण अमेरिकेतील प्रमुख वनस्पती आणि प्राण्यांची नावे खालीलप्रमाणे –
वनस्पती -महोगनी, एबोनी , कॉफी, ऊस इ.
प्राणी – लामा, जाग्वार , गिधाड, अॅनाकोंडा , प्युमा , कासव इ.
7) दक्षिण अमेरिकेतील दाट लोकवस्ती असणाऱ्या प्रमुख शहरांची नावे सांगा.
उत्तर – ब्योनस ऐरीश, रिओ-डी जानिरो, सावो, पालो इत्यादी दक्षिण अमेरिकेतील दाट लोकवस्ती असणाऱ्या प्रमुख शहरांची नावे आहेत.