6th SS 7.Democracy प्रकरण 7.लोकशाही

  

6th SS 7.Democracy प्रकरण 7.लोकशाही

 

 

  इयत्ता – सहावी

 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2023 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 7 – लोकशाही अभ्यास

 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. लोकशाही म्हणजे काय ?
उत्तर – लोकांनी आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे चालणारी राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही.

2. लोकशाहीचे महत्व सांगा.
उत्तर – लोकशाही ही एक लोकप्रिय राजकीय व्यवस्था आहे.खालील काही उत्तम अंश लोकशाहीचे महत्त्व सांगतात.
सरकार हे प्रजेच्या प्रतिनिधींचेच असते.
येथे सर्वांना समान संधी असते.
नियमितपणे निवडणूका होऊन,लोकप्रतिनिधीच अधिकार ग्रहण करतात.
येथे विविध विषयांवर चर्चा होऊन जनहितावर आधारीत निर्णय घेतले जातात.
लोकशाहीत लोक विवेकबुध्दीने निर्णय घेणे आवश्यक असते.

3. भारतामध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांना किती वर्षे पूर्ण असावीत ?
उत्तर –  भारतामध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांना 18 वर्षे पूर्ण असावीत.

4. मतदानाचे महत्व काय ?
उत्तर – मतदानामुळे नागरिकांना त्यांचे अभिप्राय सांगण्यास सहाय्य होते.हे सर्व वर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून देते.
 

 

  

 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *