इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 4 – नवीन धर्मांचा उदय
अभ्यास
I योग्य शब्दांचा वापर करून रिकाम्या जागा भरा.
1) गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी येथे झाला.
2) बुद्धानी आपला उपदेश पाली या भाषेत सांगितला.
3) जीन म्हणजे मोहावर विजय मिळविलेला होय.
4)पार्श्वनाथ हे जैन धमाचे 23 वे तीर्थंकर होय.
5) जैन धर्मात पांढरे वस्त्र परिधान करणारे हे श्वेतांबर पंथाचे होय.
II खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1) गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर –गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील कपिलवस्तु जवळील लुंबिनी येथे झाला.
2) गौतम बुद्धाच्या आई-वडिलांचे नाव काय?
उत्तर –गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव सिध्दोदन आणि आईचे नाव मायादेवी होते.
3) गौतम बुद्धानी आपला पहिला उपदेश कोठे केला ?
उत्तर –बुद्धांनी आपला पहिला उपदेश सध्याच्या उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील सारानाथ येथे दिला.
4) धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय ?
उत्तर –बुद्धांनी सध्याच्या उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील सारनाथ येथे पहिला उपदेश दिलेली घटना म्हणजे ‘धर्मचक्र प्रवर्तन’ होय.
5) महावीरांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर –महावीरांचा जन्म वैशाली शहराजवळील कुंडग्राम येथे झाला.
6) महावीरांच्या आई वडिलांचे नाव काय?
उत्तर –महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशलादेवी होते.
7) महावीरांची शिकवण कोणती ?
उत्तर –महावीरांनी अहिंसा,चोरी न करणे,ब्रम्हचर्य आणि गरजेपेक्षा अधिक संग्रह न करण्याचा उपदेश केला.
8) जैन धर्माचे दोन पंथ कोणते ?
उत्तर –जैन धर्माचे पंथ दिगंबर आणि श्वेतांबर आहेत.
9) प्राचीन भारतातील प्रमुख गणराज्ये कोणती ?
उत्तर –वज्जी,पांचाल,काशी,कोसल,मगध,वस्तू,कुरु,आवंती इत्यादी प्राचीन भारतातील प्रमुख गणराज्ये होती.
III गटात चर्चा करून उत्तरे लिहा.
गौतम बुद्धांची शिकवण कोणती?
उत्तर – गौतम बुद्धांच्या शिकवणीत महापरित्याग, ज्ञानोदय, धर्मचक्र प्रवर्तन व महानिर्वाण हे चार घटक महत्वाचे होत. बुद्धाची मूळ शिकवण म्हणजे चार आर्य सत्य व अष्टांगमार्ग होय.
चार आर्य सत्य पुढील प्रमाणे आहेत.
1) जग हे दुःखमय आहे
2) आशा हेच दुःखाचे मुळ आहे,
3) आशेवर विजय मिळवून दुःखातून पार होऊ शकतो.
4) अष्टांग मार्ग हा दुःख दूर करण्याचा मार्ग आहे.
आशेवर जे विजय मिळवतील त्यांना मोक्षप्राप्ती होईल.दु:ख निवारणासाठी त्यांनी अष्टांगमार्ग सुचविले.
IV खालील अ यादी ब यादीतील विषयांच्या जोड्या जुळवा.
अ ब
1. गौतम बुद्ध अ)बुद्धांचे प्रवित्र ग्रंथ
2. महावीर ब) जैनांचे धार्मिक केंद्र
3. श्रवणबेळगोळ क)बौद्ध धर्माचे संस्थापक
4.त्रिपिटक ड)जैन धर्माचे संस्थापक
उत्तर –
1. गौतम बुद्ध – क) बौद्ध धर्माचे संस्थापक
2. महावीर – ड) जैन धर्माचे संस्थापक
3. श्रावणबेळगोळ – ब) जैन धर्माचे धार्मिक केंद्र
4. त्रिपिटक – अ) बुद्धांचे प्रवित्र ग्रंथ
2023-24 सालात बदललेला पाठ इंग्रजीमध्ये
संदर्भासाठी बदललेला पाठ मराठीमध्ये
⭕⭕ बेंगळुरू विभाग⭕⭕
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-11-bengaluru.html
⭕⭕म्हैसूरु विभाग⭕⭕
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-12-mysuru.html
⭕⭕ कलबुरगी विभाग⭕⭕
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-13-kalaburagi.html
1. भारत -आमचा अभिमान
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-1india-is-our.html
➖➖➖➖➖➖
शेअर करा