Secrets of Yogasanas: History, Poses, and Profound Benefits of Yoga
योगासन – इतिहास,अर्थ,आसने
आपल्या शरीरामध्ये आळस व तामसीवृत्ती असते. मन राजस व आत्मा स्वत्व गुणांनी भरलेला असतो. म्हणजेच तामसी गुणाचे शरीर व राजस शरीर व गुणांचे मन सत्विक होऊन आत्म्याच्या पातळीत आणणे आणि शरीर व मनाचे संयोजन करणे म्हणजेच योगासन होय. कारण मनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
योगाचा इतिहास (Yoga History)
प्राचीन काळात, योगाचे सिद्धांत, तंत्र, आणि योगाचे प्रकार प्रचलित होते. महर्षी पतंजली यांचे ‘योग सूत्र’ या ग्रंथामध्ये योगाचे महत्व आणि योगाच्या अष्टांगमार्गाचे वर्णन केले आहे.योग सूत्रांचे अध्ययन,प्रारंभिक योगाच्या अभ्यासाचे मूळ कारण म्हणून मानले जाते.
पतंजली योग, अष्टांग योग किंवा राजयोग म्हणून ओळखला जातो. योग ही भारतीय प्राचीन कला आहे. हरप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृतीच्या काळातील मिळालेल्या पुराव्यावरून त्यावेळी लोकांच्या जीवनाचे योग हे अविभाज्य अंग होते असे समजून आले आहे.
रामायण, महाभारत, उपनिषदे तसेच अनेक ग्रंथांमधून योगांचा उल्लेख आढळतो. पतंजली मुनीनी ख्रि. पू. 2 या शतकात “योगसूत्र” नावाचा ग्रंथ सर्वसामान्य लोकांना अर्थबोध होईल अशा सोप्या शब्दात लिहिला आहे.या पुस्तकामध्ये योगासनांची संपूर्ण माहिती दिली आहे.त्यामुळे हे पुस्तक
संपूर्ण जगासाठी उपकारकच ठरले आहे.त्यामुळे त्यांना योग पितामह म्हणून ओळखले जाते.योग सूत्रामध्ये एकूण 195 सूत्रे आहेत.
योग-अर्थ:
“योग” हा शब्द “युज” या संस्कृत पदापासून आला आहे. युज म्हणजे मिळविणे, एकत्रित करणे, संयोजन करणे. साधारणपणे शरीर व मन एकत्रित करण्याची कला म्हणजे योग असे म्हटले जाते. पण याचा खरा अर्थ पाहिल्यास आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजेच योग होय.योगामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक एकाग्रता वाढविता येत असल्याने विद्यार्थी जीवनात योग खूप सहाय्यकारी ठरतात.
योगांचे प्रमुख चार घटक खालील प्रमाणे
1) कर्मयोग 3)ज्ञानयोग
2) भक्तियोग 4) राजयोग
1) कर्मयोग ‘
काम हीच पूजा’ असे बसवेश्वरानी सांगितले आहे. माणसाने केलेल्या 7 कोणत्याही कामाचे कांही ना कांही फळ असतेच पण फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने कार्यरत झाल्यास मनाची शांती मिळते. हाच कर्म योगाचा सिद्धांत होय…
2) भक्तियोग
हा योग भक्तिप्रधान असून, यामुळे मनामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक भावनांना उदात्त स्वरूप मिळते. मनःशांती, समाधानकारक स्थिती येते. यात संपूर्ण शरणागतीची भावना हीच भक्ती असल्याचे लक्षण होय.
3) ज्ञानयोग
हा योग सत्य, सृष्टीचा रचना त्यामागे असणारी विश्वशक्ती, विश्वशक्ती यातील संबंध या सारखे सैद्धांतिक विषय समजावून घेण्यास मदत करतो. मनुष्य व
4) राजयोग
राजयोग हा अंतरंग व बहिरंग स्थितीची कसोटी पाहण्याचा मार्ग राजयोग हाच अष्टांग योग आहे.अशी व्याख्या केलेली आहे.
योगाचे ध्येय व उद्देश :
1) स्वस्थ शरीराबरोबरच मानसिक शक्तिचा विकास करणे.
2) स्नायू, रक्तवाहिन्या व पाठीचा कणा यांची स्थिती आरोग्यपूर्ण बनविणे.
3) दीर्घायुष्य मिळविणे.
4) मानसिक एकाग्रता व भावनात्मक संयम यांची अभिवृद्धी करणे.
योग दिवस सूत्रसंचालन,माहिती व घोषवाक्ये