विषय : SATS पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित(Verify) करणेबाबत…
SATS मध्ये आधार verification कार्य पूर्ण करण्यासंबंधी मा. आयुक्त धारवाड यांचे निर्देश.. |
आधार कायदा,2016 च्या कलम 7 नुसार,सरकारी सुविधा मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Verification) अनिवार्य आहे.त्यामुळे,सर्व सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी संलग्न मार्गदर्शक तत्त्वांनुसार SATS सॉफ्टवेअरमधील माहितीसह आधार प्रमाणे विद्यार्थ्याच्या नावाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
विविध विभागांच्या (मागासवर्गीय कल्याण विभाग,अल्पसंख्याक कल्याण विभाग आणि कामगार कल्याण विभाग) योजना अंतर्गत राज्य शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती वितरित केली जात आहे.पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी, विविध प्रवेश परीक्षांच्या उपस्थितीसाठी आणि इतर सरकारी (DBT) सेवा आणि लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आणि आधारप्रमाणेच विद्यार्थ्याचे नाव SATS सॉफ्टवेअरमध्ये असणे आवश्यक आहे.
सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे 2022-23 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा TC ISUUE करताना जर विद्यार्थ्याचे SATS मधील व आधार कार्डवरील नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. व SATS मध्ये त्याचे आधार verification मध्ये Name Matching 100% असेल तरच 2023-24 मध्ये विद्यार्थ्याचा TC ISUUE होईल अन्यथा होणार नाही.
जर एखाद्या विद्यार्थ्याचे SATS नाव व आधार वरील नाव Match झाले नसल्यास Kindly validate Aadhar until 100% name match असं रीमार्क येत आहे.
TC ISSUE PAGE SATS |
वरील बाबी आणि संदर्भाच्या संदर्भात, मुलांचे आधार पडताळणी करणे सर्वात महत्वाचे कार्य असल्याने सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित निवासी शाळा आणि इतर सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शिक्ताषकांनी केंद्र स्थान न सोडता तातडीने हे कार्य पूर्ण करावे असा आदेश मा क्षेत्र शिक्षणाधिकारी चिक्कोडी यांनी दिला आहे.
तरी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व पालकांनी सदर कार्य पूर्ण करून सहकार्य करावे.