सेतुबंध पूर्व परीक्षा
नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – दुसरी
विषय – मराठी
प्र. 1 रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा.
1. बस … ( ई, म, व)
2. …. रत (व, भा , हा)
3. अ… नाश (मी, वि , सि)
प्र. 2 गटात न जुळणारे अक्षर बरोबर करून लिहा.
1. कु , म , सु , पु
2. ड , नी , व , ची
3. डे , ये , बे , द
प्र. 3 खालील शब्द स्पष्ट वाचा.
1. मनिषा
2. पैसे
3. मोगरा
4. गुलाब
प्र. 4 दिलेल्या शब्दाचे अनुलेखन करा.
1. विशाल
2. मसाज
3. गंमत्त
4. विराट
प्र. 5 खालील अक्षरांनी सुरुवात होणारे शब्द तयार करा.
1. चि
2. स
3. का
प्र. 6 खालील वाक्ये वाचा.
1. नमन वाचन कर.
2. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.
3.अक्षर गिरवा,अज्ञान घालवा.
प्र.7. अंगणातले दाणे टिपत कोण? हे गीत हावभाव व
अभिनय करीत म्हणा.
प्र.8. खालील प्रश्नांची होय/नाही असे उत्तरे द्या.
1. तुझ्या गावात दवाखाना
आहे का?
2. तुझ्या गावात बस स्थानक आहे का?
3. तुझ्या गावात ग्रंथालय आहे का?
प्र. 9.खालील वाक्ये जशी आहेत तशी लिहा.
1.ज्ञानी जनता,भूषण भारता.
2. साखर घालून श्रीखंड केले.
3. झेंडा फडकला,वंदन करा.
प्र. 10. रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून वर्णमाला पूर्ण
करा.
अ …. , इ …… , उ , ऊ, …….. , ऐ , ओ , …….. , ……….. , अ: , ……… , लृ