मराठी भाषा दिवस
जागतिक मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिन
मराठी भाषा गौरव दिन
हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही समस्त मराठीजनाची मागणी आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन मार्गदर्शक श्री.आशिष देशपांडे (सर) यांची निर्मिती असलेली भाषणे,माहिती,सूत्रसंचालन नक्की उपयुक्त ठरतील…