दि. 11.01.2023 रोजीच्या आदेशानुसार 2022-23 या वर्षातील सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तसेच प्राथमिक शाळा शिक्षक आणि माध्यमिक शाळा सहाय्यक शिक्षक,समान श्रेणी शिक्षक वृंद तसेच सरकारी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व इतर अधिकारी यांची सामान्य बदली प्रक्रिया सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे…
कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदली नियमन] अधिनियम-2020 [कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04] आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 नुसार, बदलीचे वेळापत्रक आधीच प्रकाशित करण्यात आले होते.परंतु बदली कायदा आणि 2020 च्या नियमांमधील पैलूंमध्ये सुधारणा करून आणि संदर्भ-11 नुसार बदली कायद्याच्या नियमांमध्ये सुधारणा करून, शिक्षक अनुकूल बदली अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने 2022 मध्ये सुधारणा कायदा आणण्यात आला आहे.पार्श्वभूमीवर, सार्वजनिक शिक्षण विभागाच्या सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांसह प्राथमिक शाळा शिक्षक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षक/समान श्रेणी शिक्षक आणि सरकारी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक/समान श्रेणी अधिकारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांसह वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.
*सर्व बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल..Weighted Score प्रकाशित करणे, आक्षेप नोंदवणे, बदली अर्ज सादर करणे,अर्ज/प्राधान्य क्रम परिशीलन,अर्ज स्वीकारणे,नाकारणे, तात्कालिक पात्र / अपात्र यादी प्रकाशित करणे,आक्षेप नोंदवणे,अंतिम यादी, अंतिम यादीनुसार Counselling प्रक्रिया शिक्षण विभागाच्या पोर्टलमध्ये करणे..अशा पद्धतीने ही बदली प्रक्रिया असून ही प्रक्रिया पार पडण्यासाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल..
अतिरिक्त शिक्षक पुनर्नियोजन प्रक्रिया व वेळापत्रक
कर्नाटक राज्य नागरी सेवेच्या शिक्षक बदली कायदा-2020 च्या कलम 10(1) अंतर्गत,खालील प्रकरणांशी संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडून साक्षांकित प्रमाणपत्र सादर केल्यावर अतिरिक्त बदली प्रक्रियेतून सूट दिली जाईल.
1) पती/पत्नी/मुलांना जीवघेणा आजार असल्यास
2)पती/पत्नी/मुले यापैकी कोणास 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यास
3.)12 वर्षांखालील आश्रित मुलांसह विधवा/विधुर/घटस्फोटित शिक्षक/शिक्षिका
4) पती/पत्नी संरक्षण दलात असल्यास
5) केंद्र सरकार/राज्य सरकार/अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांचे विवाहित प्रकरण (पती/पत्नी कार्य करत असलेल्या तालुक्यामध्ये नियुक्ती)
6) महिला शिक्षकांच्या बाबतीत ज्यांची वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.पुरुष शिक्षकांच्या बाबतीत 55 वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्यांसाठी
7) गर्भवती शिक्षिका किंवा 1 वर्षाखालील मुलासह महिला शिक्षिका
वर वर्णन केलेल्या सवलतीवर दावा करण्यासाठी शिक्षक बदली नियम-2020 च्या नियम 10(2) मध्ये सवलत किंवा प्राधान्यासाठी सादर सक्षम अधिकार् यांनी साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांची यादी खालीलप्रमाणे-
1) पती/पत्नी/मुलांना जीवघेणा आजार असल्यास – जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण पत्र
2)पती/पत्नी/मुले यापैकी कोणास 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यास – केंद्र किंवा राज्य सरकारकडून दिली जाणारी UDID (Unique Disabilty ID)
3)12 वर्षांखालील आश्रित मुलांसह विधवा/विधुर/घटस्फोटित शिक्षक/शिक्षिका – जोडीदाराचा मृत्यू दाखला किंवा पुनर्विवाह बद्दल दंडाधिकारी यांचेकडून Affidavit
4)पती/पत्नी संरक्षण दलात असल्यास – Commanding Officer अथवा Director सैनिक कल्याण मंडळ यांचेकडून प्रमाणपत्र
5) केंद्र सरकार/राज्य सरकार/अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांचे विवाहित प्रकरण (पती/पत्नी कार्य करत असलेल्या तालुक्यामध्ये नियुक्ती) –नियुक्ती प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र
6) महिला शिक्षकांच्या बाबतीत ज्यांची वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. – सेवा पुस्तकाप्रमाणे DDO यांचेकडून मिळणारे प्रमाणपत्र.
7) पुरुष शिक्षकांच्या बाबतीत 55 वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्यांसाठी- सेवा पुस्तकाप्रमाणे DDO यांचेकडून मिळणारे प्रमाणपत्र.
8) गर्भवती शिक्षिका – जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण पत्र
9) मुलांसह घटस्फोटित शिक्षिका –कोर्ट डिक्री आणि आश्रित मुलाबाबत दंडाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्र आणि पुनर्विवाह नाही.जर मुस्लिम असल्यास मशीद समितीने दिलेले उपनाव,तलाक-नामा किंवा तलाक-ए-मुबारत आणि आश्रित मूल आणि पुनर्विवाह न करण्याबाबत मॅजिस्ट्रेटचे प्रतिज्ञापत्र…
सदर बदली प्रक्रियेचे शिक्षक पुनर्नियोजन प्रक्रिया वेळापत्रक खालीलप्रमाणे….
| बदली | प्राथमिक | माध्यमिक |
A | अतिरिक्त शिक्षक तात्कालिक यादी | 11.01.23 | 11.01.23 |
B | तात्कालिक यादीबद्दल क्षेत्र शिक्षणाधिकारी यांचेकडे आक्षेप नोंदविणे | 11.01.23 ते 13.01.23 | 11.01.23 ते 13.01.23 |
C | BEO लॉगीनमध्ये आक्षेपांचे परिशीलन | 12.01.23 ते 16.01.23 | 12.01.23 ते 16.01.23 |
D | अतिरक्त शिक्षक सवलत नाकारलेल्या शिक्षकांनी शंका समाधानासाठी अधिकाऱ्यांना भेटणे | 16.01.23 ते 17.01.23 | 16.01.23 ते 17.01.23 |
E | सवलत नाकारलेल्या शिक्षकांनी सादर केलेल्या आक्षेपांचे परिशीलन | 18.01.23 | 18.01.23 |
F | अंतिम अतिरिक्त शिक्षकांची ज्येष्ठता यादी व रिक्त जागा प्रकाशीत करणे. | 23.01.23 | 23.01.23 |
G | अतिरिक्त शिक्षक समर्पक पुनर्नियोजन कौन्सलिंग (BLOCK LEVEL) सकाळ सत्र अतिरिक्त शिक्षक समर्पक पुनर्नियोजन कौन्सलिंग (DIST LEVEL) दुपार सत्र | 24.01.23
24.01.23 | 25.01.23 |
H. वरील जिल्हा कौंसलिंग