कलिका चेतरिके
इयत्ता- पाचवी
विषय -मराठी
अध्ययन कृती क्र. 10:7
सुंदर निसर्गात भर घालायला आपण झाडे लावली, त्याला पाणी घातलं, तर रोज ते वाढताना पाहायला किती आनंद होईल! झाडावर कळी आलेली कधी फुलते म्हणून वाट पाहता पाहता फुलं आली की आनंदाला पारावारच राहणार नाही.
1) श्यामच्या आईने श्यामला कोणती गोष्ट सांगितली?
उत्तर – श्यामच्या आईने श्यामला चिंधीची गोष्ट सांगितली.
उत्तर – कृष्णाचं कापलेला ते बोट बघून द्रौपदीने भरजरी शालू फाडला व बोटाला चिंधी बांधली.
उत्तर – नदीचे पाणी खळखळ वाहते.
उत्तर –आकाशाकडे पाखरांची सर निघाली.
1) पाठ क्रमांक 19 तेनाली रामाचे चातुर्य हा पाठ घेणे. घटना क्रमवार लिहा.
1. महाराज एक बर्फाचा तुकडा मला द्यावा.
2.विहिरीचे पाणी आटले तलाव कोरडे पडले:
3. महाराजांच्या हातात बर्फ वाटीचा होऊन मिळाला.
4. दुसऱ्याच वर्षी निसर्गाच्या कृपेने पाऊस चांगला झाला.
उत्तर –
2) बाहेरून आल्यावर आपण हात पाय धुतो का बरे? बाहेर आपण जरी चप्पल बूट घालून गेलो तरी बाहेर मातीमध्ये रस्त्यावर असंख्य जीवजंतू असतात. ते रोगराई पसरवत असतात.पायात बूट चप्पल असले तरी ते आपल्याला चिकटतात. ते इतके सूक्ष्म असतात की अंगावर हाता-पायावर आहेत हे कळत सुद्धा नाही. तसेच रस्त्यावर लोक थुंकतात, प्रातः वीधी करतात. यातूनही निरनिराळे आजार होण्याचा संभव असतो. आपले आरोग्य आपणच राखण्यासाठी, बाहेर रोगजंतू ठेवण्यासाठी, बाहेरून आल्यावर हात पाय धुवावेत. जे लोक सतत पेशंट जवळ, कारखान्यांत सूक्ष्म जिवाणू बरोबर काम करतात, ते रात्री कामावरून घरी आल्यावर आंघोळ पण करतात. याचे हेच कारण आहे.
याच कारणासाठी आपण चपला-बूट सुद्धा घराच्या बाहेर काढतो यापासून जंतूंचा प्रादुर्भाव घरात होऊ नये हाच उद्देश असतो.
घटना क्रमवार लिहा.
1) जंतूंचा प्रादुर्भाव घरात होऊ नये हाच उद्देश असतो.
2) निरनिराळे आजार होण्याचा संभव असतो.
(3) रात्री कामावरून घरी आल्यावर आंघोळ पण करतात.
4) रोगजंतू बाहेर ठेवण्यासाठी बाहेरून आल्यावर हात पाय धुवावेत.
5) बाहेर मातीमध्ये रस्त्यावर असंख्य जीवजंतू असतात.
अध्ययन कृती-10:8
सुगी:
रानातल्या बोरीला वाजून आली थंडी
काट्यातून लगडली बोरे सात खंडी
वळणावरचे झाड तर कापू लागले
खट्टे मीठे पेरू जागोजागी लावले
पानातले पोपट गाऊ लागले गाणे। रानातल्या बोरीला
ओलीचिंब झाली हरभऱ्याची राणी
चिंचेचे हातपाय काकडून आले वाकडे
जाळीतून डोकाबले कांबळे आकडे ॥ रानातल्या बोरीला
‘थंडी आली पेटवा शेकोटी हात गार
शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार
रानातल्या बोरीला वाजून आली थंडी :
काट्यातून लगडली बोरे सात खंडी। रानातल्या बोरीला
कृती : या कवितेतील लयबद्ध शब्द लिहा.
उत्तर – थंडी – खंडी
लागले – लावले
गार – चार
चिमणी
हा बघ आणलाय मोत्याचा दाणा
बघू बघू आहा छान आहे पण
ठेवायचा कोठे ? ठेवायचा कुठे?
त्यात काय मोठे बांधूया घरटे
झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर
चला चला लवकर काम करू बरोबर
मी आणते कापूस मी आणते काड्या
मी आणते गवत मी आणते दोरा
आत मध्ये छान दार कापूस मऊ
कडेने गवत पसरून देऊ
गवताच्या कडेने काड्या ठेवू
सगळीकडून दोऱ्याने शिवू
आत मध्ये छानदार पिल्लांना ठेवू
पिल्ले काय करतील दाणा खातील
पाणी पितील गवताच्या उशीत
कापसाच्या गादीत चिमुकले पिल्ले राहतील खुशीत.
A. गमतीदार चुटूकुला
शिक्षक:
बंड्या: मासा हा जलचर प्राणी आहे.
शिक्षक: अशा चार जलचर प्राण्यांची नावे सांग.
बंड्या :
2. शिक्षक : पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील नाते कोणते ?
बंड्या: आई व मामा
शिक्षक : ते कसे काय?
बंड्या :
3. शिक्षक : बंडू तू वर्गात मुलींच्या बरोबर का बोलतोस? बंड्या : मला च्याटिंग परवडत नाही म्हणून….
शिक्षक : च्याटिंग म्हणजे काय?
वरील चुटूकुल्यांचे अनुलेखन कर.
B) कल्पना कर तू काय करणार,ते वाक्यात लिही.
1. कबुतर : कबुतर हा शांत स्वभावाचा व सुंदर पक्षी असल्याने त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीन.
2. ससा : ससा हा छोटा व गोंडस प्राणी आहे. रानात सापडणारे ससे पाळण्यास बंदी आहे.