5th EVS KALIKA CHETARIKE ANSWERS 11 5 वी परिसर अध्ययन अध्ययन निष्पत्ती 11

 कलिका चेतरिके 

इयत्ता- पाचवी 

विषय – परिसर अध्ययन 

भाग – 2 




 

Presentation1.




 

अध्ययन निष्पत्ती 11. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि बागायती शेती याबद्दल जाणून घेवून त्यातीत फरक ओळखणे. ठिबक सिंचन पद्धती आणि तुषार सिंचन पद्धती या दोन्ही पद्धती वापरून घेण्यात येणा
पिकांची यादी करतात

कृती 11.1: संवाद

सोमाप्पा : काय हो ? या गावामध्ये पाऊस अधिक पडतो काय? पहावे तिकडे हिरवेगार दिसत आहे. 

रंगण्णा: जास्त काही नाही मित्रा, साधारणच पाऊस पडतो. 

सोमाप्पा: मग कसे काय? एवढे जास्त पीके पिकवता ?

रंगण्णा 
: अरे मित्रा, आमची पावसावर आधारित शेती नाही. सर्व शेतकरी बागायत पद्धतीने शेती करतात. त्यासाठी पाणी. कालवे, विहीर, तलाव व नदी येथून उपलब्ध होते. त्यामुळे ऊस, भात, भाज्या फळे अशा प्रकारची पिके पिकवतो.

सोमाप्पा: बरं आमच्या गावी पाऊस फार कमी आहे. आमची शेती पुर्णतः पावसावर अवलंबून आहे.म्हणून या शेतीला कोरडवाहू शेती म्हणतो. त्यामुळे काळीमिरी, कापूस, देवदार, गहू व बाजरी है। पिके आम्ही पिकवतो. ठीक आहे रंगण्णा. उशीर झाला. आता मला गावी गेले पाहिजे. तुझ्याबरोबर बोलून खूप आनंद झाला, येतो. 


रंगण्णा:ठीक आहे मित्रा, चल पुन्हा भेटू…



 
वरील संवादाच्या आधारे खाली दिलेल्या पिकांचे पावसावर आधारित आणि सिंचनावर आधारित * पिकांचे वर्गीकरण करा.

(बाजरी, भात, जोंधळा, शेंग, गहू, मूग, मटकी, आंबा, चवळी, सोयाबीन, कापूस, आंबा, चिंच, ऊस, सुपारी, तूर, उडिद, हरबरा, नाचना इत्यादी )

पावसावर आधारित पिके

सिंचनावर आधारित
पिके

जोंधळा

शेंग

गहू

बाजरी

मूग

मटकी

चवळी

सोयाबीन

कापूस

चिंच

तुर

उडीद

हरभरा

भात

ऊस

सुपारी

आंबा




 

कृती 11.2 :- शेतकऱ्यांची मुलाखत
त्या दिवशी शनिवारी होसहळ्ळी गावातील सरकारी शाळेतील इयत्ता पाचवी चे विद्यार्थी खूप आनंदी होते. कारण ते होसहळ्ळी गावामधील प्रगतशील शेतकरी मंजण्णा यांना भेटायला गेले होते. त्यांना त्यांच्या शाळेच्या विज्ञान शिक्षिका वाणी मॅडम यांनी सिंचनाच्या विविध पद्धती बद्दल समजून घेवून येण्यास सांगितले होते. मंजण्णा यांची मुलगी कविता सुद्धा पाचवी इयत्तेत शिकत होती. सर्व विद्यार्थ्यांनी मंजण्णा यांना प्रश्न विचारले आणि सिंचनाच्या विविध पद्धती जाणून घेण्यास सुरुवात केली.

मुले : सिंचनाच्या पद्धती कोण कोणत्या आहेत ?

मंजण्णा : ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती. या सध्याच्या वैज्ञानिक सिंचन पद्धती आहेत. यापूर्वी विहिरीचे पाणी पाठ पध्दतीने देवून पिके घेतली जात असत. त्यामूळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. सध्या पाण्याचा योग्य आणि पूरे पूर उपयोग करण्यासाठी वरील पद्धती वापरल्या जातात.



 
मुले : ठिबक सिंचनाने वाढणारी पिके कोणती?

मंजण्णा:- नारळ, सुपारी, रेशीम, टोमॅटो, फळे, बीट, कोबी, फ्लावर,
पपई इत्यादी.

मुले : तुषार पद्धतीने वाढणारी पिके कोणती?

मंजण्णा: गाजर, शेंग, बाजरी, नाचना, जोंधळा, कापूस, हरभरा, कांदा इत्यादी. विद्यार्थ्यांनी मंजण्णाकडून शेती बद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या.मंजण्णाचे आभार मानले आणि आपापल्या घरी परतले. यादी करा (आवश्यकता
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पिकांची असल्यास शिक्षकांचे / पालकांचे / वर्ग मित्रांचे सहकार्य घ्या.)



 
%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AA..

ठिबक सिंचन पद्धतीने पिके
गहू कापूस मका सोयाबीन भुईमूग


%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AA
तुषार सिंचन पद्धतीने पिके
ज्वारी, मिरची कांदा सूर्यफूल, भुईमूग



 
सध्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पद्धत वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे का?
उत्तर – कारण ठिबक सिंचनाने पिकांच्या झाडांच्या मुळाशी नळीद्वारे थेंब थेंब पाणी दिले जाते यामुळे 30 ते 80 टक्के पाण्याची बचत होते जमिनीची धूप थांबते दर्जेदार पीक उत्पादन मिळते म्हणून सध्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पद्धत वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मूल्यमापन 11

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीतील दोन फरक लिहा.

ठिबक सिंचन

तुषार सिंचन

1.या पद्धतीने पिकांच्या मुळांना थेंबाथेंबाने पाणी पुरवले जाते


2. ठिबक सिंचन पद्धत खर्चिक आहे.

1.या पद्धतीत पावसाप्रमाणे पिकांच्या वर पाणी एकसारखे फवारले जाते.

2. तुषार सिंचन पद्धत कमी खर्चिक आहे




 



 

Share with your best friend :)