KALIKA CHETARIKE ANSWERS 8TH SCIENCE LEARNING SHEET 4 कलिका चेतरिके इ. 8 वी विज्ञान 10. ज्वलन आणि ज्वाला




इयत्ता – आठवी

विषय – विज्ञान 

कलिका चेतरिके

 




अध्ययन निष्पत्ती – 4:

अध्ययन पत्रक – 4
कृती 1 : खालील कृती करा आणि तुमचा निष्कर्ष सांगा.
पेटणाऱ्या मेणबत्तीच्या वरती काचेचा ग्लास उलटा
करुन ठेवा. काय होते ते पहा. तुमचा निष्कर्ष सांगा.

उत्तर – पेटणाऱ्या मेणबत्तीच्या वरती काचेचा ग्लास ठेवला तर तो विझेल कारण त्याला पेटण्यासाठी ऑक्सिजन मिळणार नाही.

ज्वलन क्रिया होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
कोणत्या
?
1.इंधन
2.
हवा
3.
उष्णता

अचानक आग लागल्यास /पेट घेतल्यास आग कशी विझवता
येईल
? विचार करून सल्ला
द्या.

आग लागली या ठिकाणी पाणी मारून तेथील उष्णता कमी करून
उष्णता कमी करता येते तिथल्या अनेक इंधन बाजूला करणे आग लागलेल्या ठिकाणी कार्बन
डाय-ऑक्साइड वायू फवारल्याने आग विझेल.




कृती 2: खालील
प्रयोग करा आणि तुमचा निष्कर्ष सांगा.

पायरी 1
एका बाटलीमध्ये 100ml व्हीनेगार घाला.
पायरी 2- एका
फुग्यामध्ये
50 ग्रॅम खाण्याचा सोडा
घाला.

पायरी 3- बाटलीच्या
तोंडाला फुगा बांधा व होणारे बदल पहा.

पायरी 4- हवा
भरलेल्या बाटलीचा फुगा पेटणाऱ्या मेणबत्तीजवळ सोडा.

 




 

पायरी 3 मधील फुगा कशामुळे उडाला?
व्हीनेगर व
खाण्याचा सोडा यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर तयार झाला
व यामुळे फुगा उडाला

फुग्याच्या आत असलेला वायू कोणता?
कार्बन डाय-ऑक्साइड


मेणबत्ती विझण्याचे कारण कोणते?
वायुमळे मेणबत्ती विझते.कारण तो वायू ज्वलनाला विरोध करतो.

तुमचा निष्कर्ष :
ऑक्सीजन हा वायू ज्वलनास मदत करतो.पण कार्बन डाय-ऑक्साइड वायू ज्वलनास विरोध करतो म्हणून अग्निशामक दलात कार्बनडाय-ऑक्साइड वायूचा उपयोग करतात.

 

कृती 3: तुमच्या शाळेतील अग्निशामक यंत्रणा पहा आणि
त्यावरील सूचना पहा. शिक्षकांशी चर्चा करा व खाली लिहा.

 

यावर ISI चिन्ह
आहे.

 

त्याचे वजन 5 Kg. आहे.

 

यावर A,B,C अशी
चिन्हे आहेत.

 

A-लाकूड,कागद किंवा लोखंडी B- तेल,रॉकेल आणि
पेट्रोल
C-
एलपीजी किंवा इलेक्ट्रिकल या तिन्ही प्रकारच्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अग्निशामक वापरतात.






मी अध्ययन केलेल्या घटकांचे मी स्वत: पडताळणी
करेन.

1.
ज्वलन क्रियेशी संबंधित
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
?

a) एखादी वस्तू कार्बन बरोबर क्रिया करून
उष्णता निर्माण करते म्हणजे ज्वलन.

b) ज्वलन क्रियेमध्ये वापरणारे इंधन घन, द्रव, वायू
स्थितीमध्ये असू शकते.

c) ज्वलन क्रियेमध्ये ज्योत निर्माण करणाऱ्या
वस्तूंना ज्वलनशील म्हणतात.

d) ज्वलन क्रियेमध्ये काहीवेळा उष्णतेबरोबर
प्रकाशाची निर्मिती होते.


उत्तर – a) एखादी वस्तू
कार्बन बरोबर क्रिया करून उष्णता निर्माण करते म्हणजे ज्वलन.


2.
अलिकडच्या
काळामध्ये सरपणावर चालणाऱ्या चुलींचा वापर कमी झाला आहे.याचे वैज्ञानिक कारण कोणते
?
उत्तर –

कारण
चुलीमधून निघणारा धुर डोळ्यांसाठी अपायकारक असतो.या धुराने हवेचे प्रदूषणही वाढू
शकते तसेच या धुराने फुफुसाचे आजारही होऊ शकतात.

3. इलेक्ट्रिकल
उपकरणे आणि पेट्रोलसारखी ज्वलनशील सामुग्री असलेली आग विझविण्यासाठी सर्वोत्तम
अग्निशामक यंत्रे वापरली जातात.

उत्तर – कारण
इलेक्ट्रिकल उपकरणे आणि पेट्रोल हे ज्वलनशील पदार्थ आहेत.त्यामुळे यांची आग
विझवण्यासाठी
CO2 सर्वात चांगला अग्निशामक
आहे.कारण ऑक्सिजनच्या तुलनेत
CO2 जड
आहे.


4.
पेट्रोलची आग कशी नियंत्रित करतात?
उत्तर – पेट्रोलची
आग विझविण्यासाठी
CO2 चा वापर
करतात.


5.
अबिदा आणि रमेश परीक्षानळीमध्ये पाणी गरम
करण्याचा प्रयोग करत होते. अबिदाने परीक्षानळी मेणबत्तीच्या ज्योतीच्या पिवळ्या
भागाजवळ धरली तसेच रमेशने दूसरी परीक्षानळी मेणबत्तीच्या ज्योतीच्या बाह्य
भागांमध्ये धरली. कोणत्या परीक्षानळीमधील पाणी कमी वेळेमध्ये गरम होते.

उत्तर – रमेशने
घेतलेल्या परीक्षा नळीतील पाणी कमी वेळेत गरम होईल.कारण ज्योतीच्या बाह्य
भागामध्ये जास्त उष्णता असते व ज्योतीच्या आतील भागात कमी उष्णता असते.




 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *