KALIKA CHETARIKE 2022
अभिव्यक्त करण्याच्या वेग-वेगळ्या शैली आणि स्वरूप
ओळखतात आणि आपण स्वतः लिखाणात त्याला गुंफ़तात. कविता, कथा, निबंध इत्यादी आणि कथा, नाटक, काव्य, जीवन चरित्र आत्मकथन यातील विचार आणि प्रसंग यांचे आपल्या
पद्धतीने सृजनात्मकरित्या व्यक्त करतात.
अध्ययन कृती क्रमांक : 8.1 छान छान गोष्टी
दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा.
जंगल,बबन, प्राणी, अंधार, विजांचा कडकडाट, गुहा, तहान.
अध्ययन कृती क्रमांक : 8.2
कृतीचे नांव – ‘चित्र वर्णन‘
चित्र पाहून चित्रबद्दल अधिक माहिती लिहा.
1)
सिंह हा एक जंगली प्राणी असून सिंहाला जंगलाचा राजा
असे म्हटले जाते. सिंह हा एक क्रूर आणि धाडसी प्राणी आहे.हत्ती सोडून इतर
कोणत्याही प्राण्याला सिंह घाबरत नाही म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणतात. सिंह
हा मांसाहारी प्राणी आहे. सिंह प्रति तास 50 किलोमीटर
वेगाने धावू शकतो. भारतातील गुजरात राज्यातील
गीर जंगलात सिंह पाहायला मिळतात.
2)
फळे ही निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
फळांमध्ये जितके पोषक घटक मिळतात तेवढे इतर कोणत्याही आहार पदार्थात मिळत
नाहीत.म्हणून आपल्या आहारात फळांना खूप महत्त्व आहे.फळांनी समृध्द असलेल्या
आहारामुळे रक्तदाब कमी होतो,हृदयविकाराचा धोका
कमी होतो,
फळांमुळे कर्करोग टाळता येतो,डोळ्यांच्या आणि पचनाच्या समस्या कमी होतात.शरीरातील पाण्याचा समतोल राहतो.
3)
वाचन आपल्यासाठी चांगले आहे.कारण वाचनामुळे
स्मरणशक्ती,सहानुभूती आणि संवाद कौशल्य सुधारते.
वाचनाने तणाव कमी होऊ शकतो. आपले मानसिक आरोग्य सुधारू शकते आणि आपल्याला दीर्घकाळ
जगण्यास मदत होऊ शकते.वाचन आपल्याला आपल्या कामात आणि नातेसंबंधांमध्ये यशस्वी
होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यास देखील मदत करते.म्हणून मिळेल ती चांगली पुस्तके
आपण वाचली पाहिजेत.
अध्ययन कृती : 8.3a
कृतीचे नांव – ‘प्रसंग लेखन‘
दिलेल्या विषयावर प्रसंग लेखन करा.
कोरोना महामारी
2019 मध्ये चीनमधील वुहान येथे कोरोना व्हायरसचा प्रथम
उद्रेक झाला यालाच नोवेल कोरोना व्हायरसचा उद्रेक अशी ही म्हटले जाते.हा रोग
मुख्यतः चीनमध्ये वुहान येथे डिसेंबर 2019 मध्ये निर्माण झाला होता.हा रोग बघता बघता इटली,फ्रान्स,ब्राझील,अमेरिका,पाकिस्तान,रशिया व संपूर्ण जगात पसरला.आपला भारत देशही यामधून वाचला नाही.मार्चनंतर फक्त थोडेच दिवस राहिले होते.शाळांना सुट्टी चालू होणार होती.सुट्टीमध्ये मुलांना मौज मजा करायला मिळणार होती.यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन देखील केले होते.पण याचवेळी जागतिक कोरोना महामारी सुरू झाली.या महामारीचा भारतामध्ये शिरकाव झाला आणि थोड्याच दिवसात कोरोना रुग्णांची संख्या भारतामध्ये वाढू लागली आणि या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून भारत सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वजण आपल्या घरी बंद झाले.शाळा बंद झाल्या. ऑफिस बंद झाले.उद्योग बंद झाले.लोकांचे बैठे खेळ सुरू झाले.मुले घरातच खेळणी खेळू लागली.
सुरुवातीला या लॉकडाऊनची सर्वांना मजा वाटू लागली पण जास्त
दिवस घरामध्ये कोंडून राहिल्यामुळे लोकांना अस्वस्थ वाटू लागले.भयानक परिस्थिती
निर्माण झाली होती.लोकांना खाण्याच्या आणि रोजच्या वापराच्या वस्तू आणण्यासाठी
सुद्धा बाहेर पडणं अवघड झालं होतं. रोजंदारी करून जगणाऱ्या लोकांना पोटभर अन्न
मिळणे अवघड झाले होते.पोलीस,डॉक्टर हे खंबीरपणे
या रोगाशी लढा देत होते.स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता लोकांच्या आरोग्यासाठी
कष्ट करत होते.या परिस्थितीत नर्स सफाई कामगार,डॉक्टर,शेतकरी,पोलीस हेच लोकांचे
खरे देव बनले होते.
विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला खूप मजा
केली.पण जास्त दिवस सुट्टी पडल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळून कंटाळा वाटत
होता.विद्यार्थ्यांना शाळेची आठवण येत होती. शिक्षकांची आठवण येत होती.
आजपर्यंत या पृथ्वीवर ती अनेक महामारी येऊन गेल्या पण
कोरोना महामारी ही एक भयंकर महामारी होती आणि हा पहिलाच अनुभव या पृथ्वीवरील
लोकांसाठी होता. ज्याची देशांमध्ये या रोगाची सुरुवात झाली त्या देशांमध्ये
थोड्याच दिवसात या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण करण्यात आले विशेष म्हणजे ज्या
देशात प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे त्या देशाने देखील महामारी पुढे हात टेकले
होते. हा एक विशिष्ट प्रकारचा रोग असल्यामुळे यावरती लस किंवा औषध निघणे अशक्य
होते आणि म्हणून जगातील देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला होता.
कोरोना महामारी लॉकडाऊनचे परिणाम –
या कोरोनामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजले.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू झाले.
लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडली.
देशाची अर्थव्यवस्था ढासळली.
अनेक कंपन्या बंद पडल्या.
अनेक लोकांची कामे गेली.
ऑनलाइन क्लासमेट मुलांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम झाले.
लॉकडाऊन काळात सर्व वाहने बंद असल्याने निसर्ग स्वच्छ झाला. एकंदरीत संपूर्ण मानव जातीला करून दिली आता या विषयांवर
लवकरच औषध निघून सर्व परिस्थिती सुरळीत व्हावी याची प्रार्थना करूया. या महामारी
मध्ये माणसाने माणुसकी जपत एकमेकाला मदत करीत यातून सावरण्याचा प्रयत्न केला.सध्या
जग यातून बाहेर येत आहे. आणि परिस्थिती सावरत आहे. लवकरच सर्व जगात कोरोना महामारी
समूळ नष्ट होऊन सर्वांचे जीवन आनंद होऊ अशी प्रार्थना करूया.
अध्ययन कृती : 8.3b
कृतीचे नांव – ‘भावार्थ लेखन‘
इयत्ता 7 वी च्या मराठी
पाठ्यपुस्तकातील “सर्वात्मका शिवसुंदरा” ही कविता वाचून तिचा भावार्थ लिहा.
“सर्वात्मका शिवसुंदरा”
कविता लिहा
सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ।
तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना||धृ ||
सुमनात तू गगनात तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू ।
सद्धर्म जे जगतांमधे
सर्वांत त्या वसतोस तू ।।
चोहीकडे रुपे तुझी
जाणीव ही माझ्या मना ।।1।।
श्रमतोस तू शेतांमधे
तू राबसी श्रमिकांसवे ||
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे ।
स्वार्थाविना सेवा जिथे
तेथे तुझे पद पावना ।। 2 ।।
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी ।।
ज्ञानार्थ जे तपती मुनी
होतोस त्यांची साधना ||3 ||
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले ।।
पाहीन मी तव पावले
मार्गावरी पुढती सदा
सुजनत्व या हृदयामधे
नित जागवी भीतीविना ।। 4 ।।
या कवितेचा भावार्थ पाहण्यासाठी येथे स्पर्श करा..
अध्ययन कृती क्रमांक 8.4 “ नाट्यछटा ”
“दिवाकरांची बोलावणे आल्याशिवाय नाही!” ही नाट्यछटा वाचून
नाट्यछटेची वैशिष्ट्ये लिहा.
वरील नाट्यछटा वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने नाट्यछटेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –
दिवाकर यांचे पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे होय. दिवाकर यांनी मराठी भाषेत
नाट्यछटा हा लेखन प्रकार रुजविण्याचे कार्य केले.म्हणून त्यांना नाट्यछटाकार
दिवाकर असे म्हटले जाते.
नाट्यछटा या नावात छटा हा शब्द लेखन दीर्घ नसावे असे सूचित करतो.नाट्यछटा 25 ते 50 ओळींची असते.
नाट्यछटेमध्ये एकमुखी संवाद असतो.यामध्ये बोलणारे पात्र एकाच असते पण एक अथवा
अनेक व्यक्तीशी बोलत असते.त्या व्यक्तींनी दिलेला प्रतिसाद या एकमुखी संवादात
गृहीत धरलेला असतो.
नाट्यछटेमध्ये एकच प्रसंग निवडलेला असतो.
पात्राला आणि प्रसंगाला अनुरूप अशी भाषा,वेचक मोजक्या शब्दांनी मनोगत व्यक्त करणारी शैली, विरामचिन्हांनीही
अर्थ व्यक्त करण्याचे कौशल्य, अर्थसूचक मथळे, अथपासून इतिपर्यंत असणारी वेधकता हे उत्तम
नाट्यछटेचे आवश्यक असे विशेष आहेत.
दिवाकरांनी नाट्यछटांना बहर आणला.
दिवाकरांनी आपल्या नाट्यछटांमधून स्वभाव विसंगतीवर भर दिला.
अध्ययन कृती क्रमांक:
8.5
कृतीचे नांव ‘काव्य गायन
खाली दिलेल्या कुंभारासारखा गुरु नाही रे जगात ही ग. दि. माडगूळकर यांची कविता पाठ करा व चालीत म्हणा.
कवितेची चाल ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी खालील CLICK HERE वर स्पर्श करा..
कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या अंत्यविधीचे प्रसंग लेखन करा.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी
हल्ल्यात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.‘शहीद जवान अमर रहे‘ अशा घोषणा देत देशासाठी आपल्या प्राणाची
आहुती देणाऱ्या वीरपुत्रांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी सर्व
परिसर स्वच्छ करून महिलांनी पार्थिव जाण्याच्या वाटेवर व स्मशानभूमीत रांगोळी
काढण्यात आली होती. अनेक सार्वजनिक मंडळांनी सर्वत्र शहीद जवानांचे पोस्टर लावून
त्यांच्या बलिदानाला अभिवादन दिले होते.
शहीद जवानांचे पार्थिव ठेवलेल्या
रथावर चोहीकडून पुष्प वर्षाव होत होता.पार्थिव स्मशान भूमीत आल्यानंतर येथील
आर्मीच्या आधिकाऱ्यानी शहीद वीरपुत्रांना सलामी दिली. शहीद जवानांच्या पार्थिवास
अग्नी दिल्यानंतर स्मशानभूमी परिसरात शहीद जवान अमर रहे या घोषणांनी दणाणून गेला
होता.उपस्थित पालक मंत्री,पोलीस निरीक्षक,माजी आमदार,खासदार व इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण
करून पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.कांही मान्यवरांनी वा निवृत्त सैनिकांनी
पुष्पचक्र अर्पण करून देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी कडकडीत
बंद पाडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व
राजकीय पक्षांचे नेते मंडळी,पोलीस अधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी,मान्यवर ,ज्येष्ठ नागरिक,व्यापारी वर्ग,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित
निवृत्त सैनिक,हवालदार,विविध दलाचे पदाधिकारी यांचे अनमोल
मार्गदर्शन लाभले.
मूल्यमापन कृती 2
कंसात दिलेले साहित्य योग्य त्या साहित्यिका समोर लिहा.
(बलुतं, नटसम्राट, धृपद, मळणी, गीत रामायण)
साहित्यिक साहित्य
1) ग दि माडगूळकर – गीत रामायण
2) विंदा करंदीकर – धृपद
3) कुसुमाग्रज – नटसम्राट
4) दया पवार – बलुतं
5) रा. रं. बोराडे – मळणी
वरील साहित्यिकांचे फोटो मिळवून चिकटवा.
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 18,19 उत्तरे
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 20 उत्तरे
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 21,22 उत्तरे
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 23,24 उत्तरे
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 25,26 उत्तरे