KALIKA CHETARIKE 2022
अध्ययन निष्पत्ती: संविधानाची आवश्यकता समजून घेणे.
कृती 1: कथा वाचल्या त्यानंतर प्रश्नांची उत्तर देऊया. –
एक छोटासा देश होता. तेथील लोक स्वतःला योग्य वाटेल ते काम चूक किंवा बरोबर याचा विचार न करता करत होते. आपल्या स्वार्थासाठी इतरांवर हल्ले करणे, त्यांच्या वस्तू हिसकावून घेणे, आपण जगण्यासाठी त्यांचा खूनही करत असत. कोणासाठीही कोणतेही नीतिनियम नव्हते. सबल हे दुर्बलांचे शोषण करत होते. दिवसेंदिवस या घटनांमुळे अशांतता वाढीस लागली, कोणीही समाधानाने जीवन जगू शकत नव्हते. तेथे अशांतता वाढत असलेने लोक एके दिवशी एकत्र येऊन यापुढे आपण असे न भांडता एकमेकाशी सहकार्याने वागू. असे ठरवून काही नियम बनवले. सर्वांनी या नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याला प्रथम शिक्षा देण्याचा निर्णय केला. यामुळे तेथील लोकांनी काय करावे, काय करू नये, आपण रहात असलेल्या प्रदेशाचे रक्षण कशा प्रकारे करावे ? यासारख्या विविध विषयावर नियम बनवून एका पुस्तकाच्या स्वरूपात संग्रहित केले. तेथे प्रशासनासाठी कायदे बनवण्यासाठी, त्याच्या अंमलबजावणीसाठी, ते योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी, काही संस्थांची रचना केली. यापुढे आपल्या देशातील कोणत्याही भागामध्ये कोणताही नियम बनवल्यास तो सर्व लोकांनी मिळून बनविलेल्या कायदे पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे अंमलात आणला जावा. एखादेवेळी कायदे पुस्तकाविरुद्ध नियम बनविल्यास तो नियम रद्द होईल असे ठरविले. त्या वेळेपासून त्या देशातील नागरिक तेथील कायद्याचा सन्मान राखून, शांततेने, समाधानाने, सहकार्याने, नियमाने जीवन जगत आहेत.
1) सर्वांनी कथा वाचली का ? कथा कशी होती ? यावर तुमचे मत काय ? चर्चा करा.
उत्तर– होय मी कथा वाचली कथा खूप छान होती.एखाद्या प्रदेशातील लोकांना आनंदाने आणि शांततेने जगण्यासाठी कायदे आवश्यक आहेत हे या कथेत सांगण्यात आले आहे.
जर मी या परिस्थितीत असतो,तर मी लोकांना काय चांगले आहे? आणि काय वाईट आहे याची जाणीव करून देईन आणि कायद्यांचे पालन करण्यास सांगेन.
2) कथेमध्ये त्या देशातील लोकांनी नियम का तयार केले ?
उत्तर– कारण त्या देशातील लोक स्वतःला योग्य वाटेल ते काम चूक किंवा बरोबर याचा विचार न करता करत होते. आपल्या स्वार्थासाठी इतरांवर हल्ले करणे, त्यांच्या वस्तू हिसकावून घेणे, आपण जगण्यासाठी त्यांचा खूनही करत असत. कोणासाठीही कोणतेही नीतिनियम नव्हते.म्हणून त्या देशातील लोकांनी नियम तयार केले.
3) त्यांनी नियम बनवून त्याची नोंद केली नसती तर काय झाले असते ? यावर तुमचे विचार लिहा.
उत्तर– त्यांनी नियम बनवून त्याची नोंद केली नसती तर अशांतता वाढून लोकांच्या मध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले असते
उत्तर– लोकांनी लिहिलेल्या कायद्याच्या संग्रह पुस्तकाला आपण राज्यघटना असे म्हणू शकतो.
कृती 1: संविधान रचना समिती मध्ये कार्य केलेल्या कर्नाटकातील प्रमुख व्यक्तींची छायाचित्रे खाली दिलेली आहेत. त्यांच्या बद्दल माहिती संग्रहित करून समजावून घ्या.अध्ययन निष्पत्ती: तुम्ही प्रस्तावना आणि त्यातील मुख्य शब्दाचे सोप्या अर्थाने वर्णन कराल.
1. कृती: आम्ही दररोज प्रार्थनेवेळी भारताची संविधान प्रस्तावना वाचत नाही का?तर त्यामधून तुम्ही काय शिकलात ? ते लिहा.
उत्तर– दररोज प्रार्थना वेळी राज्यघटना(संविधान) प्रस्तावना वाचल्यामुळे आपल्याला राज्यघटनेचा थोडक्यात परिचय समजतो.
2. संविधानाच्या प्रस्तावनेमधील तुम्हाला आवडलेले दोन अंश कोणते ? का ? ते लिहा.
उत्तर– 1.. गणराज्य
– भारत हे गणराज्य आहे.येथील राज्य कारभार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून चालतो.
2.. स्वातंत्र्य
– कारण यामुळे आपल्याला विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळते.
3. समानता
– सर्वजण समान आहेत. गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांनी एकतेने राहण्यास सांगितले आहे.
कृती: खाली भारतीय संविधानाची प्रस्तावना दिली आहे. ती वाचून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उत्तर–
1.सार्वभौम
2.समाजवादी
3.धर्मनिरपेक्ष
4.लोकशाही
5.गणराज्य
6.न्याय
7.स्वातंत्र्य
8.समानता
9.बंधुता
10.एकता व एकात्मता
2. प्रस्तावना मध्ये दिलेल्या खालील शब्दांच्या बद्दल तुम्ही काय समजावून घेतला ?
१. स्वातंत्र्य
– कारण यामुळे आपल्याला विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळते.
2. समानता
– सर्वजण समान आहेत. गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांनी एकतेने राहण्यास सांगितले आहे.
3. बंधुता – मैत्रीपूर्ण वातावरणात सर्वांनी राहावे.आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत अशी भावना ठेवणे
♻️ कलिका चेतरिके 2022♻️
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
अध्ययनांश 13 ते 19
♻️उत्तरे♻️
https://smartningguru.blogspot.com/2022/11/7th-ss-learning-sheet-answers-7-kalika.html