EXCESS TEACHER समायोजन वेळापत्रक व बढती प्रक्रिया वेळापत्रक
2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक / हायस्कूल सहशिक्षक / प्राथमिक शाळा मुख्याध्यापक/विशेष शिक्षक /शारीरिक शिक्षक / तत्समान अधिकारी यांची बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून या संबंधी पूर्वतयारी म्हणून सर्व शिक्षकांचे सेवा अंक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहेत.या सेवा अंक बद्दल ऑनलाईन आक्षेप नोंदवण्यास 18.10.2022 ही अंतिम तारीख असून यानंतर शाळेतील कार्यरत अतिरिक्त शिक्षक प्राथमिक,हायस्कूल सहशिक्षक / प्राथमिक शाळा मुख्याध्यापक/विशेष शिक्षक /शारीरिक शिक्षक यांची समायोजन व बढती प्रक्रिया प्रारंभ होणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल..
कार्यरत अतिरिक्त
शिक्षकांचे समायोजन वेळापत्रक
1. सद्या कार्यरत अतिरिक्त प्राथमिक,हायस्कूल
सहशिक्षक / प्राथमिक शाळा मुख्याध्यापक/विशेष शिक्षक /शारीरिक शिक्षक यांची तात्पुरती यादी प्रकाशित करणे.
दि. 12.10.2022
संबंधित कार्यालय – DDPI कार्यालय / BEO कार्यालय
2. प्रकटीत अतिरिक्त प्राथमिक,हायस्कूल
सहशिक्षक / प्राथमिक शाळा मुख्याध्यापक/विशेष शिक्षक /शारीरिक शिक्षक यादीबद्दल
संबंधित शिक्षकांकडून आक्षेप नोंदवणे.
दि. 12.10.2022 ते 18.10.2022
संबंधित कार्यालय – DDPI कार्यालय / BEO कार्यालय
3.आक्षेपांचे परिशीलन करून पदानुसार अंतिम यादी
प्रकाशित करणे
दि. 05.11.2022
संबंधित कार्यालय –जिल्ह्याचे DDPI कार्यालय आणि ई
सेवा शाखा यांच्या सहाय्याने
4. अतिरिक्त शिक्षक / मुख्याध्यापक यांचे
समायोजन करण्यास कौन्सलिंग वेळापत्रक जाहीर केले जाईल.
प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व
वरिष्ठ मुख्याध्यापक यांची बढती प्रक्रिया
(संबंधित जिल्ह्याचे DDPI कार्यालय
(प्रशासकीय) यांच्या स्तरावर ऑफलाईन पद्धतीने)
1. पदोन्नती (बढती) साठी पात्र प्राथमिक शाळा
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची ज्येष्ठता यादी प्रकाशित करणे.
दि. 20.10.2022
संबंधित कार्यालय –संबंधित
जिल्ह्याचे DDPI कार्यालय (प्रशासकीय)
2. प्रकाशित केलेल्या पदोन्नती (बढती) साठी
पात्र प्राथमिक शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची ज्येष्ठता यादी बद्दल आक्षेप
नोंदवणे.
दि. 20.10.2022 to 27.10.2022
संबंधित कार्यालय –संबंधित
जिल्ह्याचे DDPI कार्यालय (प्रशासकीय) / BEO कार्यालय
3. शिक्षकांनी केलेल्या आक्षेपांचे परिशीलन
दि. 20.10.2022 to 29.10.2022
संबंधित – संबंधित शिक्षक
4. पदोन्नती (बढती) साठी पात्र प्राथमिक शाळा
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रकाशित करणे.
दि. 31.10.2022
संबंधित कार्यालय –जिल्ह्याचे DDPI कार्यालय आणि ई
सेवा शाखा यांच्या सहाय्याने
5. प्राथमिक शाळा शिक्षक व मुख्याध्यापक यांचे
बढती प्रकिया कौन्सलिंग वेळापत्रक जाहीर केले जाईल.
अधिकृत आदेश खालील प्रमाणे –