जीवावरण | 8th SS Textbook Solution Lesson 25. ECOLOGY (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 25.जीवावरण)जीवावरण | 8th SS Textbook Solution Lesson 25. ECOLOGY (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 25.जीवावरण)

इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान  

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

विषय – स्वाध्याय 

इतिहास 

प्रकरण 25.

जीवावरण 

abc 

I. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. ‘जीवावरणम्हणजे काय ?

उत्तर – सजीवांचे अस्तित्व असलेल्या पृथ्वीच्या चौथ्या घटकास जीवावरण म्हणतात.

2. जीव परिसर शास्त्र म्हणजे काय

उत्तर – जीव आणि त्यांच्यातील भौतिक रासायनिक आणि जैविक अंतरिक्ष संबंधांचा अभ्यास करणारी एक विज्ञानाची शाखा म्हणजे जीव परिसर शास्त्र (Ecology) होय.

3. पर्यावरण प्रदूषणाच्या विविध प्रकारांची नावे लिहा.

उत्तर – पर्यावरण प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत.ते म्हणजे 1.वायु प्रदूषण 2.जल प्रदूषण 3.मृदा प्रदूषण 4.ध्वनी प्रदूषण.

4. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत ?

उत्तर – जल प्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाय योजावेत.

कारखान्यातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करणे.

पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखणे.

नदीमध्ये केरकचरा न टाकता त्याची विल्हेवाट लावणे.

मैला सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन नदीत मिसळणार नाहीत याची काळजी घेणे. 

5. जैव-विविधता म्हणजे काय ?

उत्तर – एकाच भूप्रदेशात दिसून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना जैव विविधताअसे म्हणतात.

II. खालील पदांचा अर्थ लिहा.

6. जीवावरण (Biosphere)

उत्तर – सजीवांचे अस्तित्व असलेल्या पृथ्वीच्या चौथा घटक.

7. जीव परिसर असंतुलन (Ecologiecal imbalance)

उत्तर – नैसर्गिक किंवा मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील नैसर्गिक संतुलन बिघडणे याला जीव परिसर असंतुलन असे म्हणतात.

8. वैश्विक तापमान वाढ (Global Warming)

उत्तर – पृथ्वीच्या वातावरणात काही वायूंच्या वाढीमुळे तापमानात होणारी वाढ याला वैश्विक तापमान वाढ असे म्हणतात.

9. हरित गृह परिणाम (Green house effect)

उत्तर – CO2 आणि इतर हरितगृह वायू भूमीपासून बाहेर पडणारी उष्णता शोषून घेतात व साठवून ठेवतात.त्यामुळे वातावरणातील तापमानाचे प्रमाण अधिक वाढते.यालाच हरितगृह परिणाम म्हणतात. 

10. ओझोनचा विरळपणा (Ozone depletion)

क्लोरोफ्लोरो कार्बन (CFC) चे प्रमाण जास्त झाल्यामुळे वातावरणातील ओझोन थराचा नाश होत आहे.यालाच ओझोनचा विरळपणा असे म्हणतात.

11. आम्लीय पाऊस (Acid Rain)

उत्तर – पावसाच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल आणि कार्बन मोनॉक्साईड वगैरे आम्लांचे प्रमाण जास्त असल्यास त्यांना आम्लीय पाऊसम्हणतात.

III. लक्षात ठेवण्याचे मुद्दे.

12. प्रदूषण (Pollution)
13.
पर्यावरणदिन (Environmental Day)
14.
हवामानातील बदल (Climate Change)
15.
सी.एफ.सी. (क्लोरो फ्लुरो कार्बन) (Chlorofluorocarbons)
16.
पृथ्वी तास आणि पृथ्वी दिवस
17.
पृथ्वीचे रक्षण (Save
Earth)जीवावरण | 8th SS Textbook Solution Lesson 25. ECOLOGY (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 25.जीवावरण)

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करा..

जीवावरण | 8th SS Textbook Solution Lesson 25. ECOLOGY (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 25.जीवावरण)Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *