उपनिर्देशक कार्यालय,शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि डायट चिक्कोडी यांचेकडून
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम संकलनात्मक मूल्यमापन संबंधी –
CIRCULAR DATE – 22.09.2022
1.2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्ती किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करण्यास योग्य असावे.
2.पहिली ते पाचवी इयत्तासाठी –20 लेखी + 20 तोंडी परीक्षा एकूण 40 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
इंग्रजी भाषेसाठी 10 लिखित + 30 तोंडी परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
3.सहावी ते आठवी इयत्तासाठी –30 लेखी + 10 तोंडी एकूण 40 गुणांसाठी परीक्षा घेणे व 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.
4.इयत्ता 9वी इयत्तेसाठी – 10वीच्या नमुन्याप्रमाणे प्रथम भाषा 100 अंक तसेच इतर विषयांना 80 अंकांची परीक्षा घेणे.
5.विषय शिक्षक / वर्ग शिक्षकांनी पहिली ते तिसरी वर्गांसाठी नली कली स्वरूपात तसेच 4थी ते 9वी इयत्तांसाठी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करून मुख्याध्यापकांचे दृढीकरण घेऊन परीक्षा घेणे.
6. माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार दिनांक 03.10.२०२२ ते १६.10.२०२२ पर्यंत दसरा सुट्टी असल्याने सदर सुट्टी कालावधीत संकलित मूल्यमापन परीक्षेची पूर्व तयारी कराण्याची सुचना विद्यार्थ्याना द्यावी.आणि दिनांक:- 17-10-2022 ते 25-10-2022 पूर्वी 1ली ते 9वी साठी संकलित मूल्यमापन (SA-1) परीक्षा घेऊन परीक्षेचे मूल्यमापन विश्लेषण तयार करणे आणि शाळेच्या समुदायदत्त शाळा कार्यक्रमामध्ये प्रगतीचा तपशील सादर करणे.
See the below circular for more information –