प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येत असलेल्या शेंग चिक्की प्रमाणात बदल करणेबाबत…
2022 या शैक्षणिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत flexibility for innovative intervention उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिक अंश स्वरूपात वितरण करण्यात येत असलेल्या शेंगदाणा चिक्कीचे प्रमाण 20 ते 40 ग्रॅम असावे असे ठरवण्यात आले होते.यानुसार कांही शाळांमध्ये 20 ग्रॅम शेंगदाणा चिक्कीचे वितरण करण्यात येत आहे असे निदर्शनास आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्यक पौष्टिक अंश कमी प्रमाणात मिळू शकतात व या योजनेचा उद्देश साध्य होणार नाही.याचा विचार करून शेंगदाणा चिक्कीचे प्रमाण 20 ते 40 ग्रॅम वरून 35 ग्रॅम ते 40 ग्रॅम असे सुधारित प्रमाण करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.तरी शाळेचे मुख्याध्यापक तसेच या उपक्रमाशी सबंधित स्वयंसेवा संस्थांनी 35 ग्रॅम ते 40 ग्रॅम या प्रमाणात शेंगदाणा चिक्कीचे वितरण करण्याची सुचना करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक…