EEDS UPDATE FOR TEACHER TRANSFER 2022-23

 शिक्षक बदली 2022-23 साठी EEDS (EMPLOYEE DATA SYSTEM) सॉफ्टवेअरमध्ये शिक्षकांची सेवा माहिती अद्यावत व अंतिम करणेबाबत…  परिपत्रक दिनांक – 25-08-2022




 

 

EEDS UPDATE FOR TEACHER TRANSFER 2022-23



 

कर्नाटक राज्य नागरी सेवा (शिक्षकांच्या बदलीचे नियमन) अधिनियम, 2020 च्या कलम 07 मध्ये प्रदान केलेल्या तरतुदीनुसार वर्ष 2022-2023 साठी शिक्षकांच्या सामान्य बदल्यांना परवानगी दिली आहे.
        या पार्श्‍वभूमीवर, सप्‍टेंबर 2022 मध्‍ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या सुरू करण्‍याचे नियोजित आहे. या संदर्भात, EEDS सॉफ्टवेअरमध्‍ये शिक्षकांची सेवा तपशील तपासून अचूक माहिती नमूद करून अंतिम करावे. .
सर्व संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या अंतर्गत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचे सेवा रेकॉर्ड म्हणून अद्ययावत सेवा तपशील प्रथम प्राधान्याने तपासावेत आणि त्यांना दिनांक:-०२-०९-२०२२ पर्यंत EEDS सॉफ्टवेअरमध्ये प्रविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




माहिती अद्यायावत करताना खालील बाबी महत्वाच्या असतील. –

1.निवृत्त,स्वेच्छा निवृत्त,अकाली मृत्यू झालेल्या शिक्षकांची माहिती (ऑगस्ट 2022 मध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांसह) EEDS मधून कमी करणे.

2. अनुदानित संस्थांच्या शिक्षकांचा सरकारी शिक्षक म्हणून उल्लेख असलेले मुद्दे.

3. सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा माध्यमिक शिक्षक (High School Teacher) म्हणून उल्लेख असणारे मुद्दे.

4.निलंबनामुळे किंवा अन्य नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना स्थळ नियुक्ती देऊन EEDS मध्ये त्यांचे सेवा तपशील अद्यावत करणे.

5. शाळेचा डायस कोड बरोबर असल्याची खात्री करणे..




6. शासन आदेशानुसार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतींमध्ये, नगर पंचायतींचे महानगर पालिकांमध्ये,नगरपालिकांचे नगरपरिषदांमध्ये रूपांतर झालेल्या प्रदेशातील शिक्षकांचा प्राधान्य क्रम (उदा. A, B, C) यांचे सूक्ष्म परिशीलन करून अंतिम रूप देणे.

7. पदनाम, अध्यापन विषय,माध्यम याबद्दलच्या तपशीलांचे परिशीलन करणे आणि अंतिम रूप देणे.

8. सेवेत सामील झाल्याची तारीख,बदली,पदोन्नती इत्यादीसारख्या सेवा तपशील तपासणे आणि अंतिम करणे.

9. इतर सेवा तपशीलांची अचूकता तपासणे इ.

    वरील तपशिल दिनांक :-02-09-2022 पूर्वी EEDS सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत झालेली माहिती व केवळ EEDS मध्ये उपलब्ध शिक्षक सेवा तपशीलांची सुधारित माहिती सध्याच्या बदली प्रक्रियेसाठी विचारात घेतली जाईल.




तरी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांची सेवापुस्तिकेतील माहितीनुसार संपूर्ण सेवा माहिती EEDS सॉफ्टवेअरमध्ये तपासावी आणि अंतिम करणेसाठी आवश्यक कार्य हाती घेणे.

दिनांक :-02-09-2022 या निर्दिष्ट तारखेनंतर EEDS मध्ये अद्यावत (अपडेट) केलेली माहिती 2022-23 सालातील बदली प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

EEDS संबंधी कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी आपला तपशील karonlineserviceshelp@gmail.com या जिमेल आयडी वर पाठवावा.

ABC 

अधिकृत सविस्तर माहितीसाठी खालील आदेश पहावा…

 

 




 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *