8th SS Textbook Solution 14 CITIZEN AND CITIZENSHIP (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 14.नागरिक आणि नागरिकत्व )

 


 

8th SS Textbook Solution 14 CITIZEN AND CITIZENSHIP (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 14.नागरिक आणि नागरिकत्व ) 

इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

विषय – स्वाध्याय 

नागरिक शास्त्र 

प्रकरण – १४  

नागरिक आणि नागरिकत्व
 

I. योग्य शब्द वापरून
रिकाम्या जागा भरा
.

1. ब्रिटिश राजवटीत भारतात राहणाऱ्या लोकांना प्रजा म्हणून संबोधतात.

2. आपल्या देशात तात्पुरत्या राहणाऱ्या
परदेशी व्यक्तीला विदेशी म्हणतात
.

3. नागरिकत्व कायदा 1955
साली अमलात आला.

4. तुम्ही ज्या पद्धतीने नागरिकत्व मिळविले
ती पद्धत जन्मानुसार नागरिकत्व
. 

II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिए.

5. नागरिकत्व म्हणजे काय ?

उत्तर – नागरिकाना राज्याचे पूर्ण सदस्यत्व प्राप्त होणे.तसेच
राज्यानी दिलेले नागरी आणि राजकीय हक्क प्राप्त
होणे.यालाच नागरिकत्व असे म्हणतात
.

6. नागरिकत्वाचे
फायदे कोणते
?

उत्तर – नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तीला पुढील फायदे होतात...

1.राष्ट्राकडून
त्याला सुरक्षा आणि संरक्षण मिळते
.

2.शिक्षण,
आरोग्य, विमा, आश्रय, उद्योग तसेच इतर सुविधा मिळतात.

3.नागरी आणि
राजकीय हक्क उपभोगता येतात
.

4.राज्याने
दिलेले मुलभूत हक्क उपभोगता येतात
.

5.मतदानासारख्या
प्रक्रियेत सहभागी होता येते
.

6.राष्ट्रपती,
उपराष्ट्रपती, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश,
तसेच इतर उच्च पदावर निवडून येऊ शकतो.


7. भारतातील
नागरिकत्व कायदे आणि नियम तयार करण्याचा अधिकार कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे
?

उत्तर – भारतातील नागरिकत्व कायदे आणि नियम तयार करण्याचा अधिकार
संसदेला देण्यात आला आहे
.
 

8. नागरिकत्व
मिळविण्याच्या पद्धती कोणत्या
?

उत्तर – नागरिकत्व मिळविण्याच्या पद्धती खालील प्रमाणे

1.जन्मानुसार
नागरिकत्व

2.वंशानुसार
नागरिकत्व

3.नोंदणीद्वारे
नागरिकत्व

4.नैसर्गिक
कारणाद्वारे नागरिकत्व

5.नवीन
प्रदेशाचा समावेश करून नागरिकत्व
.


9. विदेशी
नागरिकत्व मिळविण्याच्या पद्धती कोणत्या
?

उत्तर – विदेशी नागरिकत्व मिळविण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे -:

1.निवासस्थान

2.विवाह

3.विदेशात
सरकारी नोकरी

4.मालमत्ता
संपादनाद्वारे नागरिकत्व

5.विनंती
द्वारे नागरिकत्व

10. नागरिकत्व
गमविण्याच्या पद्धती कोणत्या
?

उत्तर – भारतीय नागरिकत्व जगण्याच्या अनेक पद्धती आहेत त्या खालील
प्रमाणे

1.परित्याग

2.संपुष्टात
आणणे

3.वंचित करून 

11. अशा
परिस्थितीचा उल्लेख करा ज्या अंतर्गत नागरिकत्व संपुष्टात येते
.

उत्तर – जर एखाद्या भारतीय नागरिकाने परदेशात जाऊन येथील नागरिकत्व
स्वीकारले तर अशा परिस्थितीत त्याचे भारतातील नागरिकत्व संपुष्टात आले असे मानले
जाते
.

12. नागरिकत्वाचे
प्रकार नमूद करा आणि त्यांच्यातील फरक लिहा
.

उत्तर –नागरिकत्वाचे प्रकार दोन आहेत एकेरी नागरिकत्व व दुहेरी
नागरिकत्व

एकेरी नागरिकत्व

दुहेरी नागरिकत्व

फक्त आपल्या देशाचे नागरिक असल्यास त्याला एकेरी
नागरिकत्व म्हणतात
.

आपल्या देशाचे नागरिकत्व व राज्याचे नागरिकत्व असल्यास
त्याला दुहेरी नागरिकत्व म्हणतात
.


13. नागरिकांची
कर्तव्ये कोणती
?

उत्तर –

1.घटनेचा आदर
राखून कायद्याचे पालन करणे
.

2.राज्याच्या
घडामोडीत सहभाग घेणे
.

3.राष्ट्रविघातक
कार्यात भाग घेऊ नये
.

4.आपला शब्द व
कृतीतून राष्ट्राचे संरक्षण करणे
.

5.राष्ट्रहिताकडे
लक्ष देणे
.

6.सेवावृत्ती
व त्यागवृत्ती

7.कर भरणे. 
 

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..

            


 
Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *