Guidelines to distribute Eggs/Bananas/Chikki

 

 


सरकारी व अनुदानित शाळेतील पहिले ते आठवी विद्यार्थ्यांना अंडे  (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) संबंधी मुख्याध्यापक,शिक्षक,पालक,SDMC,अधिकारी यांच्यासाठी कांही मार्गदर्शक सुचना,वेळापत्रक पुढीलप्रमाणे – 



    46 दिवस सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरणविषयी कांही  मार्गदर्शक सुचना,आवशयक काळजी,खरेदी प्रक्रिया,अनुदान,वेळापत्रक इत्यादीविषयी थोडक्यात माहिती अधिक माहितीसाठी शेवटी दिलेले शासनाचे परिपत्रक पहावे…

विषय: 2022-23 या वर्षासाठी शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी पौष्टिक आहार कार्यक्रमांतर्गत राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरणविषयी मार्गदर्शक सुचना – 

परिपत्रक दिनांक – २१/०७/२०२२




 

वरील विषयाशी संबंधित,06 ते 15 वयोगटातील शालेय मुलांमध्ये कुपोषण,अशक्तपणा आणि बहु-पोषक कमतरता यांचा प्रादुर्भाव राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग सर्वेक्षण अहवाल (NFHS ) 2019-20 मध्ये आढळून आला आहे.ही कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने मध्यान्ह आहारासोबत आवशयक पूरक पौष्टीकांश युक्त आहार पदार्थ वितरण करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

राज्यातील कल्याण कर्नाटक विभागातील बिदर,बळ्ळारी,विजयनगर,कलबुर्गी,कोप्पळ,रायचूर,यादगिरी आणि विजापूर जिल्ह्यातील सरकारी व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारासोबत प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्याला 2 उकडलेली अंडी, अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाणा चिक्की वितरण करून पौष्टीकता वाढण्यासाठी पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अनुदान 2022-23 सालातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत संबंधित वार्षिक क्रिया योजनेत दिलेल्या अनुमोदनाप्रमाणे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांचा वाटा अनुक्रमे 60:40 प्रमाणे राहील.




कल्याण कर्नाटक विभागातील वगळता इतर सर्व जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिक अंश स्वरूपात अंडी अथवा केळी/चिक्की वितरण करण्यासाठी आवश्यक अनुदान शिर्षक 2202-00-101-0-18 (2202-01 196-6-01) प्रमाणे शिल्लक अनुदानातून देण्यात येईल.

2022-23 सालातील जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शालेय मुलांना उकडलेली अंडी आणि अंडी न खाणाऱ्या मुलांना केळी/शेंगदाण्याची चिक्की पूरक पोषण आहाराच्या स्वरूपात वाटप करण्याचा कार्यक्रम शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस एकूण 46 दिवस माध्यान्ह भोजनासह वितरण करण्यासंबंधी  मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे – 

अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की वितरण वेळापत्रक – 

अ.नं.

महिना

उपलब्ध आठवडे

नियोजित आठवडे

नियोजित दिवस

वितरण प्रमाण

1

जुलै २०२२

01

01

02

2 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

2

ऑगस्ट २०२२

04

02

04

4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

3

सप्टेंबर

२०२२

04

02

04

4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

4

ऑक्टोबर

२०२2

02

02

04

4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

नोव्हेंबर

२०२२

04

04

08

8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

डिसेंबर

२०२२

04

04

08

8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

7

जानेवारी

2023

04

04

08

8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

8

फेब्रुवारी

2023

04

04

08

8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

 

एकूण

27

23

46

46 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की

 




वितरण प्रमाण व विधान –

 अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण पद्धत: वरील वेळापत्रकानुसार दर महिन्याला नियोजित दिवशी स्थानिक आहार पद्धतीनुसार दुपारच्या जेवणाबरोबर मुलांना अंडी वितरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. 
त्याचप्रमाणे आठवड्यातील अंडी वितरणाच्या नियोजित दिवशी (साधारणत: दर आठवड्याला मंगळवार, शुक्रवार) 50 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ताज्या व चांगल्या दर्जाची 1 अंडी वितरण करावी.तसेच त्याच दिवशी अंडी न खाणार्‍या मुलांना चांगल्या दर्जाच्या आणि चविष्ट 2 केळीचे वितरण करावे व ज्या मुलांना केळी खायची नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे-चिक्की (शेंगदाणे-गूळ. वेलची पूड घालून तयार केलेली उच्च दर्जाची स्वादिष्ट शेंगा चिक्की)  20 ग्रॅम ते 40 ग्रॅम इतकी वितरित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.शक्य असल्यास शेंगा चिक्की शाळेतच स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांकडून तयार करून वितरित करण्याचा प्रयत्न करावा.बाजारात खरेदी केल्यास, स्थानिक स्त्रीशक्ती केंद्र,गृह उद्योग केंद्रे,अंगणवाडी-नर्सरी केंद्रांमधून पुरवठा करणारे अन्न पुरवठादार यांच्याकडून  स्वच्छ,चविष्ट,सुरक्षितता,योग्य प्रमाण आणि चांगल्या स्वच्छतेने तयार केलेले आणि पॅकिंग केलेले,चांगल्या दर्जाची खात्री करून रु. 6-00 च्या युनिट किमती पेक्षा जास्त नसलेले हे आहार पदार्थ खरेदी करून शालेय मुलांना  वितरित करावे.



खरेदी प्रक्रिया 
जिल्हा पंचायत व तालुका पंचायत यांच्या कडून मध्यंह आहार योजनेंतर्गत या योजनेची रक्कम जमा केळी जाणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला एक अंडे किंवा केळी / शेंगदाणा चिक्की 6.00 (इतर खर्चासह) प्रमाणे खरेदी करण्यास शाळा मुख्याध्यापक,SDMC अध्यक्ष यांना सूचना देण्यात येतील. 
खरेदी खर्च व इतर खर्च – 

अ.नं.

पदार्थ

किंमत

 

अंडे

1

अंडी खरेदी (नग – 1)

5.00

2

अंडी शिजवण्यास इंधन खर्च

0.50

3

स्वयपाकी खर्च

0.30

4

वाहतूक खर्च  

0.20

 

एकूण खर्च

6.00

अ.नं.

पदार्थ

किंमत

 

केळी

1

केळी  खरेदी (नग – 2)

5.80 ₹

2

वाहतूक खर्च  

0.20 ₹

 

एकूण खर्च

6.00

 


अ.नं.

पदार्थ

किंमत

 

शेंगदाणा चिक्की

1

शेंगदाणा चिक्की (प्रमाण  20 ते 40
ग्रॅम एक)

(शेंगदाणे,गूळ,वेलची हे घटक असावेत)

5.50 ₹

2

इंधन खर्च

0.30 ₹

3

वाहतूक खर्च  

0.20 ₹

 

एकूण खर्च

6.00

 

नोंदी व दाखले – 
वजन व उंची तपासणी रजिस्टर – 
    जुलै 2022 पासून शाळेत मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु केलेल्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलांचे इयत्तेनुसार वजन व उंची यांची नोंद करून ठेवणे.त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याची उंची व वजन यांची नोंद करणे.अशाप्रमाणे फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांची वजन उंचीची नोंद ठेवणे.शेवटी फेब्रुवारी 2023 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या वजन व उंचीची तुलना करून त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.सदर जबाबदारी शाळेचे शारीरिक शिक्षकांच्यावर राहील.शारीरिक शिक्षक नसल्यास संबंधित इयत्तेच्या वर्गशिक्षकांनी सदर नोंदी कराव्यात.



 
मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु करण्यापूर्वी वर्गातील अंडी खाणारे विद्यार्थी,केळी खाणारे विद्यार्थी किंवा शेंगदाणा चिक्की खाणारे विद्यार्थी यांची यादी करून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी संमती पत्र घेऊन त्यांचा संग्रह करून ठेवावा.
 
Student Beneficiery Register for Egg distribution ot Fruits distribution हे रजिस्टर तयार करून वितरणाच्या नियोजित दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला वितरण केलेले अंडे किंवा केळी / शेंगदाणा चिक्की यांची स्वीकृती म्हणून या रजिस्टर मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची सही घेणे.सादर रजिस्टर ठेवण्याची जबाबदारी संबंधित वर्गाशिक्षकाची असेल. या रजिस्टरची एक प्रत शेवटी सर्व बिलांसोबत संबंधित कार्यालयाला द्यावी लागेल.
   


SEE THE GOVT CIRCULAR FOR MORE INFORMATION 
 

 







Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *