46 दिवस सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरणविषयी कांही मार्गदर्शक सुचना,आवशयक काळजी,खरेदी प्रक्रिया,अनुदान,वेळापत्रक इत्यादीविषयी थोडक्यात माहिती अधिक माहितीसाठी शेवटी दिलेले शासनाचे परिपत्रक पहावे…
विषय: 2022-23 या वर्षासाठी शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी पौष्टिक आहार कार्यक्रमांतर्गत राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरणविषयी मार्गदर्शक सुचना –
परिपत्रक दिनांक – २१/०७/२०२२
वरील विषयाशी संबंधित,06 ते 15 वयोगटातील शालेय मुलांमध्ये कुपोषण,अशक्तपणा आणि बहु-पोषक कमतरता यांचा प्रादुर्भाव राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग सर्वेक्षण अहवाल (NFHS ) 2019-20 मध्ये आढळून आला आहे.ही कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने मध्यान्ह आहारासोबत आवशयक पूरक पौष्टीकांश युक्त आहार पदार्थ वितरण करण्याची योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील कल्याण कर्नाटक विभागातील बिदर,बळ्ळारी,विजयनगर,कलबुर्गी,कोप्पळ,रायचूर,यादगिरी आणि विजापूर जिल्ह्यातील सरकारी व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारासोबत प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्याला 2 उकडलेली अंडी, अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाणा चिक्की वितरण करून पौष्टीकता वाढण्यासाठी पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अनुदान 2022-23 सालातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत संबंधित वार्षिक क्रिया योजनेत दिलेल्या अनुमोदनाप्रमाणे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांचा वाटा अनुक्रमे 60:40 प्रमाणे राहील.
कल्याण कर्नाटक विभागातील वगळता इतर सर्व जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिक अंश स्वरूपात अंडी अथवा केळी/चिक्की वितरण करण्यासाठी आवश्यक अनुदान शिर्षक 2202-00-101-0-18 (2202-01 196-6-01) प्रमाणे शिल्लक अनुदानातून देण्यात येईल.
2022-23 सालातील जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शालेय मुलांना उकडलेली अंडी आणि अंडी न खाणाऱ्या मुलांना केळी/शेंगदाण्याची चिक्की पूरक पोषण आहाराच्या स्वरूपात वाटप करण्याचा कार्यक्रम शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस एकूण 46 दिवस माध्यान्ह भोजनासह वितरण करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे –
अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की वितरण वेळापत्रक –
अ.नं. | महिना | उपलब्ध आठवडे | नियोजित आठवडे | नियोजित दिवस | वितरण प्रमाण |
1 | जुलै २०२२ | 01 | 01 | 02 | 2 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
2 | ऑगस्ट २०२२ | 04 | 02 | 04 | 4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
3 | सप्टेंबर २०२२ | 04 | 02 | 04 | 4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
4 | ऑक्टोबर २०२2 | 02 | 02 | 04 | 4 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
५ | नोव्हेंबर २०२२ | 04 | 04 | 08 | 8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
६ | डिसेंबर २०२२ | 04 | 04 | 08 | 8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
7 | जानेवारी 2023 | 04 | 04 | 08 | 8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
8 | फेब्रुवारी 2023 | 04 | 04 | 08 | 8 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
| एकूण | 27 | 23 | 46 | 46 अंडी किंवा केळी/शेंगदाणा चिक्की |
वितरण प्रमाण व विधान –
अ.नं. | पदार्थ | किंमत |
| अंडे | |
1 | अंडी खरेदी (नग – 1) | 5.00 ₹ |
2 | अंडी शिजवण्यास इंधन खर्च | 0.50 ₹ |
3 | स्वयपाकी खर्च | 0.30 ₹ |
4 | वाहतूक खर्च | 0.20 ₹ |
| एकूण खर्च | 6.00 ₹ |
अ.नं. | पदार्थ | किंमत |
| केळी | |
1 | केळी खरेदी (नग – 2) | 5.80 ₹ |
2 | वाहतूक खर्च | 0.20 ₹ |
| एकूण खर्च | 6.00 ₹ |
अ.नं. | पदार्थ | किंमत |
| शेंगदाणा चिक्की | |
1 | शेंगदाणा चिक्की (प्रमाण 20 ते 40 (शेंगदाणे,गूळ,वेलची हे घटक असावेत) | 5.50 ₹ |
2 | इंधन खर्च | 0.30 ₹ |
3 | वाहतूक खर्च | 0.20 ₹ |
| एकूण खर्च | 6.00 ₹ |