KALIKA CHETARIKE NEW UPDATES

 

    2022 23 शैक्षणिक वर्षातील सुरू असलेल्या कलिका चेतरिके उपक्रमाचे शाळा स्तरावरती पूनर्बलन करणेविषयी… 




 




 

 

    कोविड महामारीमुळे विद्यार्थ्यांच्यात निर्माण झालेले अध्ययन अंतर भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक सरकारने कलिका चेतरीके उपक्रमाची घोषणा केली आहे.2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा व्याप्तीमध्ये या उपक्रमाचे आयोजन योग्यरीत्या होण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्ययन पत्रके/कृती पुस्तिका तसेच शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शिका इयत्तेनुसार आणि विषयानुसार तयार करून मुद्रण करून सर्व शाळांना त्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यासंबंधी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.




कलिका चेतरीके उपक्रमाचे परिणामकारी अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक कृती खालील प्रमाणे-
1.जागृतीसाठी समुदाय आधारित कृती

ऑगस्ट 2022 या महिन्यात पालक तसेच इतर सामाजिक घटकांचे जागृती करणारा महिना असे जाहीर करण्यात आले आहे या महिन्यात कलिकाक्षेत्रीके कार्यक्रमाविषयी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून पुरवण्यात आलेले कृतिपुस्तिका अध्ययन पत्रके यांच्या विषयी तसेच त्यांच्या वापरासाठी शाळेमध्ये करण्यात आलेली उपायोजना याविषयी पालकांच्या मध्ये जागृती करण्यासाठी पालक सभा आयोजित करणे.

शाळा शिक्षण व्याप्तीतील गाव/तालुका पंचायत एसडीएमसी सदस्य तसेच इतर शिक्षणप्रेमी यांना शाळेमध्ये आवाहन करून या उपक्रमाविषयी जागृती करणे.




2. अंमलबजावणीसाठी पूरक शैक्षणिक मार्गदर्शक तत्वे -:
(1ली ते 3री इयत्तासाठी उपयुक्त)

विद्या प्रवेश कार्यक्रम ऑगस्ट 31 रोजी समाप्त करणे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कृती पुस्तकातील मूल्यमापन दाखल्यांचे संग्रह करून त्यांच्या कृती संचयीमध्ये ठेवणे.

कलिका चे तरीके शी संबंधित पहिली ते तिसरी इयत्ता पर्यंत किती दिवस यांच्याकडून करण्यात आलेले कन्नड भाषा गणित तसेच इंग्लिश भाषेचे अभ्यास पुस्तक आणि कलिका चेतरिकेमधील निपुण भारत कृतींची सुधारित पुस्तके वापरण्यासाठी शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करणे.(N सुचित पुस्तक म्हणजे कालिका चेतरिकें सराव पुस्तक)

 


चौथी ते नववी साठी उपयुक्त अंश – 
कलिका चेतरिकेशी संबंधित चौथी ते नववी इयत्ताना पुरवण्यात आलेल्या विद्यार्थी कृतिपुस्तिकामध्ये अध्ययन पत्रिका Perforated/ छिद्रित रूपात देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी कृतिपुस्तकेतील सर्व अध्ययन पत्रके विद्यार्थ्यांच्या कृती संपूट/ विद्यार्थी संचयी (Child Profile)मध्ये जल ठेवण्याची आवश्यकता नाही.फक्त आवश्यक अध्ययन पत्रके मात्र विद्यार्थी संचयी (Child Profile)मध्ये ठेवण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.विद्यार्थ्याना विनाकारण सर्व अध्ययन पत्रके त्यामध्ये ठेवू नयेत याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन करणे.

इयत्ता 4थी ये 9 वी इयत्तांमध्ये कलिका चेतरीके उपक्रमाचे अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वीच डीएसईआरटी कडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक परिपत्रक आणि वेबसाईटवरील अपलोड झालेल्या साहित्यांचे अवलोकन करण्यास शिक्षकांना माहिती देणे.

3. मूल्यमापन नोंद दाखले ठेवण्यासाठी उपयुक्त बाबी -:
प्रस्तुत वर्षांमध्ये कलिकाचे त्रिके उपक्रमाचे आयोजन केले असल्याने शिक्षकांचे कागदपत्रांचे ओझे टाळण्यासाठी SATS मध्ये FA-1, FA-2, FA-3, FA-4 प्रगती अपलोड करण्याची आवश्यकता नाही.त्याऐवजी SATS मधील SA-1, SA-2 प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी पावले उचलण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांना माहिती देणे.




4. शैक्षणिक अनुपालनास समर्थन देणारे मार्गदर्शक घटक:

अध्ययन पत्रके फक्त लेखन, गृहपाठ आणि पेन व पेपर चाचण्यांपुरती मर्यादित नसावी,तर मुलांमध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाशी मागील वर्गांच्या अध्ययन निष्पत्तीशी सोबत संयोजन करून वर्ग-निहाय अध्ययन प्रक्रिया परिणामकारकपणे राबवणे.




चालू वर्षात वितरीत करण्यात आलेल्या वर्गांच्या पाठ्यपुस्तकांचे आवश्यकतेनुसार पुनरावलोकन करून त्यांना पूरक साहित्य म्हणून वापरण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.

ओदु कर्नाटक, गणित कलिकांदोलन, गणित किट,सायन्स किट,विविध लॅब अ‍ॅक्टिव्हिटीज, टेक्नॉलॉजी मीडिया, शिक्षकांनी बनवलेल्या अध्यापन साधनांचा सर्जनशील वापर करून कलिका चेतरीकेची अध्ययन पत्रके यांच्याशी समायोजन करून पूनष्चेतन निर्माण करणे.

जे विद्यार्थी निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती व दिलेल्या कृती खूप लवकर शिकत असेल तर अशा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, लायब्ररी पुस्तके, कृती कोपरे/स्थळे,बाहेरील शिक्षणाच्या संधी आणि इतर सर्जनशील शिक्षण सामग्रीद्वारे शिकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शिक्षकांना पावले उचलण्याचे शिक्षकाना मार्गदर्शन करणे.शिक्षकांना स्वयंअध्ययन उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

 
 

 

 

४थी ते 9 वी विद्यार्थी कृतीपुस्तिका – CLICK HERE
 शिक्षक हस्तपुस्तिका –  CLICK HERE 
 
abc 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *