VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -1 DAY – 5 (विद्याप्रवेश – दैनंदिन कृती)




 




 

         विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम
खेळता खेळता शिकया तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे
.उदाहरणार्थ
बाहुल्या
,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके
,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत
.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे
.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत
.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा
.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे
.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे
.




विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश – दैनंदिन कृती

आठवडा  1   

दिवस – 5 (शुक्रवार)

    

तासिका

कृतींचे विवरण

 

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

 

पद्धत – 4 थ्या दिवशी घेतलेली कृती 1 पुनरावर्तीत  करणे.

 

 

गुजगोष्टी

दिवस 4 था मधील गुजगोष्टी या विभागातील कृती पुन्हा करणे.

 

माझा वेळ (Free Indore play)

दिवस-  5 वा

मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे.

 शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे.

 

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य: वर्गीकरण, परिसराबद्दल जागरुकता

कृती 17 : गट करणे.                                     (ध्येय-3)

उद्देश : – वस्तूंचे भौतिक लक्षणावर आधारित वर्गीकरण करणे

आवश्यक साहित्य : वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक, बटणे, गोट्या, नट, अंगठ्या, खेळणी/ गणित अध्ययन कीट

पद्धत : वस्तूंच्या भौतिक लक्षणावर आधारित  तुलना करा आणि त्यावर आधारित वस्तूंचे गटामध्ये विभागून, त्यांच्यामधील फरक जाणून घेणे.

उदा. : विविध प्रकारचे ब्लॉक, बटने, गोळ्या, नट, बिया, अंगठ्या यांचे आकार, आकारमान, रंग यांच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करणे.

या प्रक्रियेचा अनुभव घेतल्यानंतर, कोणत्या लक्षणांच्या आधारे गटांमध्ये वर्गीकरण केले आहे ते जाणून घेवू.

इयत्ता दुसरी –

1. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध वस्तू आणि खेळाच्या साहित्यांचे आकार, आकारमान आणि रंगांच्या आधारे वर्गीकरण करून दाखविणे.

2. वस्तू कोणत्या आधारे वर्गीकृत केलेल्या आहेत?

इयत्ता तिसरी –

बॉल, अंगठी, चिंचोके, गोळ्या, मणी इत्यादी वस्तू दाखवून त्यांचे नाव आणि भौतिक लक्षणांबदल सांगणे.

 

v सोडवायची सराव पत्रके : I.L-4 ( इयत्ता 1 ली, 2 री, 3 री  )

 

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

( मुलांच्या कृती)

सामर्थ्य: सूक्ष्म चालना कौशल्यांची अभिवृद्धि आणि सृजनशीलतेचा विकास   

कृती 35 : माती किंवा पीठापासून आकार / वस्तू तयार करणे.     ध्येय-1

उद्देश:

·        सूक्ष्म स्नायूंची हालचाल वृद्धिंगत करणे.

·        डोळे आणि हातांचा समन्वय साधने साध्य होते.

·        मुलांच्या कल्पनेतील आकार तयार करण्याबरोबरच सृजनशीलतेच्या अभिव्यक्तीसाठी साठी मदत करणे.

आवश्यक साहित्य : चिखल किंवा मळलेले पीठ

पद्धत : मुलांना चिखल / मळलेले पीठ देवून त्यापासून त्यांच्या इच्छेने नमुने तयार करण्यास सांगणे. सणांना संबधित पणती इत्यादी सारख्या वस्तू तयार करून त्यांना रंगवायला सांगणे. मुले माती अथवा मळलेले पीठ वापरून वस्तू तयार करण्यासाठी सुलभकारांनी निरीक्षण करून सहकार्य करणे. कृती पूर्ण झाल्यानंतर मुलांनी तयार केलेल्या आकार/ वस्तूचे त्यांच्या भाषेत वर्णन करणे. सुलभकार मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी लहान धार नसलेला प्लास्टिक चाकू, साचा, लाटणे, फुले, रंग यासारखी इतर साधने देवू शकतात. आकार / वस्तू वैविध्यपूर्ण करण्यासाठी बिया, चित्रे, दगड, शिंपल्या इत्यादी द्यावेत. कृतीच्या नंतर मुले आपले हात स्वच्छ धुतील याची काळजी घेणे.

टीप : इयत्ता 2 री आणि 3 री साठी विविध विषयानुसार ( सण, समारंभ, स्वयंपाक खोलीतील उपकरणे ) मॉडेल तयार करणे. 

 

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

 

 

 

श्रवण करणे व बोलणे

सामर्थ्य: लक्षपूर्वक ऐकणे, सृजनात्मक विचार, परिसर जागरूकता निर्माण करणे.

कृती 5 : शब्द ओळखणे                  

(ध्येय-2)  ECL-5

उद्देश: *प्रश्न विचारण्यासाठी मुलांमध्ये श्रवण कौशल्याचा विकास करणे.

*औपचारिक संभाषणाचे कौशल्य विकसित करणे.

* श्रवण केलेल्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करणे.

* सृजनशील स्व-अभिव्यक्तीला वाव देणे.

* आजूबाजूच्या परिसराविषयी जागरूकता निर्माण करणे.

पद्धत : मुलांना वर्तुळाकारात बसविणे.

होय/ नाही यावर आधारित प्रश्न विचारून विचार करून शब्द कसा शोधायचा हे दाखविणे.

उदा : मुलांना विचार करून सांगण्यासाठी प्रोत्साहित करणे. समजा हा आंबा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यास व विचार करून उत्तर देण्यास प्रेरित करणे. शिक्षक ‘आंबा’ या शब्दाला अनुसरून होय/ नाही उत्तर येईल असे प्रश्न विचारतील.

उदा: ही वस्तू आहे का? हे फळ आहे का? ही भाजी आहे का? हा प्राणी आहे का? ही व्यक्ती आहे का?

 

·        हे हालचाल करते का?

·        हे वर्गात आहे का?

·        हे जंगलात मिळते का?

·        मुलांना या कृतीचा परिचय करून दिल्यानंतर या पद्धतीने बरोबर उत्तर येईपर्यंत प्रश्न विचारत राहणे.

टीप : 3 री चे विद्यार्थी वरीलप्रमाणे स्वतः प्रश्न  विचारतील आणि 2 रीचे विद्यार्थी त्यांना योग्य असे उत्तर देतात. 

 

आकलानासहित वाचन

सामर्थ्य: छापील मजकूराची जाणीव , शब्द ओळख, आकलन, शब्द भांडाराची वृद्धी आणि पर्यावरण जागरूकता.

कृती 18 : चित्र संचयिका                                                    ( ध्येय 2 )

विषय : ‘तुम्ही बागेत पाहत असलेल्या वस्तू / गोष्टी’.

उद्देश:

·        मुलांनी चित्र पाहणे आणि चर्चा करून अर्थ समजून घेवून वैयक्तिक संचयिका तयार करणे.

·        अनुभव आणि पूर्वज्ञानावर आधारित कल्पना करणे / अंदाज बांधणे.

 

आवश्यक साहित्य : कागद, क्रेयॉन्स, डिंक, बागेशी संबंधित चित्रे, गोष्टी, कविता, गाण्यांची यादी

पद्धत : मुलांना परिचित असलेली गाणी आणि बालगीतांना संबधित चित्रे निश्चित करणे.

गाणे / कथेमध्ये असलेले वेगळे / विशेष शब्द ओळखून सांगतील. मुलांनी सुचविलेले शब्द शिक्षकांनी फळ्यावर लिहतील. त्या शब्दांवर चर्चा करतील. आणि संबंधित परिचित शब्दांच्या आधारे शब्दकोश फळ्यावर किंवा तक्त्यावर लिहून चर्चा करतील.

मुलांना पेपर, क्रेयॉन्स आणि इतर संबधित साहित्य देवून बागेचे चित्र पाहून किंवा बागेमधील आधीच्या अनुभवावर आधारीत मुलांना चित्र काढण्यास आणि त्यामध्ये रंग भरण्यास प्रेरित करतील.

वैयक्तिक चित्र संचयिका :

मुलांनी काढलेली चित्रे त्यांच्या वैयक्तिक चित्र संचायिकेत संग्रहित करायला सांगणे आणि त्यांना पुढे 6 व्या दिवशी चर्चा करण्यास सांगणे.

उदा : फुले झाडे, पक्षी, मुलांची खेळण्याचे साहित्य, बसण्याचे बाक इत्यादी.. चित्रे / व्हिडीओ / क्षेत्रभेटीच्या अनुभवावर आधारीत मुले वैयक्तिकरित्या चित्र काढतील याची काळजी घेणे.

बागेशी संबंधित चित्रे / व्हिडीओ / गाणी / गोष्टी वापरून किंवा दाखवून मुलांसोबत चर्चा करता येईल.

शिक्षकांनी 2 री आणि 3 री च्या मुलांना, 1 ली च्या मुलांसोबत परस्पर सहकार्य करण्यास सूचना करणे आणि विस्तारित रित्या चर्चा करताना सर्व मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळेल याची खात्री करणे. तसेच 2 री आणि 3 री च्या मुलांना स्वतंत्रपणे आणखी चित्रे काढून रंग भरण्यास वाव देऊन त्यांनादेखील चित्र संचायिकेत संग्रहित करण्याची संधी देणे.

( सदर कृतीचा पुढील भाग 7 व्या दिवशी चालू ठेवणे.)

 

उद्देशीत लेखन

सामर्थ्य: हात आणि डोळ्यांमधील सुसंगतता

कृती 52 : चित्र काढा                               ( ध्येय – 1 )              ECW – 5

उद्देश:

·         सूक्ष्म चालना कौशल्याचा विकास करणे.

·         हात आणि डोळ्यांमधील सुसंगतता विकसित करणे

आवश्यक साहित्य : फळा / पाटी, खडू

पद्धत : मुलांना विविध चित्रे / आकृती काढण्यास वाव देणे. त्यांच्या कल्पनेतील चित्र काढण्यास सांगणे. मुलांना योग्य वाटतील ती चित्रे काढून रंग भरण्यास सांगणे. मुलांच्या सृजनात्मकतेला वाव द्यावा. शिक्षकांनी आपले विचार मुलांवर लादू नयेत.

टीप : 1 ली च्या मुलांनी काढलेल्या चित्र / आकृतीला 2 री च्या मुलांनी नाव सुचविणे. 3 री च्या मुलांनी चित्राला अनुसरून 1-2 वाक्ये बोलणे. 

 

मैदानी खेळ

कृती : डोळ्यावर पट्टी बांधणे

सामर्थ्य : सूक्ष्म वृत्ती, शोध वृत्ती विकसित करणे.

पद्धत:

·       एका मुलाचे डोळ्यांना पट्टी बांधणे. इतर सर्व मुलांना लपण्यास सांगणे.

·       लपल्यानंतर त्या मुलाने पट्टी सोडून निर्धारित वेळेत इतरांना शोधणे.

·       पट्टी बांधलेल्या मुलाला सर्वात आधी जो सापडतो त्याने हा खेळ पुढे चालू ठेवणे.

·       2 री आणि 3 री ची मुले हा खेळ स्वत: खेळत राहतील.

 

 


 

रंजक कथा

Ø  गोष्ट सांगणे ही एक रोज चालणारी कृती आहे. ही कृती मुलांना छापील साहित्याबद्दल जागृती, शब्दभांडार वृद्धिंगत करणे, श्रवण कौशल्य आणि प्रमाण भाषेतील शब्द समजून घेण्याबरोबरच नितीमुल्ये आणि संस्कार शिकविते.

Ø  गोष्टीचे शीर्षक : सिंह आणि उंदीर

Ø  आवश्यक साहित्य : संभाषण असणारे फ्लॅशकार्ड

Ø  उद्देश:  

Ø विचारशक्ती वाढविणे.

Ø ऐकण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे.

Ø अंदाज बांधण्याची वृत्ती वाढविणे.

Ø प्रश्न विचारण्याच्या वृत्तीचा विकास करणे.

Ø गोष्टीशी संबंधित चित्रे संग्रहित करण्याची आवड निर्माण करणे.

Ø अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणे.

Ø अस्खलित बोलण्याचे कौशल्य विकसित करणे.

पद्धत :  

पात्राभिनय

Ø शिक्षकांनी गोष्टीचे पुनरावलोकन करणे.

Ø गोष्टीचा सारांश सांगण्यासाठी दुसरी आणि तिसरीच्या मुलांना मदत करणे.

Ø  फ्लॅशकार्ड घेवून पात्रांचे संभाषण सांगणे.

Ø मुलांनी गोष्ट सांगताना चूक केल्यास चूक सुधारून त्यानंतर योग्य गोष्ट पुढे चालू ठेवण्यास मदत करणे.

पुन्हा भेटू

·        दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·        दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

·        ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.

00



 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *