विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 1
दिवस – 3(बुधवार)
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज) | दिवस – 2 मध्ये दिलेली शुभेच्छा देवाणघेवाण कृती पुनरावर्तीत करणे. | |
गुजगोष्टी (सकाळच्या सामुहिक कृती) | कृती : 1 स्टॅच्यूचा खेळ (ध्येय – 1) सामर्थ्य : स्वयंप्रज्ञा, धनात्मक व्यक्तिगत संकल्पानांचा विकास, ऐकणे आणि बोलणे. कृतीचा उद्देश : स्वतःचे नाव सांगणे. आवश्यक साहित्य : ऑडीओ (संगीत) प्लेयर (मोबाईल / वाद्य) पद्धत : · संगीत वाजवणे आणि संगीतासह मुलांना नाचण्यास सांगणे. · संगीत थांबले की मुलांनी लगेच मूर्तीप्रमाणे थांबावे आणि पुन्हा संगीत सुरु होईपर्यंत आहे त्या स्थितीत राहावे. अशा सूचना देणे. · स्थिर न थांबणाऱ्या मुलाला ओळखून त्याला “हॅलो, सुप्रभात, माझे नाव ___________.” असे म्हणत खेळातून बाहेर होण्यास सांगणे. · संगीत वाजवत कृतीचे पुनरावर्तन करणे. प्रत्येकाला आपला परिचय करून देण्याची संधी मिळेपर्यंत कृती सुरु ठेवणे. | |
माझा वेळ (Free Indoor play) | दिवस – 3 अध्ययन तयारीचा भाग असलेल्या 8 कोपऱ्यांमधील पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या कोपरावार कृतींबाबत आणि त्या कोपऱ्यातील साहित्य वापरण्याबाबत शिक्षकांनी मुलांना माहिती देणे. मुलांना प्रश्न विचारून समजल्याबद्दल खात्री करणे. (कोपरावार सल्लात्मक कृती देऊन सामर्थ्ये प्राप्त करण्यास अनुकूल होईल अशाप्रकारे अधिक कृतींचे नियोजन करणे.) ************************************************************************* कोपरा – बिल्डींग ब्लॉक्स कोपरा : सामर्थ्य : डोळे आणि हात यांचा समन्वय साधने. कृती : वस्तूंचे वर्गीकरण उद्देश : वस्तूंच्या आकारमानाच्या आधारे वर्गीकरण करणे. आवश्यक साहित्य : अध्ययन संच (कीट) मधील ब्लॉक्स (उपलब्ध असलेले साबण, काडीपेटी, पेस्ट यांचे बॉक्स किंवा पुठ्ठ्याचे बॉक्स इत्यादी) पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) विविध आकारमानाच्या वस्तुंचे आकारमानाच्या आधारे (मोठ्या / लहान) वर्गीकरण करणे. इयत्ता 2 री व 3 री : विविध आकारमानाच्या वस्तू आकारमानाच्या आधारे चढत्या क्रमात मांडणे. ******************************************************************************** कोपरा – गणित कोपरा : सामर्थ्य : वस्तूंचे आकारमान, उंच-ठेंगणा, जड-हलके या आधारे वर्गीकरण करणे आणि चित्रे / संख्यांची तुलना करणे. कृती : आकृत्यांच्या चित्रांना आकृती कार्डे जोडणे. उद्देश : समतल आकृत्या तुलना करून जोडणे. आवश्यक साहित्य : * विविध समतल आकृत्या असलेला चित्र तक्ता * रंगीत कागद कापून तयार केलेल्या समतल आकृत्या (रंगीत कागद कापून तयार केलेल्या समतल आकृत्या चित्र ताक्त्यावरील आकृत्यांशी समान किंवा आकृत्यांपेक्षा लहान असाव्या.) पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) विविध आकृत्यांची चित्रे असलेला तक्ता जमिनीवर ठेऊन त्यावरील आकृत्यांशी जुळणारी रंगीत कार्डे तक्त्यावर ठेऊन जोडणे. इयत्ता 2 री व 3 री : तक्त्यावरील आकृत्यांशी जुळणारी रंगीत कार्डे तक्त्यावर ठेऊन जोडणे आणि वर्गात असलेल्या विविध वस्तूंशी आकृत्यांची तुलना करणे. ******************************************************************************** कोपरा – अन्वेषण किंवा विज्ञान कोपरा : सामर्थ्य : वैज्ञानीक दृष्टीकोन, संशोधनवृत्ती आणि वैचारिक मनोभाव विकसित करणे. कृती : रंगांचा खेळ उद्देश : स्वतंत्रपणे कार्य करत संशोधकवृत्ती विकसित करणे. आवश्यक साहित्य : पारदर्शक प्लास्टिक पेले, पाणी व रंग पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) पाण्यामध्ये रंग मिसळल्यानंतर होणाऱ्या बदलांचे मुलांनी निरीक्षण करणे. इयत्ता 2 री व 3 री : पाण्यामध्ये रंग मिसळल्यानंतर होणाऱ्या बदलांचे मुलांनी निरीक्षण करणे आणि वर्गात असलेल्या विविध वस्तूंशी बदललेल्या पाण्याच्या रंगांची तुलना करणे. ******************************************************************************** कोपरा – बाहुल्यांचा कोपरा : सामर्थ्य : सौंदर्यदृष्टी जोपासणे, व्यक्तिगतस्वच्छता, अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे. कृती : बाहुलीची पावले… माझी पावले… उद्देश : · स्वतंत्रपणे कार्य करण्याची क्षमता विकसित करणे. · डोळे आणि हात यांचा परस्परसंबंध विकसित करणे. आवश्यक साहित्य : बाहुल्या, प्राणी-पक्षी यांचे नमुने, रंग, ड्राॅइंग पेपर, प्लेट पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) बाहुल्यांचे पाय रंगात बुडवून पायांचे ठसे चित्रकला पेपरवर उमटविणे. इयत्ता 2 री व 3 री : बाहुल्यांचे पाय रंगात बुडवून पायांचे ठसे चित्रकला पेपरवर उमटविणे आणि पायांच्या ठशांच्या मापांची तुलना करणे. ******************************************************************************** कोपरा – वाचन / वर्गवाचनालय कोपरा : सामर्थ्य : चित्रे वाचून समजून घेणे, कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती क्षमता विकसित करणे. कृती : चित्र वाचन उद्देश : चित्र ओळखून स्पष्टपणे वाचणे. आवश्यक साहित्य : प्राणी-पक्षी, वस्तू यांची चित्रे पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) चित्र ओळखणे आणि स्पष्टपणे वाचणे. इयत्ता 2 री व 3 री : चित्र ओळखणे आणि स्पष्टपणे वाचणे याबरोबरच शब्दाचे पहिले अक्षर उच्चारणे. ******************************************************************************** कोपरा – कलागृह / हस्तकला कोपरा : सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू विकासासह सौंदर्यदृष्टी जोपासणे, सर्जनशीलता विकसित करणे. कृती : रंगीत बोटे उद्देश : बोटांच्या ठशांपासून नक्षीकाम (आकृतिबंध) करणे. आवश्यक साहित्य : रंग, रेखाचित्रे, जुन्या पुस्तकातील बाहुल्यांची चित्रे (आकृत्या, प्राणी, पक्षी) पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) बोटाचे टोक रंगात बुडवून आकृत्यांच्या रेखाचित्रांच्या कडांवरून बोटांचे ठसे उमटविणे. इयत्ता 2 री व 3 री : बोटाचे टोक रंगात बुडवून आकृत्यांबरोबरच प्राणी-पक्षी यांच्या रेखाचित्रांच्या कडांवरून बोटांचे ठसे उमटविणे. योग्य रंगांचा वापर करणे. ******************************************************************************** कोपरा – लेखन कोपरा : सामर्थ्य : लेखन तयारी सरावात व्यस्त असण्याबरोबरच अक्षरांचे बंध रचणे. कृती : “सीताफळ रंगविणे.” उद्देश : बोटांच्या साध्या हालचालींचा सराव करणे. आवश्यक साहित्य : सीताफळ, सफेद कागद, क्रेऑन्स पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) सीताफळ सफेद कागदावर ठेऊन( कोरलेल्या भागावर क्रेऑन्सच्या सहाय्याने रेषा मारणे. इयत्ता 2 री व 3 री : सफेद कागदावर गुंडाळीच्या आकाराचे चित्र काढणे. ******************************************************************************* कोपरा – खेळणी / करा व शिका कोपरा : सामर्थ्य : वैचारिक क्षमता, सर्जनशीलता, स्वतंत्र कार्य करण्याची क्षमता वाढविणे. कृती : ध्येय गाठ. उद्देश : स्नायू समतोलासह विशिष्ट ध्येय साध्य करणे. आवश्यक साहित्य : मोठा चमचा, चेंडू, बुट्टी, पुठ्ठा पद्धत : विद्याप्रवेश (वि. प्र.) मोठ्या चमच्यामध्ये चेंडू ठेवून तो खाली न पाडता चमचा हातात पकडून शरीराचा समतोल राखून धावत जावून विशिष्ट ठिकाणी ठेवलेल्या बादलीमध्ये चेंडू टाकणे. ही कृती 5-6 वेळा पुनरावर्तीत करणे. इयत्ता 2 री व 3 री : वरील कृती चमचाऐवजी पुठ्ठा घेऊ धावण्याचे अंतर वाढवून सुरु ठेवणे. ******************************************************************************** | |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य : जुळवा, रंगांची कल्पना कृती : 14 रंग जुळवणी. (ध्येय – 3) उद्देश : रंग ओळखणे. आवश्यक साहित्य : डॉमिनो कार्ड्स / विविध रंगांची रंगकार्डे पद्धत : सर्व मुलांना अर्धवर्तुळाकारात बसण्यास सांगणे. प्रत्येक मुलाला एक याप्रमाणे डॉमिनो कार्ड वितरीत करणे, वर्तुळाच्या मध्यभागी विविध रंगांची डॉमिनो कार्डे ठेवणे. त्यानंतर एकाच रंगाची असलेल्या मुलांना पुढे येण्यास सांगणे. हातातील कार्डच्या रंगाशी जुळणारे वर्तुळातील कार्ड शोधून त्यावर ते कार्ड ठेवायास सांगणे. याचप्रमाणे इतर सर्व मुलांनीही पुढे येत रंग ओळखून आपापली डॉमिनो कार्डे जुळवणे. त्यानंतर एका गटाला एकाच रंगाची कार्डे येतील अशाप्रकारे मुलांना जोडण्यास सांगणे. उदा. हिरवा, लाल, पिवळा, निळा इत्यादी रंगांची कार्डे इयत्ता – 2 री मुलांना आपण पाहिलेल्या रंगाशी जुळणाऱ्या रंगाची कमीतकमी दोन पुस्तके दाखविण्यास सांगणे. इयत्ता – 3 री मुलांना आपल्या सभोवतालच्या परिसरातील लाल, हिरवा, निळा, काळा आणि पांढरा इ. रंगाच्या आपण पाहिलेल्या वस्तू / प्राणी / पक्षी / वनस्पती यांची यादी करण्यास सांगणे. | |
सृजनात्मक कला आणि सूक्ष्म स्नायू चलन कौशल्ये (मुलांची कृती) | सामर्थ्य : सूक्ष्म चलन कौशल्यांचा आणि सर्जनशिलतेचा विकास. कृती : 48 कोलाज निर्मिती. (ध्येय-1) कृतीचा उद्देश : · सूक्ष्म स्नायू विकासाला वाव देणे. · मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे. · मर्यादित जागेचे (स्थळाची संकल्पना) भान ठेवत कार्य करण्याची पद्धत समजून घेणे. · फाडणे, कापणे, पकडणे, चिकटविणे इत्यादी कौशल्ये प्राप्त करणे. आवश्यक साहित्य : रंगीत कागद, डिंक पद्धत : मुलांना कागदाचे छोटे छोटे तुकडे करण्यास सांगणे. त्यानंतर ते दिलेल्या रेखाचित्रांवर (झाड, झोपडी, प्राणी किंवा इतर कोण्याही वस्तूचे चित्र) चिकटवण्यास सांगणे. मुलांना कोणत्याही डिझाइनमध्ये कागदाचे तुकडे फाडून स्वतःचे कोलाज बनविण्याची संधी देणे. कापडाचे जुने तुकडे, इतर टाकाऊ वस्तू, पाने किंवा पाकळ्या कोलाजमध्ये चिकटविण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. इयत्तावार विवरण : 2 री व 3 री च्या वर्गातील मुलांना हीच कृती करण्यास सांगून बनविलेल्या कोलाजचे त्यांच्या स्वतःच्या शैलीत आणि भाषेत वर्णन करण्यास सांगा. | |
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता | श्रवण करणे आणि बोलणे | सामर्थ्य : क्रियात्मक स्व-अभिव्यक्ती, ध्वनीसंकेत आणि यमक ज्ञान, पर्यावरण चेतना, शब्दसंपत्तीचा विकास कृती : 3 गाणे, बडबडगीत, कविता, नाटक. (ध्येय – 2) ELC-3 कृतीचा उद्देश : · ध्वनी संकेतांबद्दल जागरुकता निर्माण करणे. · यमक ओळखण्याचे ज्ञान मिळविणे. · क्रियात्मक स्व-अभिव्यक्तीला वाव देणे. · आपल्या सभोवतालच्या परिसराशी परस्पर संबंध निर्माण करणे. आवश्यक साहित्य : सल्लात्मक विषय : वर्गखोलीतील वस्तू पद्धत : मुलांना वर्तुळाकारात थांबण्यास सांगणे. शिक्षकांनी मुलांना परिचित असलेले बडबडगीत म्हणून दाखविणे व आपल्यासोबत मुलानाही म्हणण्यास सांगणे. उदा. लहान माझी बाहुली …. लक्षात ठेवण्याचे मुद्दे : * मुलांना गाण्याचा आनंद मिळण्यासाठी अभिनयासह उत्साहाने गीत गाणे. * मुलांना माहिती असलेले गाणे गाण्यास प्रोत्साहित करा. वर्गवार विवरण : इयत्ता 2 री आणि 3 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अनुकरण करत लयबद्धतेने अभिनयासह गाण्यास सांगणे. (हीच कृती 9 व्या दिवशी पुढे चालू करावी) |
आकलनासहीत वाचन | सामर्थ्य : वाचनाकडे मुलांचा कल कृती : वाचन कोपरा कृतीचा उद्देश : मुलांना अध्ययनात आवड निर्माण करणे. वाचनासाठी वर्गात वातावरण निर्मिती करणे. आवश्यक साहित्य : विविध कथांची पुस्तके, वर्तमान पत्रे, माझे वाचन कार्ड, सफेद कागद, स्केच पेन, सचित्र कोश, चित्रकथा इत्यादी. पद्धत : * मुलांना वाचन कोपर्याकडे पाठविणे. * मुलांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तक निवडण्यासाठी वाव देणे. * पुस्तक वाचण्यास व आनंद घेण्यास प्रोत्साहित करणे. वर्गवार विवरण : इयत्ता 2 री आणि 3 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचन केल्यानंतर व्यक्त होण्यास सांगणे. उदा. वाचनानंतर आपल्या आवडीचे पुस्तक / पात्र / संदर्भ / प्रसंग याबद्दल बोलणे. | |
उद्देशपूर्वक लेखन | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चलन कौशल्य विकास आणि उद्देशपूर्वक लेखन कृती : 37 चित्र काढणे आणि नाव देणे (ध्येय – 2) ECW-3 कृतीचा उद्देश : · चित्र काढण्याद्वारे सूक्ष्म स्नायुंचा विकास करणे. · नाव देण्याद्वारे लेखन कौशल्य विकसित करणे. आवश्यक साहित्य : कागद, क्रेऑन्स आणि रंगीत पेन्सिल पद्धत : * मुलांना आपल्या आवडीचे चित्र काढण्यास सांगणे. उदा. फळ, बाहुली, खेळणी, पुस्तक, फूल इत्यादी. * काढलेल्या चित्राला एक नाव देण्यास सांगणे. वर्गवार विवरण : इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांना थोडे कठीण चित्र काढण्यास सांगणे आणि 3 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखाद्या प्रसंगाचे सोपे चित्र काढण्यास सांगणे. | |
मैदानी खेळ | दिवस – 4 कृती : ‘तळ्यात मळ्यात’ खेळ सामर्थ्य : एकाग्रता वाढविणे, ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे, शरीराचा संतुलन राखणे. आवश्यक साहित्य : चुन्याची / शाडूची पूड पद्धत : · चुन्याच्या पुडीने मुलांच्या संख्येनुसार एक मोठे वर्तुळ काढणे. · मुलांना वर्तुळाच्या रेषेबाहेर थांबण्यास सांगणे. · शिक्षकांनी ‘तळ्यात म्हटल्यास वर्तुळात पुढे उडी मारणे, व मळ्यात म्हटल्यास मागे बाहेर उडी मारणे. · हा खेळ सूचना ऐकून खेळण्यास सांगणे. चुकलेल्या विद्यार्थ्याला खेळातून बाद घोषित करणे. इयत्ता 2 री आणि 3 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही हा खेळ खेळण्यास सांगणे. | |
कथेची वेळ | शीर्षक : सिंह आणि उंदीर आवश्यक साहित्य : मुखवटे उद्देश : · ऐकण्याची क्षमता विकसित करणे. · अंदाज व्यक्त करण्याचे कौशल्य वाढविणे. · वैचारिक क्षमता विकसित करणे. · प्रश्न विचारण्याची भावना निर्माण करणे. · कथेसंबंधीची चित्रे संग्रह करण्याची आवड निर्माण करणे. पद्धत : मुखवटे
मुखवटे वापरून कथेच्या वेळचा मनोरंजनात्मक पद्धतीने वापर करणे. मोठ्या मुलांना भूमिका देऊन अभिनय करण्यास सांगणे. कथा सांगितल्यानंतर सोपे प्रश्न विचारणे. (कथेचा आनंद घेण्यासह ती व्यवस्थित ऐकत असल्याबाबत खात्री करणे.) | |
पुन्हा भेटू | · आज पूर्ण केलेल्या कृतींचे पुनरावलोकन / स्मरण करणे. · आज मुलांनी पूर्ण केलेल्या सर्व कृती पालक आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सामायिक करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने परततील यासाठी एक छोटीशी आनंददायी वातावरण निर्मितीची कृती करू मुलांना निरोप देणे. “तूच करून बघ” ही कृती करण्यासाठी नियोजन करणे. | |


.png)





