Department of School Education And Literacy,Karnataka (शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग – कर्नाटक)

 


 

कर्नाटकातील प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण विभागाचे नाव ‘शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग’ असे बदलले…..



 

देशातील बहुतेक राज्यांमध्ये 12वी पर्यंतचे शिक्षण शाळा शिक्षण व्याप्तीमध्ये घेण्यात आले आहे.राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 मधील सदर गोष्टीचा विचार करण्यात आला आहे.

या संदर्भात, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे नाव (सार्वजनिक शिक्षण आणि पदवीपूर्व शिक्षण विभागासह) ‘शालेय शिक्षण विभाग’ असे बदलणे योग्य आहे, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत केंद्र सरकार व जास्तीत जास्त राज्यांमध्ये “शालेय शिक्षण विभाग” हे नामकरण स्वीकारण्यात आल्याने कर्नाटक राज्यामध्ये याच पध्दतीने नामकरण व्हावे असे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मंत्री यांनी आपल्या प्रस्तावात सूचित केले होते.



 

या प्रस्तावावर कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभाग यांचे अभिप्राय घेण्यात आले आहेत.
वरील सर्व बाबींची परिशिलना करून कर्नाटक सरकारने प्रस्तुत कर्नाटक सरकारच्या सचिवालयात प्राथमिक तसेच पदवीपूर्व विभाग असे म्हटले जाणाऱ्या विभागाचे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग’ असे नामकरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभाग यांनी यासंदर्भात सुधारणा करणेविषयी सूचना देण्यात आली आहे.





अधिकृत आदेश खालीलप्रमाणे

Screenshot 2022 06 24 20 54 17 60 e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f



Share with your best friend :)