SSLC KARNATAKA SCIENCE IMP QUESTION BANK ( 2,3 MARKS)

   


     

STATE – KARNATAKA  

                EXAM – SSLC

               BOARD – KSEEB,BANGALORE.

                SUBJECT – SCIENCE

            CATEGORY – IMP QUESTIONS & ANSWERS 








    

                   इयत्ता  दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त होतील असे प्रश्न व त्यांची उपलब्ध करून देताना आनंद होता आहे. (Source – Social Media).

      

मुलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण

 

1) खाली दर्शवलेले गुणधर्म आवर्तन कोष्टकामधील गट आवर्तनात कसे बदलतात ते लिहा?  

 

उत्तर – 1.विद्युत धनभारित्व : विद्युत धनभारित्व गुणधर्म
आवर्तन कोष्टकात उजवीकडून डावीकडे कमी
होतात व गटात वरून खाली जाताना वाढतात.

2.अणूत्रिज्या : आवर्तन कोष्टकात अणुत्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होते व गटात वरून खाली जाताना वाढते.

 

 

2) डोबेरायनरच्या वर्गीकरणाला कोणत्या  मर्यादा होत्या?

 

 

उत्तर – 1. डोबेरायनर त्रिके हा नियम फक्त कांही मूलद्रव्यांच्या बाबतीत लागू पडतो.
2.उदा. Li,Na,K पण समान गुणधर्म असणारे उदा. Na,P,As यांना त्रिके नियम लागू होत नाही.
3. जसजसा मूलद्रव्यांचा शोध लागला तसा हा नियम उपयोगी ठरला नाही.

 

 

3) न्यूलँड च्या अष्टक नियमाच्या कोणत्या मर्यादा होत्या?

 

 

उत्तर – 1) न्यूलँड अष्टक नियम हा सर्व मुलद्रव्या साठी उपयोगी नाही तो फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू पडतो.

2) न्यूलँड अष्टक नियमा नंतर शोध लागलेले सर्व मूलद्रव्ये अष्टकाच्या नियमाचे पालन करत नाहीत.

3) न्यूलँडनी निसार्गात फक्त 56 मूलद्रव्ये आहेत असे सांगितले.व भविष्यात नवीन मुलाद्रव्याचा शोध लागणार नाही असे सांगितले.

4) न्यूलँडनी निष्क्रिय मूलद्रव्यांचा विचार केला नाही.रसायनशास्त्राची संगीताशी तुलना केली.

5) कोबाल्ट निकेल एकाच स्तंभात आहेत परंतु त्यांना फ्लोरीन क्लोरीन आणि ब्रोमिन या स्तंभात स्थान दिले आहे त्याचे गुणधर्म भिन्न आहेत कोबाल्ट व निकेल यांच्यासारखे गुणधर्म असणाऱ्या लोखंडाला या मूलद्रव्यांपासून दूर चे स्थान आले आहे.

 

 



4) मूलद्रव्याचे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील स्थान व आधुनिक आवर्तसारणीतील तुलना करा व फरक लिहा.

उत्तर –

 

 




 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now