मे व जून २०२१ या उन्हाळी सुट्टीतील मध्यान्ह आहार (Mid Day Meal) खर्च वियार्थ्यांच्या / पालकांच्या बँक खात्यात जमा करणेसंबंधी
मध्यान्ह आहार (Mid Day Meal) योजनेंतर्गत,मे आणि जून २०२१ या उन्हाळी सुट्टीतील मध्यान्ह आहार तयार करण्यास येणारा खर्च इयत्ता 1 ते 8 मधील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करणेऐवजी शाळेच्या खात्यावरून NEFT द्वारे जमा करणेस सवलत दिलेबाबत.
मे व जून २०२१ महिन्यातील एकूण 50 दिवसाचे जेवण तयार करण्यासाठी येणारा खर्च मध्यान्ह आहार योजने अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना DBT ऐवजी शाळेच्या बँक खात्यात जमा करणेसंबंधी सरकारने प्रक्रिया सुरु केली आहे.मध्यान्ह आहार योजनेनुसार 1 ली ते 5 वी साठी 4.97 रु.प्रमाणे 50दिवसांचे एकूण 248/- रु. प्रती विद्यार्थी व 6 वी ते 8 वी साठी 7.45 रु. प्रमाणे 372/- रु. प्रती विद्यार्थी या प्रमाणे प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला खर्च देण्यात येणार आहे.
ही रक्कम मुख्याध्यापकांनी 31-03-2022 पूर्वी विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यावर जमा करून शाळा SDMC कडून दृढीकरण करणे व अक्षर दासोह कार्यालयात वरदी देणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया करताना मुख्याध्यापकांचे कार्य –
सन 2020-21 मधील मे व जून 2021 महिन्यातील 1 ली 7 वी / 8 वी वर्गातील पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करणे.
31-03-२०२2 पूर्वी मध्यान्ह आहार खर्च अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT द्वारे जमा करणे.NEFT सुविधा नसल्यास मुख्याध्यापकांनी बँक चेक मार्फत विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यांची यादी (PAYEES LIST) करून अनुदान जमा करणे व संबंधित रेकॉर्ड ठेवणे.
जर विद्यार्थ्याचे बँक खाते काढले नसेल तर SDMC चे दृढीकरण घेऊन विद्यार्थ्याच्या पालकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करणेसाठी आवश्यक कार्य करणे.
शाळेच्या SDMC अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती रचणे व त्यांची सभा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार यादी तयार करून विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात सदर अनुदान जमा करणेविषयी योग्य कार्य हाती घेणे.
शालेय स्तरावर मे व जून 2021 महिन्यातील 1 ली 7 वी / 8 वी वर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मे आणि जून २०२१ या उन्हाळी सुट्टीतील मध्यान्ह आहार तयार करण्यास येणारा हा खर्च 1 ली ते 5 वी साठी 248/- आणि 6 वी ते 8 वी साठी 372/- रु. प्रमाणे जमा झाल्याची खात्री करून सदर अनुदानाची एकूण रक्कम,एकूण विद्यार्थी व NEFT,चेक नंबर इत्यादी माहिती संबंधित तालुका पंचायतीच्या अक्षर दासोह अधिकाऱ्यांना 02-04-2022 पूर्वी सादर करणे.