प्रकरण 7 . नियंत्रण आणि समन्वय
प्राणी – चेतन संस्था
अक्षतंतू –
तयार झालेली विद्युत दिपणे अक्षतं तू स्वीकारतात
तेव्हा ती उत्तेजीत होऊन काही रसायने बाहेर सोडतात.
सिनॅप्स –
तयार झालेली
रसायने दोन चेतन पेशीमधील गॅप्स बाजूला असणाऱ्या चेतन पेशीतील प्रतानमध्ये सोडतात.
मानवी चेतन संस्था
मेंदू
मज्जारज्जू
मज्जारज्जू –पाठीच्या कण्यात जाणारी एक लांब व दंडगोलाकार नळी असते.मज्जारज्जू भोवती अवयवांचे
वेष्टन असते.मध्यभागात तंतू पेशी व धुसट द्रव पसरलेला असतो.
कार्य –
मज्जारज्जू प्रतिक्षिप्त क्रिया पार पडतात.मज्जारज्जूतून 31 जोड्या कशेरू चेतना निघून त्याचे फाटे पूर्ण शरीरभर पसरलेले
असतात.
प्रतिक्षिप्त क्रिया-
बाह्य उद्दिपनाना स्वीकारून त्यानुसार तात्काळ
अनैच्छिक प्रतिसाद देणे त्यास प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
उदा.गरम भांड्याला हात लागल्यास आपला हात तात्काळ पाठीमागे
येतो.
मानवी मेंदू –
मेंदू हा मानवी चेतन संस्थेचा मुख्य केंद्रबिंदू आहे.शरीराचा सर्व भागापासून माहिती मिळवून त्याचे आकलन करतो.मेंदू डोक्याच्या भागात अस्थींच्या कार्यरत कवटीत सुरक्षित असतो.मेंदूवर तीन आवरणे असतात.त्यांना वर्ती असे म्हणतात.प्रत्येक आवरणाच्या दरम्यान द्रवपदार्थ CSF पसरलेला असतो.
मेंदूचे तीन प्रकार –
1. प्रमस्तू
2. मध्यमस्तू
3. परामस्तू
1.
प्रमस्तू –
मेंदूचा सर्वात मोठा भाग आणि गुंतागुंतीचा असतो.
प्रमस्तूचे 2 भाग – मस्तिष्क आणि उत्तर प्रमस्तू
A) मस्तिष्क या भागात अनेक घड्या पडलेल्या असतात.त्यामुळे तेथे विविध केंद्रे असतात.
श्रवण केंद्रे,दृष्टी केंद्र,रुची केंद्र,सुगंध केंद्र इत्यादी.
मस्तिष्कला स्मरणशक्ती केंद्र असेही म्हणतात.तसेच बुद्धिमता.इच्छाशक्ती.कल्पकता,भावना, युक्तिवाद इत्यादी. केंद्र असतात.
B)उत्तर प्रमस्तू – हा लहानसा भाग असून तो शरीराचे तापमान,झोप,भूक इत्यादी वर नियंत्रण ठेवतो.
2) मध्यमस्तू –
हा भाग
मज्जातंतूपासून बनलेला असून प्रमस्तू व परामस्तूला जोडण्याचे कार्य करतो.
3) परामस्तू – हा मेंदूचा तिसरा भाग असून त्याचे तीन भाग पडतात.
1. मस्तिष्क 2. सेतु 3. मस्तुक
1. मस्तिष्क
या भागात शरीरातील ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण चालते.
मेंदूचा दुसरा मोठा भाग आहे.
मस्तिष्क शरीराचा तोल संभाळते.
सायकल चालविणे धावणे इत्यादी क्रियांवर नियंत्रण ठेवते.
2. सेतु हा भाग चेहऱ्यावरील हावभाव सर्व क्रिया इत्यादींवर नियंत्रण ठेवतो.
3. मस्तुक मेंदूचा सर्वात मागील भाग तो खाली जाऊन मज्जारज्जू उतरतो.
Ø कार्ये – : खोकणे,गिळणे,उलटी येणे इत्यादी अनेक क्रियांवर नियंत्रण ठेवत.
Ø श्वसन हृदयाची स्पंदने,पचन मार्ग इत्यादींवर नियंत्रण.
Ø रक्तदाब,लाळ निर्माण होणे यासारख्या क्रियांवर नियंत्रण ठेवते.
प्रश्न
:
1. प्रतिक्षिप्त क्रिया आणि चालणे या दोन गोष्टीतील
फरक सांगा.
उत्तर –
प्रतिक्षिप्त क्रिया | चालणे |
प्रतिक्षिप्त क्रिया ही क्रिया अनैच्छिक आहे.
ही क्रिया अतिशय जलद गतीने घडते.
विचार करण्यासाठी गरज नसते.
| ही क्रिया ऐच्छिक असते.
ही क्रिया हळुवारपणे घडते.
ही क्रिया करण्यासाठी विचार करण्याची गरज असते |
2. दोन चेतन पेशींच्या मधल्या सिनॅप्स मध्ये काय घडते ?
उत्तर – दोन चेतन पेशीमधील गॅप्स म्हणजे सिनॅप्स होय.तो अक्षतंतूच्या टोकावर तयार झालेली रसायने पुढे ढकलतो.तेव्हा ती रसायने बाजूच्या दुसऱ्या चेतन पेशीत शिरतात.तेव्हा प्रतानमध्ये विद्युत उद्दीपणे तयार होतात.ही उद्दीपणे चेतन पेशी शरीरभर स्नायूंना पोहोचवते.
3. मेंदूच्या कोणत्या भागाचे नियंत्रण शरिराची ढब आणि समतोलत्वावर असते?
उत्तर – मेंदूच्या मस्तुष्क या भागाचे नियंत्रण शरिराची ढब आणि समतोलत्वावर असते.
4. उदबत्तीचा वास आपण कसा ओळखतो ?
उत्तर – सर्वप्रथम उदबत्तीचा वास नाकामध्ये जातो आणि नाकामध्ये असलेल्या ऑलफॅक्टरी चेतन पेशी हा वास घेतात व प्रमस्तूकडे घेऊन जातात व प्रमस्तू हा वास सुगंध मेंदूकडे घेऊन जातात व आपल्याला वास येतो.
5. प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये मेंदूची भूमिका कोणती असते?
उत्तर – प्रतिक्षिप्त क्रिया उद्दीपानांना स्वीकारून त्यानुसार तात्काळ अनैच्छिक प्रतिसाद देणे त्यास प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात.
संकेत आत आणण्याच्या व प्रतिसाद बाहेर नेण्याच्या चेतन्यांचे प्रतिक्षिप्त चाप घडतात.चेतन्या पहिल्यांदा एकत्र येतात तिथे हा चाप आढळतो.शरीरातील सर्व भागाकडून निघणाऱ्या चेतन्या मेंदूकडे जाणाऱ्या मज्जारज्जू मधील एकाच गठ्ठ्यात एकत्र येतात.त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रिया मज्जारज्जूमध्ये जरी घडत असली तरी त्याची सर्व माहिती मेंदूकडे पोहोचत असते.