18. माझ्या लहानपणीची बाग
कवी – माधव ज्युलियन
नवीन शब्दार्थ.
मज – मला
नाद – छंद
कुंद – एक पुष्पवेल
वाटिका – बाग
नयन – डोळा
हर्ष – आनंद
म्या – मी
रावे – पोपट
भृंग – भुंगा, भ्रमर
खेद – दुःख, शोक
लतिका – वेली
जळ – पाणी
वृष्टी – जलधारा, पाऊस
मोह – आकर्षण
ज्ञान – बोध
जलसिंचन – पाणी शिंपडणे
अ. खालील प्रश्नांची एक दोन यात उत्तरे लिही.
1. बाग कोठे तयार केली होती ?
उत्तर –कवीनेआपल्या घराच्या मागील दारी बाग तयार केली होती.
2. कविला बालपणी कोणता छंद होता
उत्तर – कवीला बालपणी फुलझाडांचा छंद होता.
3. बागेत कोणकोणती झाडे लावली होती?
उत्तर – बागेत गुलाब,जाई,जुई,निशीगंध,चमेली,शेवंती,कुंद इत्यादी झाडे लावली होती.
4. बागेतील फुले पाहून कविला काय वाटते ?
उत्तर – बागेतील फुले पाहून कवीला कशाचीही उपमा देता येणार नाही एवढा आनंद होतो.
5. बागेत कसे दंग व्हावे असे कवी म्हणतो?
उत्तर – बागेतील कोकिळ,रावे,मैना,पोपट,पतंग यांची मंजुळ गाणी ऐकत दंग व्हावे असे कवीला वाटते.
6. बागेची जबाबदारी कोणावर सोपविली होती ?
उत्तर – कवीने आपल्या बहिणीवर . बागेची जबाबदारी सोपविली होती.
7. फिरून पुन्हा आल्यावर कविला दुःख का झाले?
उत्तर – कारण कवी जाताना बाग टवटवीत फुलली होती.पण एक वर्षाने परत आल्यावर पाहतो तर ती बाग सुकून गेली होती.ते पाहून कवीला दुःख झाले.
8. बागेने कोणता बोध केला ?
उत्तर – आपल्या सर्वात आवडत्या वस्तू किंवा गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये अस बोध बागेने दिला.
आ. खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर.
उत्तर –
1) गुलाब, जाई, जुई, शेवंती, नाजूक निशिगंध,
मदनबाण, मोतीया, चमेली, लावियला कुंद,
नित्य सकाळी प्रेमभरे मी जलसिंचन करूनी
वाढविलीं जी झाडे, गेली कुसुमाही भरूनी ।। धृ ॥
2) “ती जाईची कोमल लतिका पाहुनि सुकलेली,
अश्रुजळाची वृष्टी तियेवर मोहभरें केली,
प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला!‘
बाळपणींच्या बागेनें हा बोध मला केला ।।4।
ए. खाली दिलेले शब्द त्या खाली दिलेल्या
समानार्थी शब्दांनी सुद्धा ओळखतात. योग्य अशा अक्षरांनी रिकाम्या जागा भर.
1. फूल-
कुसुम
सुमन
पुष्प
2. डोळा – नयन
चक्षू
अक्ष
3. आनंद-
तोष
संतोष
प्रमोद
मोद
हर्ष
4. घर –
धाम
सदन
आलय
भवन
इ. समानार्थी शब्द लिही.
नाद – आवड , छंद
भृंग – भुंगा
कुसुम – फूल
नयन – डोळा
हर्ष – आनंद
खेद – दु:ख
लतिका – वेल
अ.
खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिही.
फुललेली ती पुष्पवाटिका पाहुनि नयनांहीं,
हर्ष जाहला जो हृदयाला उपमा त्या नाहीं
कोकिळ, मैना, रावे,
यावे पतंग वा भृंग,
ऐकुनि त्यांची मंजुळ गाणी व्हावे म्या दंग.
उत्तर – कवीने आवडीने तयार केलेली बाग फुलू लागली होती.त्या बागेतील फुललेली फुले पाहून कशाचीही उपमा देत येणार नाही एवढा आनंद झाला आहे.त्या बागेतील कोकिळ,रावे,मैना,पोपट,पतंग यांची मंजुळ गाणी ऐकत दंग व्हावे असे कवीला वाटते.
ऐ. खाली दिलेल्या शब्दसागरात वीस फुलांची नांवे दडलेली आहेत. ती ओळखून त्यांची यादी तयार कर.
1) अबोली, 2) गुलाब, 3) सूर्यफूल, 4) प्राजक्ता, 5) चाफा 6) जाई, 7) चम्पा, 8) केवडा, 9) लिली, 10) जुई 11) निशीगंधा,, 12) झेंडू, 13) बकुळी, 14) कुमुदिनी, 15) जास्वंदी 16) कमळ, 17) शेवंती, 18) कन्हेर, 19) मोगरा, 20) सदाफुली