१७. एक होती अवकाश कन्या
शब्दार्थ
कर्तृत्व – ख्याती
देदीप्यमान – असामान्य,डोळे दिपवणारे कार्य
लक्षणिय – लक्षात राहण्यासारखे
विद्युलता – वीज
लुप्त – गुप्त होणे, नाहीसे होणे
खालील प्रश्नांची उत्तरे 1-2 वाक्यात लिही.
1. कल्पना चावलाचा जन्म केव्हा झाला ?
उत्तर : कल्पना चावलाचा जन्म 1 जुलै 1961 या दिवशी झाला.
2. तिच्या आईवडिलाचे नाव काय ?
उत्तर : कल्पना चावलाच्या आईचे नाव संयोगिता व वडिलांचे नाव बनारसीलाल होय.
3. लहानपणी कल्पनाला कोणता छंद होता ?
उत्तर : सायकलवरून पायडल मारत चेहऱ्यावर येणारा वाऱ्याचा झोत झेलणे हा कल्पनाचा लहानपणीचा छंद होता.
4. इंजिनिअरिंग कॉलेजात तिने कोणता विषय निवडला ?
उत्तर : कल्पना चावलाने इंजिनिअरिंग कॉलेजात ‘एरॉनॉटिक्स‘ हा विषय निवडला.
5. कल्पना चावलाचा विवाह कोणाशी झाला?
उत्तर: कल्पना चावलाचा विवाह जीन पियरे हैरिसन या अमेरिकन तरुणाशी झाला.
आ. खालील प्रश्नांची उत्तरे 3-4 वाक्यात लिही.
1. कल्पना चावलाच्या कुटूंबाविषयी थोडक्यात लिही.
उत्तर – कल्पना चावलाच्या वडिलांचे नाव बनारसीलाल व आईचे नाव संयोगिता होते.त्यांना संजय नावाचा एक भाऊ व सुनिता आणि दीपा या दोन बहिणी होत्या.कल्पना चावला या कुटुंबातील सर्वात लाहान होत्या.
2. भारतीयाना कल्पना चावलाचा सार्थ अभिमान का आहे ?
उत्तर – स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करून,अभ्यास करून आपल्या हुशारीच्या बळावर कल्पना चावलाने नासा या अंतराळ संस्थेत प्रवेश
मिळवला.नासामध्ये स्वतःला सिद्ध करून कल्पनाने कोलंबिया यानाचे कमांडर पद मिळविले व भारताची पहिली महिला अंतराळवीर हा मान मिळविला.भारताचे नाव अवकाश पराक्रम यादीत समाविष्ट करणाऱ्या कल्पना च्जावालाचा भारतीयाना अभिमान आहे.
3.. कल्पना चावलाचा स्वभाव कसा होता ?
कल्पना चावलाचा स्वभाव हट्टी नव्हता पण आपले म्हणणे खरे करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असे.शाळेत एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ती प्रसिद्ध होती.तिचा स्वभाव धाडसी होता.
4. कल्पनाची अंतराळवीर म्हणून कोणत्या कारणामुळे निवड झाली ?
उत्तर –कल्पना चावलाने 1994 मध्ये नासाच्या अवकाश यात्री विभागात प्रवेश मिळवला. ह्यूस्टन येथील लिंडन जॉन्सन स्पेस सेंटरवर 1995 साली ती प्रशिक्षणासाठी रूजू झाली. येथील उत्तम कामगिरीमुळे अंतराळवीर म्हणून तिची निवड झाली.
5. अवकाश कन्या कल्पना चावलाचा शेवट कसा झाला?
उत्तर – आपल्यावर सोपविलेले काम पार पाडून कोलंबीयाने परतीची तयारी सुरू केली. शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २००३. स्थानिक वेळ ९ वाजून १६ मिनीटे निश्चीत केली. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि सेकंदाचा हिशेब पाळत कल्पनाने पृथ्वीवर परतण्यासाठी संगणकीय प्रक्रिया सुरू केली.पण नियोजीत वेळे आधीच १६ मिनीटे कोलंबीयाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला.जमीनीपासून ६० कि.मी. उंचीवरच यानाचा स्फोट झाला व कल्पना चावला आणि यानातील सर्व अवकाश वीरांचा दुर्दैवी अंत झाला.
इ. रिकाम्या जागा भरा.
1. कल्पना चावलाचा जन्म कर्नाल येथे झाला.
2. कल्पनाच्या दोन बहिणींची नावे सुनिता व दीपा अशी होती.
3. विमान उडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने एरॉनॉटिक्स हा विषय निवडला.
4. कोलंबिया हे यान 16 जानेवारी 2003 या दिवशी आकाशात झेपावले.
5. कल्पना आणि तिच्या सहकाऱ्यांनी कोलंबिया यानातून अवकाश यात्रा केली होती.
ई. खालील वाक्प्रचारांचा अर्थ समजून घे व वाक्यात उपयोग कर
1. टप्पा गाठणे – उद्दिष्ट पूर्ण करणे.
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 300 धावांचा टप्पा गाठला.
2. साकार होणे – खरे होणे, अस्तित्वात येणे
मनीषाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले.
3. निर्धार करणे
– ठरविणे , निश्चय करणे
आम्ही सर्व मित्रांनी दररोज अभ्यास करण्याचा निर्धार केला.
4. रुजू होणे- हजर होणे, पदभार सांभाळणे
आमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापक रुजू झाले.