पाठ – 17 शकुन – अपशकुन
★ नवीन शब्दांचे अर्थ
दांडगा – दृढ, मोठा
हेरणे
– बारकाईने पाहणे
भुरटा
चोर – छोट्या छोट्या चोऱ्या करणारा
स्वाध्याय
अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
१) रामूकाकांच्या
मित्राचे नाव काय?
उत्तर –
रामूकाकांच्या मित्राचे नाव दिनूकाका होते.
२) रामूकाकांचा कशावर विश्वास
होता ?
उत्तर – रामूकाकांचा शकुन अपशकुनावर
विश्वास होता.
३) मांजर कुणाच्या आडवे
गेले?
उत्तर – मांजर रामुकाकांच्या आडवे
गेले.
४) दिनूकाकांचे मांजर कसे
मरण पावले?
उत्तर – दिनूकाकांचे मांजर अकस्मात
एका मोटार कारखाली मरण पावले.
आ) खालील प्रश्नांची २-३
वाक्यात उत्तरे लिही.
१) दिनूकाकांनी
कोणते पाळीव प्राणी पाळले होते ?
उत्तर – दिनूकाकांनी घरी कुत्रा,
मांजर, पोपट हे पाळीव प्राणी पाळले होते.
२) रामूकाकांना मार का लागला?
उत्तर – पावसाळ्यामुळे दारात निसरड झाली होती. रामूकाका
गडबडीने तिथून चालत असताना पाय घसरून पडले व त्यांना मार लागला
३) दिनूकाकांनी रामूकाकाला काय समजावून सांगितले ?
उत्तर – दिनूकाकांनी रामूकाकाला सांगितले की, “रामू, अरे
सकाळी तू घराचा दरवाजा लावून घ्यायला विसरलास म्हणून चोराने ही संधी साधून चोरी
केली. त्यात बिचाऱ्या मांजराची काय चूक ? शिवाय पावसाळ्यामुळे दारात खूप निसरड
झाली होती आणि तू गडबडीत असल्याने तू पाय घसरून पडलास. त्याला सकाळी आडवे गेलेले
मांजर कसे जबाबदार असेल?”
४) दिनूकाकांचा स्वभाव कसा होता?
उत्तर – दिनू काकांचा स्वभाव रामू काकांच्या पेक्षा वेगळा
होता.ते शकुन अपशकुन मानत नसत.त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता.
५) शकुन अपशकुन म्हणजे काय ?
उत्तर – शकुन अपशकुन म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे.
इ) रिकाम्या जागी योग्य शब्द भर.
१) दोघेही शेतात काम
करीत होते.
२)
रामूकाका दरवाजा लावून घ्यायला विसरले.
३) मांजर आडवे
गेले त्याचाच हा परिणाम.
४) आपण
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा.
ई) तर काय झाले असते ते
लिही.
१) रामूकाकाने घराचा दरवाजा लावून
घेतला असता तर चोरी झाली नसती.
२) मांजर रामूकाकांच्या
आडवे गेले नसते तर कांहीही शकुन अपशकुन झाला नसता.
३) रामूकाका गडबडीत चालले
नसते तर पाय घसरून पडले नसते.
४) तुझ्या समोरून मांजर आडवे गेले तर मी त्याचा कांहीं
विचार करणार नाही.
उ) जंगली प्राणी व पाळीव
प्राणी यांची यादी करा.
(वाघ, कुत्रा, अस्वल, शेळी, बैल, मांजर, सिंह, हत्ती, गाय, कोल्हा)
जंगली प्राणी | पाळीव प्राणी |
वाघ | कुत्रा |
अस्वल | शेली |
सिंह | बैल |
हत्ती | मांजर |
कोल्हा | गाय |
ऊ) कंसात दिलेल्या शब्दांच्या
सहाय्याने खालील वाक्ये पूर्ण कर.
(पळविणे, आवडणे, पडणे, जोपासणे, विसरणे)
१) दिनूकाकांना प्राणी पक्षी यांची
आवड होती.
२) रामूकाका दरवाजा लावून घ्यायला विसरले.
३) नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन
जोपासावा.
४) चोराने किंमती वस्तू
पळविल्या.
५) रामूकाका पाय घसरून
पडले.
ए) विरुद्धार्थी शब्द लिहा.
दिवस X रात्र
प्रकाश
X अंधार
सकाळ X रात्र
लहान X मोठा
आवडता X नावडता
जय X पराजय
शकुन X अपशकुन
सरळ X वाकडा
ऐ) समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
अ ब
१) सूर्य १) धरती
२)
पाणी २)
सरिता
३)
मित्र ३) जल
४)
पृथ्वी ४)
भास्कर
५) नदी ५) सखा
उत्तर –
अ ब
१) सूर्य ४)
भास्कर
२)
पाणी ३) जल
३)
मित्र ५) सखा
४)
पृथ्वी १) धरती
५) नदी २) सरिता