इयत्ता – नववी
विषय – मराठी
११. माहेराची वाट
परिचय
:
पूर्ण नाव – इंदिरा नारायण संत (1914-2000)
मराठीतील
नामवंत कवयित्री असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण
कोल्हापूर व पुणे येथे झाले. पुढे वास्तव्य बेळगावात झाले.
प्रसिद्ध काव्यसंग्रह – ‘सहवास‘, ‘शेला‘, ‘मेंदी‘ ‘मृगजळ‘, ‘रंगबावरी‘, ‘बाहुल्या‘, ‘मृण्मयी‘, ‘गर्भरेशीम, चि कला ‘वंशकुसुम‘, ‘निराकार‘ इ. त्यांचे कवितासंग्रह
प्रसिद्ध आहेत.
‘श्यामला‘, ‘कदली‘, हे त्यांचे कथासंग्रह, ‘मृद्गंध‘ हा आत्मकथनपर ललितगद्यसंग्रह
आणि ‘मालनगाथा‘, ‘घुंगुरवाळा‘ हे त्यांचे लोक साहित्य
विषयक लेखनही प्रसिद्ध आहे. ‘गर्भरेशीम काव्यसंग्रहाला
साहित्य अकादमी पुरस्कार व जनस्थान पुरस्कार मिळाला आहे.
प्रस्तुत कविता ‘गर्भरेशीम‘ या काव्यसंग्रहातून घेतली
आहे. सासुरवाशिणीला माहेरची आठवण येते, तिचे डोळे माहेरच्या वाटेकडे
लागतात. तिच्या डोळ्यासमोर माहेरची निसर्गदृश्ये व आठवणी येतात. तेव्हा तिला भास
होतो, की आई तिला भेटण्यास येते, तिची फळाफुलांनी ओटी भरते
आणि ‘तुझे सौभाग्य अखंड राहो!” असा आशीर्वाद देते असे
भावपूर्ण वर्णन या कवितेत आले आहे.
प्र. 1 खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) माहेराची वाट अशी आहे.
(अ) नाजूक निळी मलमल
(ब) हिरवा गालिचा
(क) वळणाची
(ड) घाटमाथ्याची
उत्तर – (अ) नाजूक निळी मलमल
(आ) वेशीवरती हे झाड आहे.
(अ) नारळ
(ब) फणस
(क) कडुनिंब
(ड) वड
उत्तर – (क) कडुनिंब
(इ) माहेरवाशिणीची ओटी याने भरली.
(अ) खणनारळ
(ब) फळे–फुले
(क) तांदूळ
(ड) गहू
उत्तर – (ब) फळे–फुले
(ई) पिसोळी सदैव या वाटेवरून जाते.
(अ) काटेरी
(ब) रूळलेली
(क) ओबडधोबड
(ड) रुंद
उत्तर – (ब) रूळलेली
प्र. 2 खालील प्रश्नांची
उत्तरे एका वाक्यात लिहा.
1 वाटेवर काय अंथरलेले आहे?
उत्तर – वाटेवर नाजुक निळी मखमल अंथरलेली आहे.
2 कडूनिंब काय ढाकतो आहे?
उत्तर – वेशीवरला कडूनिंब एका पावलावर माहेर ढाळतो आहे.
3 ‘जिच्यासाठी माझे माहेर तीच येते’ असे
कोणाला म्हटले आहे?
उत्तर – ‘जिच्यासाठी माझे माहेर तीच येते’ असे माहेरवाशीण
तिच्या आईला म्हणते आहे.
4 तिला काय जवळ वाटत आहे?
उत्तर – तिला आपले माहेरच जवळ वाटत आहे.
5 आई लेकीला कोणता आशीर्वाद देते?
उत्तर – आई आपल्या लेकीला तिच्या
चंद्रकोरीतील कुंकू लेकीच्या कपाळी लावते
आणि तिच्या डोक्यावर केसांच्या भागावर अक्षता टाकून तिचे सर्व शुभ होवो असा
आशीर्वाद देते.
प्रश्न –(2) खालील प्रश्नांची उत्तरे दोन किंवा तीन वाक्यात
लिहा
1. तिचे
डोळे डबडबून का येतात?
उत्तर – मुलीला आशीर्वाद देऊन तिच्या समोरून दूर होताना मुलीच्या
आईचे डोळे अश्रुनी डबडबून येतात.कारण मुलगी माहेराहून पुन्हा तिच्या सासरी जाण्यास
निघालेली असते. तेव्हा तिला पुन्हा चार दिवस माहेरी येऊन जा असे मनातून सांगायचे
असते.
2 ती लेकीला मन भरून कशी भेटते?
उत्तर – माहेरवाशिनीला तिची आई डबडबलेले डोळे सावरीत
भेटते.त्याचप्रमाणे ती हसत मुखाने आपल्या लेकी समोरून निघून जाते आणि ती मुलीला
माहेरी चार दिवस राहण्यासाठी तिने परत यावे म्हणून पुन्हा निमंत्रण देत असते.
प्रश्न 3 संदर्भासहित स्पष्टीकरण
करा.
प्रश्न 1 ‘ तिच्यावर अंथरलेली निळी मलमल कशी नाजुक
की;’
संदर्भ – वरील काव्यचरण कवयित्री इंदिरा
संत यांच्या ‘माहेराची वाट’ या कवितेतील असून ही कविता गर्भरेशीम या
काव्यसंग्रहातून घेतली आहे.
स्पष्टीकरण या ओळीतून कवयित्रीला तिच्या
माहेराला जाणारी वाट ही किती चांगली व सुखदायी आहे.तसेच ती वाट निळ्या मलमलीने
अंथरलेली आहे.आनंदी आहे असे सांगावयाचे आहे.
प्रश्न 2 ‘मोहर ढाळतो पापण्यावरून सुगंध फिरवतो’
संदर्भ – वरील काव्यचरण कवयित्री इंदिरा
संत यांच्या ‘माहेराची वाट’ या कवितेतील असून ही कविता गर्भरेशीम या
काव्यसंग्रहातून घेतली आहे.
स्पष्टीकरण
कवयित्रीला या चरणातून तिच्या माहेरच्या वेशीवरल्या कडुनिंबाचा मोहोर एका
पावलावर ढाळत असून त्या मोहराचा सुगंध माहेरवाशिणी च्या डोळ्याच्या पापण्या
वरून दरवळत जातो असे सांगायचे आहे.
प्रश्न 3 ‘फळाफुलांनी ओटी भरते’
संदर्भ – वरील काव्यचरण कवयित्री इंदिरा
संत यांच्या ‘माहेराची वाट’ या कवितेतील असून ही कविता गर्भरेशीम या
काव्यसंग्रहातून घेतली आहे.
स्पष्टीकरण – जेव्हा माहेरवाशिन आईला भेटण्यास
माहेरी निघाली तेव्हा आईच तेथे आली तिने आपल्या मुलीची ओटी फळा फुलांनी भरून
तिच्या डोक्यावरील केसाच्या भागावर अक्षता टाकून आशीर्वाद देत पुन्हा माहेरी माहेर
पणा साठी येण्यास सांगून निरोप दिला.
खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यात
उत्तरे लिहा
प्रश्न 1 माहेरच्या वाटेचे वर्णन करा.
उत्तर – कवयित्रीच्या माहेरची वाट निळ्या मलमलीसारखी नाजूक असून इतकी नाजूक की मऊ,पिवळ्या
रंगाची पिसोळी त्या वाटेवरुन गेली तर तिला तात्रास न होता ती अगदी अलगद सहज जाईल.ती
वाट अशी आहे की तिला तिचे माहेर अगदी जवळ वाटते. तिच्या माहेरच्या वेशीतला कडूनिंब
तिला दिसतो.त्यांचा सुवासिक मोहोर आसमंत दरवळून जमिनीवर पडलेला दिसतो.
प्रश्न 2 आईच्या भेटीचे वर्णन करा
उत्तर – कवयित्री माहेरपणासाठी जाऊन चार दिवस राहून आईला
भेटण्यास जाते.परंतु तिला असे वाटते की,तिची आईच लेकीला भेटण्यासाठी आली आहे.तिचे
मन भरून येते.माहेरवाशिणीची आई चंद्रकोरीच्या कुंकवाच्या करण्यातील कुंकू चंद्रकोरी
सारखेच लेकीच्या (मुलीच्या) कपाळी लावते. फळाफुलांनीओटी भरते आणि तिच्या डोक्यावर
अक्षता टाकून डबडबलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पहात निरोप घेते.तिला ती पुन्हा
माहेरपणाला येण्यासाठी सांगते.
पुढील प्रश्नांचे उत्तर आठ ते दहा
ओळीत लिहा
प्रश्न 1 या
कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर – कवयित्री इंदिरा संतांनी माहेरची वाट या
कवितेतून माहेरपणासाठी आणि आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झालेली आहे.आपल्या माहेराला
जाणारी वाट अत्यंत जवळची असल्याचे सांगते.तिला ती वाट निळ्या मलमलीसारखी मऊ वाटते. नाजुक अशी
पिवळ्या रंगाची पिसोळी त्रास न होता तेथे जाईल असे वाटते.माहेरच्या गावाच्या वेशीतील
मोहोर ढाळणारा कडूनिंब वृक्षही पावलाच्या अंतरावरच असल्यासारखा वाटतो.मोहोराचा
सुगंध दरवळत असतो. कवयित्री माहेरी
जाण्यास निघ. तोच तिची आई तिला सामोरी भेटायला आल्यासारखे भासते.आईने लेकीचे
स्वागत करून चंद्रकोरीच्या कुंकवाच्या करंड्यातून मुलीच्या कपाळी चंद्रकोर लावली.मुलीची
फळाफुलांनी ओटी भरली.मस्तकाच्या भागावर अक्षदा टाकुन तिला आशीर्वाद दिला. आईने
डबडबत्या डोळ्यांच्या नजरेनीच लेकीचा निरोप घेऊन पुन्हा माहेरपणाला येण्यास सांगून
तिचा निरोप घेतला.
भाषा अभ्यास
(अ) खालील शब्दांचा विग्रह करून
समास ओळखा
1. चंद्रकोर – चंद्रासारखी दिसणारी चंद्रकोर
तत्पुरुष समास
2. हसतमुख – हसत असल्यासारखे,ज्याचे मुख्य चेहरा आहे असा तो
कर्मधारय समास
3. फळे-फुले – फळे आणि फुले इत्यादीं
समाहार व्दंव्द
4. अनंत – अंत नाही
ज्याला असा तो – ईश्वर
नञ बहुर्व्रीही समास
5. भाजी भाकरी -भाजी आणि भाकरी इत्यादींचा
समाहार द्वन्द्व
6. पंचवटी – पाच वाट्यांचा
समूह
द्विगु समास
(आ) अलंकारओळखा व लक्षणे लिहा
1. वेशीवरला कडुनिंब पावलावर मोहर ढाळतो
वरील चरणातील
अलंकार चेतनगुणोक्ती हा आहे
लक्षण – गद्यात किंवा पद्यात एखादा
निर्जीव पदार्थावर सजीवांचा आरोप केला जातो.तेव्हा चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
इथे कडूनिंब एखाद्या माणसाप्रमाणे काही पावलांच्या अंतरावर सुगंधि मोहोर ढाळतो आहे
असे कवयित्री त्यावर मानवी आरोप करते.
2. निळी मलमल अशी नाजूक की .
हा दृष्टांत
अलंकार आहे
लक्षण- गद्यात किंवा पद्यात एखादी गोष्ट
पटविण्यासाठी दुसरे उदाहरण दिले जाते.तेव्हा दृष्टांत हा अलंकार होतो.
(इ ) समानार्थी शब्द लिहा
माता -आई
सुगंध -आकर्षक
सुवास
चिमुकला –लहान,छोटा
फुल –सुमन,पुष्प
डोळे –नयन, लोचन
वाट – मार्ग
(ई) विरुद्धार्थी शब्द लिहा
जवळ X दूर
सुगंध X दुर्गंध
नाजूक Xघट्ट,कडक
माहेर Xसासर
हसत X रडत
abc