पाठ २१ शनिवार वाड्यात कात्रजचे पाणी
शब्दार्थ आणि टीपा
संगीन – दगडी, चिरेबंदी, मजबूत
कातरज – पुण्याजवळ असलेले कात्रज हे डोंगराळ गाव bere
मर्जीस येणे – पसंत पडणे
खासा स्वारी – स्वतः खुद्द (नानासाहेब पेशवे)
मोट – विहिरीतून पाणी काढावयाचे चामड्याचे साधन.
(पूर्वी मोटेच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा केला जात असे.)
तसूभर – थोडे देखील
नळ – पाणी आणावयाचा भुयारी चिरेबंदी मार्ग
गवंडी – बांधकाम करणारे
पाथरवट – दगड घडविणारे
चिरेबंदी – घडीव दगडी बांधकाम
पावेतो – पर्यंत
इनाम – बक्षीस
तजवीज – व्यवस्था, सोय
खजिना – पाणी साठविण्यासाठी बुरुजात तयार केलेला हौद.
टीप :
शनिवारवाडा छ. शाहू महाराजांनी
पहिल्या बाजीरावांना पुणे हे गाव इ.स. 1726 मध्ये इनाम दिले. शनिवारवाडा हे
पेशव्याचे निवासस्थान. इ.स. 1732 ला त्याची वास्तुशांती झाली. शनिवार वाड्यात
कात्रजहून पाणी आणले ते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे (1740 1761) यानी.
शनिवारवाडा हे मराठी राज्यातील एक प्रबळ सत्ताकेंद्र होते.
प्रश्न 1 खालील प्रश्नांची
प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
1. वाड्यात कोणती सोय
नव्हती?
उत्तर- वाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.
2. पुण्याच्या सभोवती
कारकून कशासाठी पाठवले?
उत्तर- पुण्याच्या सभोवती कारकून पाणी पाहावयास पाठविले.
3. कातरजेपासून कोठेपर्यंत
नळ आणला?
उत्तर – कातरजेपासून पुण्यापर्यंत नळ आणला.
4. नळ कसा बांधून आणला?
उत्तर – घडीव दगडी बांधकाम करून नळ बांधून आणला
5. खजिना कोठे करून ठेविला
होता?
उत्तर – खजिना गणेश दरवाजाजवळ बुरुजांमध्ये करून ठेविला होता.
6. गवंड्यास काय इनाम दिले?
उत्तर- गवंड्यास गाव इनाम दिले.
प्रश्न 2 खालील प्रश्नांची
प्रत्येकी दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1.वाड्यात पाणी आणण्यासाठी
श्रीमंत नानासाहेबांनी मनात कोणती मसलत योजली ?
उत्तर – वाड्यात पाणी आणण्यासाठी श्रीमंत नानासाहेबांनी मनात नवे नळ बांधून
आणावे अशी मसलत योजली.
2. पाणी पहावयास गेलेल्या
कारकूनानी आणि श्रीमंतांना काय सांगितले
उत्तर – कातरजेच्या तळ्यात पाणी मुबलक आहे.ते पाणी उन्हाळी देखील आटावयचे नाही
असे आमचे कल्पनेने वाटते हे सांगितले.
3. श्रीमंत नानासाहेबांनी
कात्रज तळ्यातील पाण्याचा अंदाज कसा घेतला?
उत्तर – त्या पाण्याला दहा पाच मोटा अखंड आहोरात्र आठ दिवसापर्यंत चालवून
पाहिल्या.परंतु पाणी तसूभरही कमी झाले नाही.त्यासमयी श्रीमंतांची मर्जी प्रसन्न होऊन
बेत झाला की तेथील पाणी नळ बांधून पुण्यास न्यावे.असा निश्चय होऊन गवंडी बोलावून
नळांचे काम केले.
4. शनिवार वाडा बांधलेल्या
गवंड्यानी कोणती कल्पकता दाखवली होती?
उत्तर – एवढा वाडा बांधतात मग वाड्यात पाणी हे आणावेच लागेल असा विचार करून
गवंड्यांनी वाड्यात पाणी आणण्यासाठी गणेश दरवाजाजवळ बुरुजांमध्ये खजिना करून ठेवण्याची
कल्पकता दाखवली होती.
प्रश्न 3 खालील
प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार-पाच वाक्यात लिहा
1. शनिवार वाड्यात पाणी
आणण्यासाठी श्रीमंत नानासाहेबांनी कोणते प्रयत्न केले
उत्तर – शनिवार वाड्यात पिण्यायोग्य पाणी नव्हते म्हणून नळ बांधून पाणी
आणण्याचे नानासाहेबांनी ठरविले.पाणी पाहण्यासाठी माणसे पाठवली.कात्रजच्या
तळ्याबद्दल माहिती मिळताच.त्या पाण्याला दहा मोठा रात्रंदिवस लावून पाणी उपसले,उन्हाळा
असून सुद्धा पाणी थोडीही कमी झाले नाही.म्हणून तेथील पाणी मजबूत नळ बांधून वाड्यापर्यंत
आणले.
2. नळ कसा बांधून आणला
उत्तर – नळ बांधण्याचे ठरवून गवंडी,पाथरवट यांना कामाला लावले.कात्रजापासून
काळेवावरापर्यंत घोड्यावर बसून स्वार येईल इतका मोठा आणि दगडी चिरेबंदी मजबूत नळ
बांधण्यात आला.पुढे त्यांचा आकार लहान केला होता.नंतर तो बुरूजामधील हौदामध्ये
सोडण्यात आला.
3. शनिवार वाडा बांधलेल्या
गवंड्यावर श्रीमंत प्रसन्न का झाले.
उत्तर – वाडा बांधतानाच गवंड्यानी पाणी बाहेरून वाड्यात आणावे लागेल हा विचार
पूर्वीच करून दूरदृष्टीने गणेश दरवाजाजवळ बुरुजामध्ये पाण्याच्या साठ्यासाठी हौद बांधून
ठेवलेला होता.हे ऐकताच नानासाहेब खुश झाले व त्यांनी गवंड्याना गाव इनाम दिला.
प्रश्न 4 संदर्भासह स्पष्ट करा.
1. “मग सरकारचे
मर्जीस येईल ते खरे “
उत्तर – संदर्भ :वरील वाक्य कृष्णाजी
विनायक सोहनी लिखित ‘शनिवार वाड्यात कात्रजचे पाणी’ या पाठातील असून प्रस्तुत
उतारा पेशव्यांची बखर मधून घेतला आहे.
स्पष्टीकरण -शनिवार वाड्यात पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याचा शोध घेऊन आलेल्या माणसांनी
कात्रजचे तळे सुचवून वरील वाक्य श्रीमंतांना उद्देशून म्हटले आहे.
2 “एवढा वाडा
बांधतात ते पाणी बाहेरून नवे आणतील
उत्तर संदर्भ : वरील वाक्य कृष्णाजी
विनायक सोहनी लिखित ‘शनिवार वाड्यात कात्रजचे पाणी’ या पाठातील असून प्रस्तुत
उतारा पेशव्यांची बखर मधून घेतला आहे.
स्पष्टीकरण – एवढा वाडा बांधतात मग वाड्यात पाणी हे आणावेच लागेल असा विचार करून
गवंड्यांनी वाड्यात पाणी आणण्यासाठी गणेश दरवाजाजवळ बुरुजांमध्ये खजिना करून ठेवला
आहे हे सांगताना गवंड्यांनी वरील वाक्य नानासाहेबांना उद्देशून म्हटले आहे.
प्रश्न 5 योग्य उत्तर निवडा.
1. वाडा कसा होता
उत्तर – मजबूत
2. वाड्यात कोणती सोय
नव्हती
उत्तर – पिण्याच्या पाण्याची
3. कात्रज च्या तळ्यात पाणी
कसे होते
उत्तर – मुबलक
4. आठ दिवसा पर्यंत किती
मोटा चालूवून पाहिल्या
उत्तर – दहापाच
5. नळ केवढा मोठा होता
उत्तर – घोड्यावर बसून स्वार यावा असा
Please next poem and lesson question and answer of 8th marathi