15. कर्नाटक – प्रेक्षणीय स्थळे (15.KARNATAK – PREKSHANIY STHALE)




 

15. कर्नाटक – प्रेक्षणीय स्थळे






नवीन शब्दांचा अर्थ :

दख्खनचे पठार – दक्षिणेचे
पठार (दख्खन हा फार्सी आहे.)

पर्यटनस्थळ सहलीला जाऊन भेट देण्यासारखे स्थळ,पाहून
येण्यासारखे स्थ

सिलिकॉन सिटी – (इंग्रजी शब्द)
कॉम्प्युटरच्या क्षेत्रात प्रसिद्ध स्थळ.

कुटिरोद्योग – घरगुती उद्योग, (केरसुण्या, नारळाच्या
काडयांच्या झाडण्या
, दगडी पाटा वरवंटा इ. वस्तू बनविणे)

वनराई – जंगल, अरण्य

छातीचा ठोका चकणे – खूप भीती वाटणे

दुर्गम – एखाद्या ठिकाणी जाऊन पोहचण्यास अवघड ठिकाण

पायरव – पायांचा आवाज

मलनाड (कन्नड शब्द) मळे पाऊस, नाडू-प्रदेश,

मलनाडू – भरपूर पावसाचा प्रदेश.

पर्यटक प्रवासी

हस्तीदंती- हत्तीच्या दातापासून बनविलेल्या

पुष्करणी – हौद, कुंड

दुतर्फा – दोन्ही बाजूनी

 


अभ्यास

अ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

1. करीनाडू हे नाव कशावरून पडले?

उत्तर – कर्नाटकातील काळ्या सुपीक मातीच्या प्रदेशावरून
करीनाडू हे नाव पडले.

2. आपल्या राज्याची राज्यभाषा कोणती ?

उत्तर – कन्नड ही आपल्या कर्नाटक राज्याची राज्यभाषा आहे.

3. कर्नाटकाचा राजवृक्ष कोणता ?

उत्तर – चंदन हा कर्नाटकाचा राज्यवृक्ष आहे.

4. कोंदणातील पाचू असे कोणाला म्हटले आहे ?

उत्तर – बदामीला कोंदणातील पाचू असे म्हटले आहे.

5. प्राचीन काळातील शिल्पकलेचे उत्तम नमुने कोठे
पहावयास मिळतात
?

उत्तर – प्राचीन काळातील शिल्पकलेचे उत्तम नमुने ऐहोळे व
पट्टदकल येथे पहावयास मिळतात.




आ. खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात
लिहा.

1. कर्नाटकास सुवर्णभूमी असे का म्हणतात?

उत्तर – कर्नाटकात खनिज संपत्ती भरपूर आहे.येथे तांबे, लोखंड,बॉक्साईड,मॅंगनीज सोने ही
खनिज संपत्ती भरपूर असल्याने या भूमीस सुवर्णभूमी असे म्हणतात.

2. कर्नाटकाच्या हस्तकले विषयी लिही.

उत्तर – कर्नाटकच्या सुप्रसिद्ध हस्तकला म्हणजे चंदनाच्या
लाकडावरील कोरीव काम
, शिसवीच्या लाकडात कोरून बसवलेल्या नक्षीदार हस्तीदंती वस्तू,मातीच्या
रंगवलेल्या वस्तू
,बिदरचे बिद्रीकाम,रेशमी कपडा व त्यावरील कशीदा ही
कर्नाटकाच्या हस्तकलेची वैशिष्टये आहेत.

3. कर्नाटकात येणारा पर्यटक सोबत काय घेऊन जातो ?

उत्तर -कर्नाटकात येणारा पर्यटक मलनाडच्या मसाल्याचा स्वाद, मैसूरुच्या
चंदनाचा सुगंध
, कारवारच्या शहाळ्याचा गारवा, धारवाडच्या
पेढ्यांचा व बेळगावीच्या कुंद्याचा गोडवा आपल्या बरोबर घेऊन जातो.

4. कर्नाटकातील अभयारण्यांची नावे लिही.

उत्तर – कर्नाटक म्हणजे पर्यटकांचे नंदनवनच नैसर्गिक व
मानवनिर्मित सौंदर्यस्थळे या प्रदेशात भरपूर आहेत कर्नाटकामध्ये बंडीपुर
,नागरहोळे,दांडेली
बनेरघट्टा ही अभयारण्ये आहेत. रंगणतिट्टु येथे पक्षीधाम (पक्षी अभयारण्य) आहे.

5. विजयापुरातील वास्तूशिल्पकलेची वैशिष्ट्ये लिही.

उत्तर –  विजापूर हे
मुस्लिम वास्तुशिल्प शैलीचे केंद्र आहे. या शैलीत घुमट आणि कमानी यांचे वैभव
पहावयास मिळते.तट
,बुरुज,राजवाडे महाल,मशिदी,मनोरे,थडगे यासारखी
वैशिष्ट्ये विजापूरच्या वास्तुशिल्पकलेत आढळते.




इ.खालील प्रश्नांची उत्तरे चार पाच वाक्यात लिही.

1.बेंगलूरु शहराचे वर्णन कर.

उत्तर – बेंगलूरु ही कर्नाटकाची राजधानी आहे. हे शहर आज
विज्ञान नगरी व सिलिकॉन सिटी म्हणून ओळखले जाते.दूतर्फा वृक्षराजी असणारे येथील
रस्ते स्वच्छ व सुंदर आहेत. चौका-चौकात कारंजे व उद्याने असणारे बेंगलूरु शहर
‘बगिच्यांचे शहर
हे नाव सार्थ करते.येथील विश्वेश्वरय्या म्युझियम मध्ये
विज्ञानाच्या प्रगतीविषयी तसेच निरनिराळ्या यंत्रांबद्दल व अवजारांबद्दल माहिती
मिळते.लालबाग
, इस्कॉन मंदिर,विधान सौधची भव्य इमारत, कब्बनपार्क, वैशिष्ट्यपूर्ण
बांधकाम असणाऱ्या भव्य वास्तू शहराच्या वैभवात भर टाकतात.रेशीम वस्त्रोद्योग व
सुगंधी द्रव्यांची उत्पादन केंद्रेही येथे आहेत.

2. म्हैसूरु शहराचे वर्णन कर.

उत्तर – कर्नाटकात पूर्वीच्या म्हैसूरु राज्याची राजधानी
म्हणून- ऐतिहासिक महत्व असणारे म्हैसूरु शहर आजही आपले वैभवशाली रूप टिकवून
आहे.येथील देवालये
,राजवाडे पाहताना आपण ऐतिहासिक काळात प्रवेश करतो.चर्च,प्राणी
संग्रहालय
,प्रमुख विद्याकेंद्रे, कुटिरोद्योगांची
केंद्रे येथे आहेत.येथील वृंदावन गार्डन मानवी कलाविष्काराचा उत्तम नमुना
आहे.येथून जवळच असणाऱ्या रंगनतिट्टू पक्षीधामामध्ये अनेक प्रकारचे पक्षी पहायला
मिळतात.टिपू सुलतानचा राजवाडा हे उत्तम वास्तुशिल्प आहे.श्रीरंगपट्टण येथील
रंगनाथाचे मंदिर प्राचीन शिल्पकलेचे उदाहरण आहे. येथील शेषशायी विष्णूची काळ्याभोर
पाषाणातील मूर्ती पाहताना डोळ्याचे पारणे फिटते.चामुंडी टेकडी आणि त्यावरील भव्य
नंदी आपल्याला आकर्षित करतो.




3. भैरवक्षेत्र याण या पर्यटन स्थळाबद्दल सविस्तर
लिही.

उत्तर – यल्लापूर तालुक्यातील दुर्गम असे भैरवक्षेत्र याण
हे साहसी भटक्यांचे आवडते ठिकाण आहे.एका बाजूला खोल दरी
,एका बाजूस
उंच डोंगर
, घनदाट झाडी असणाऱ्या अरूंद पायवाटेवरुन जाताना जीव मुठीत
घेऊन चालावे लागते. फक्त पायरव आणि अगदी दिवसाही रातकिड्यांची किर्र
ss किर
SS या आवाजाबरोबर आपल्याला पायपीट करावी लागते.अगदी सूईच्या
टोकाप्रमाणे निमुळते होते गेलेले दगडाचे उंचच उंच सुळके पाहून डोळे विस्फारतात.दरीत
भैरव
,शिवपार्वतीचे मंदिर आहे.छतावर झिजलेल्या दगडातून पाझरणारा
सुर्यप्रकाश झुंबरे लावल्याप्रमाणे दिसतो.या ठिकाणी शहरातील झगमगाट नाही
,दुकाने नाहीत की
गर्दी नाही.तरीही हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करते.

ई.खालील शब्दांचे जोडशब्द लिही.

1. सुजलाम – सुजलाम् सुफलाम

4. निसर्ग – निसर्गरम्य

2. भव्य – भव्यदिव्य

5. हरि – हरिहर

3. नयन – नयनरम्य

6. मन – मनमोहक




उ. विरुद्धार्थी शब्द लिही.

1. परदेशी x स्वदेशी

2. प्रगती X अधोगती

3. सुगंध X दुर्गंध

4. कृत्रीम  X नैसर्गिक

5. अरूंद X रुंद

6. कौतुक X 

ऊ. वाच व समजून घे.

मुबंई -गेट वे ऑफ इंडिया

दिल्ली -लाल किल्ला

पंजाब -सुवर्ण मंदिर

हैद्राबाद – रामोजी फिल्म सिटी

बेंगळुरू – इस्कॉन मंदिर

आग्रा -ताजमहल

म्हैसूर -वृंदावन गार्डन

कलकत्ता -हावडा ब्रीज




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *