चौथी पाठ 13 खरा नायक (13. KHARA NAYAK)




 

इयत्ता  – चौथी 

विषय – मराठी 

पाठ 13 खरा नायक









स्वाध्याय

नवीन शब्दांचे अर्थ

भूमी – जमीन.



नायक – प्रमुख


पळस – एक वृक्ष


अष्टभुज – आठ हात असलेला


पंचमहाभूते – सृष्टीची पाच प्रमुख घटकतत्वे

अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.



१) वरील लघुनाट्यात किती पात्रांचा समावेश आहे?

उत्तर – वरील लघुनाट्यात दहा पात्रांचा समावेश आहे.


२) अंकांची सुरूवात कोणापासून होते?

उत्तर – अंकांची सुरूवात शून्यापासून होते.
३) जगात कोणकोणत्या गोष्टी एकच आहेत ?

उत्तर – जगात सूर्य,चंद्र,पृथ्वी,पाणी,हवा या गोष्टी एकच आहेत.

४) बैलगाडीला चाके किती ?

उत्तर – बैलगाडीला चाके दोन असतात.


५) पंचमहाभूतांची नावे लिही.


उत्तर – आप, तेज, वायू,पृथ्वी आणि जल ही पंच महाभूते आहेत.




 

आ) कोणी कोणास म्हटले ते लिही.


१) “वासरांत लंगडी गाय शहाणी”


उत्तर – वरील वाक्य आठ या अंकाने नऊ या अंकाला
उद्देशून म्हटले आहे.


२) “तीन तिघाडा आणि काम बिघाडा”


उत्तर – वरील वाक्य चार या अंकाने तीन या अंकाला

उद्देशून म्हटले आहे.


३) “शून्याचा विजय असो.

उत्तर – वरील वाक्य सर्व अंकानी शून्याला उद्देशून
म्हटले आहे.


इ) विरुद्धार्थी शब्द लिही.
१) बसणे x उठणे

२) देव X असुर,दानव

३) डावा x उजवा

४) मोठा X लहान

५) मालक x चाकर

६) नायक x अनुयायी




 

उ) फरक समजून घे.

१) पूर – पुर


पूर – जलमय,पाणीच पाणी अशी परिस्थिती

पुर – नगर


२) दिन – दीन


दिन – दिवस


दीन – गरीब


३) ग्रह – गृह


ग्रह – अवकाशीय वस्तू


गृह – घर


४) मन – मण


मन – हृदय


मण – वजनाचे माप



ऊ) जोड्या जुळव.

         ‘‘                ‘



१) शून्य            खरा नायक



२) एक             सूर्य



३)दोन            नाण्याच्या बाजू



४)तीन            पळसाची पाने



५)चार             दिशा



६) पाच          हाताची
बोटे




७) सहा          ऋतू



८) सात        ऋषी



९) आठ         ग्रह



१०) नऊ       साहित्यातील रस



 

प्राण्यांच्या नावावरून येणाऱ्या म्हणी वाच व समजून घ्या.


१) अडला नारायण गाढवाचे पाय धरी.

एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते


२) म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात.


३) वासरात लंगडी गाय शहाणी.

मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो


४) गंगेत घोडं न्हालं.


५) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.

मूळचा स्वभाव बदलत नाही.


६) मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची.




ओळख पाहू.

१) त्याला आहे फार किंमत


पण ज्याला लाभला तो दुःखी


ओळखणार नाही त्याला


मिळेल भोपळा नक्की.

उत्तर – शून्य


२) सुपले कान खांबासारखे पाय


शेपटी बारीक सांगा मी कोण ?

उत्तर – हत्ती


३) पंख नाहीत पण उडे आकाशी


शेपूट हलवितो पण नाही प्राणी, मी कोण ?

उत्तर – पतंग




 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *