इयत्ता – चौथी
विषय – मराठी
९. फेसाटी सामना
कवयित्री
– वत्सला कर्णिक
★ नवीन शब्दांचे अर्थ.
ओव्हर – षटक (सहा चेंडू टाकणे)
विकेट पडणे – बाद होणे. (आऊट होणे)
चित्कार करणे -हत्तीचे ओरडणे
रनर – बॅट्समनच्या जागी पळणारा दुसरा खेळाडू
कॅच – झेल
हॅट – टोपी
फितूर करणे – आपल्या बाजूला वळवणे
फेसाटी – तोंडाला फेस आणणारा
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
१) मांजर काय खेळू लागले?
उत्तर -मांजर क्रिकेट खेळू लागले.
२) हत्तीमामाने आनंद कसा व्यक्त केला?
उत्तर -हत्ती मामाने सोंड फिरवून व मोठ्याने ओरडून आनंद व्यक्त केला.
३) कोणाचा घसा दुखू लागला?
उत्तर -प्रेक्षकांचा घसा दुखू लागला.
४) बोकडमामा काय करतो?
उत्तर – बोकड मामा आपल्या दाढीचे खुंट खाजवतो.
५) कोल्ह्याने कोणती युक्ती केली?
उत्तर – विरुद्ध बाजूच्या संघातील लांडग्याला फितूर करण्याची युक्ती कॉल याने केली.
५) पंचांची हॅट कधी उडते?
उत्तर – जेंव्हा वाघोबा दादा हातात बॅट घेतो तेव्हा पंचांची हॅट उडते.
आ) खालील प्रश्नांची ३-४ वाक्यात उत्तरे लिही.
१) हत्तीच्या क्रिकेट खेळाचे वर्णन कर.
उत्तर – क्रिकेट सामन्यांमध्ये उंदीर मामा ची विकेट पडल्या नंतर हाती मामा क्रिकेट खेळण्यास आले हाती मामाने तोंड फिरवून एक षटकार ठोकला आणि मग स्वतःच मोठ्याने ओरडून त्याचा आनंद व्यक्त केला.
२) कोल्ह्याने कोणता चतुरपणा केला?
उत्तर – बॅटिंगवाल्या संघात सर्वात चतुर कोल्हा होता.त्याने विरुद्ध बाजूच्या संघातील लांडग्याला आपले फितूर बनवण्याचा चतुरपणा केला.
३) अखेरीस सामना कसा संपला ?
उत्तर – सामन्याच्या शेवटी वाघोबा दादा हातात बॅट घेऊन आले.त्यांचा तो अवतार पाहून पंचांची हॅट उडाली व सामना
संपला.
इ) रिकाम्या जागा भर.
१) मांजर क्रिकेट खेळ खेळू लागले.
२) उंदीरमामा पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला.
३) हत्तीने षटकार ठोकला.
४) कॅच उंटाने घेतला.
५) कोल्ह्याने लांडग्याला फितूर केले.
ई) नमुन्याप्रमाणे लिही.
उदा. क्रिकेट – विकेट
१) षटकार – चित्कार
२) ससा – घसा
३) उंट – खुंट
४) चतुर – फितूर
५) बॅट – हॅट
उ) खालील आंतराष्ट्रीय क्रिकेटचे प्रकार शिक्षकाकडून समजून घे.
१) कसोटी क्रिकेट – 05 दिवस
२) वनडे क्रिकेट – 50 ओव्हर्स
३) ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट – 20 ओव्हर्स
*इयत्ता चौथी*
ऑनलाईन टेस्ट
विषय – परिसर अध्ययन
**
*चौथी ऑनलाईन सराव टेस्ट*
*विषय – गणित*
*6.भागाकार*
*5.गुणाकार*
*4. वजाबाकी*
*3. बेरीज*