बालदिनाचे महत्व
भारतात माजी पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल.
बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार् या प्रेमाची आठवण म्हणून 14 नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.
अनमोल सहकार्य – श्री. गिरीष दारुंटे सर,मनमाड. नाशिक
वरील भाषणाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा… CLICK HERE
Pdf व संकलन : गिरीष दारुंटे सर, मनमाड (नाशिक)