कर्नाटक राज्योत्सव दिन भाषण
चंदनाची भूमी
कन्नडीगांची
भूमी
संतांची भूमी
शिव शरणांची
भूमी,
कवींची भूमी,
साहित्यिकांची
भूमी,
शास्त्रज्ञ,संशोधकांची
भूमी,
म्हणजे आपले
कर्नाटक राज्य..
आपल्या कर्नाटक राज्याच्या
राज्योत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
दरवर्षी 1
नोव्हेंबर रोजी सर्व जाती आणि धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने कर्नाटक राज्योत्सव
दिन साजरा करतात.विद्यार्थी मित्रांनो मी या दिवसाबद्दल दोन शब्द माहिती सांगणार
आहे.
1 नोव्हेंबर हा
कर्नाटक राज्योत्सव किंवा कन्नड दिवस म्हणून साजरा केला जातो. याला कर्नाटक
निर्मिती दिवस किंवा कर्नाटक दिवस म्हणूनही ओळखले जाते. 1956 मध्ये, दक्षिण
भारतातील सर्व कन्नड भाषिक प्रदेशांचे विलीनीकरण करून म्हैसूर राज्याची निर्मिती
करण्यात आली.1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे बदलून कर्नाटक
असे नामकरण करण्यात आले.
बेंगळूरू ही
आपल्या राज्याची राजधानी असून ती सिलीकॉन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे.तांबे,लोखंड,बॉक्साईट,सोने
या खनिज संपत्तीने समृद्ध असणाऱ्या कर्नाटकास सुवर्ण भूमी म्हणून ओळखले जाते.कृष्णा,कावेरी,तुंगभद्रा,शरावती
या नद्यांनी कर्नाटकातील भूमीस सुजलाम सुफलाम बनवले आहे.आपल्या कर्नाटक राज्याने
भारतास अनेक कवी,साहित्यिक,शास्त्रज्ञ,नाटककार,चित्रकार,अभिनेते दिले आहेत.
विजयनगर,हम्पी,बदामी,गोलघुमट,बनवासी
यासारखी प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे कर्नाटकाचा वैभवशाली इतिहास सांगतात.जोगचा
धबधबा,गोकाकचा धबधबा,आगुम्बे,कब्बन पार्क इत्यादी ठिकाणे कर्नाटकाच्या नैसर्गिक
सौंदर्यात भर टाकतात.
अशा या आपल्या संपन्न
कर्नाटक भूमीस वंदन करून मी माझे दोन शब्द संपवितो.
ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ
ಉ. ನಾಡೋಜ ಡಾ. ಚೆನ್ನವೀರ ಕಣವಿಯವರ ವಿಶ್ವವಿನೂತನ ವಿದ್ಯಾಚೇತನ (‘विश्वनेता विद्याचेतना’)
सर्व गीतांची चाल समजून घेण्यासाठी खालील गीताच्या नावावरती स्पर्श करा.
ನಾಡಗೀತೆ (नाडगीत ) KARAOKE TRACK
ಆ. ಹುಯಿಗೋಳ ನಾರಾಯಣರಾಯರ “ ಉದಯವಾಗಲಿ ನಮ್ಮ ಚೆಲುವ ಕನ್ನಡನಾಡು (हुइलगोळ नारायणरायाचे ‘उदयवागली नम्मा चेलुवा कन्नडनाडू’)
ಇ. ರಾಷ್ಟ್ರ ಕವಿ ಕುವೆಂಪುರವರ ‘ಬಾರಿಸು ಕನ್ನಡ ಡಿಂಡಿಮವ ‘ (राष्ट्रकवी कुवेंपू यांचे ‘बारिसू कन्नड डींडीमवा’ )
ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ (डॉ. डी.एस. कुर्की यांचे ‘हच्चेवू कन्नडद दीप’)
ಉ. ನಾಡೋಜ ಡಾ. ಚೆನ್ನವೀರ ಕಣವಿಯವರ ವಿಶ್ವವಿನೂತನ ವಿದ್ಯಾಚೇತನ (नाडोजा डा. चेन्नवीर कणवी यांचे ‘विश्वनेता विद्याचेतना’)
ಊ. ಡಾ.ಹಂಸಲೇಖರವರ ‘ ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡ ನಾಡಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು (डॉ. हंसलेखा यांचे ‘हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टीबेकू’)
अधिकृत आदेश – 1 CLICK HERE
परिशिष्ठ – 1 (कार्यक्रम रूपरेषा) CLICK HERE
परिशिष्ठ – 2 (6गीतांचे बोल LYRICS) CLICK HERE
परिशिष्ठ – 3 (शपथ) CLICK HERE
परिशिष्ठ – 4 CLICK HERE