6. APLA MITRA SAP! (6.आपला मित्र साप!) 

इयत्ता – पाचवी 

विषय – मराठी 

पाठ – 6 

पाठ – 6 आपला मित्र साप!


अ.नवीन शब्दांचे अर्थ

भक्ष  – खाद्य                                        

गिल्ला –  तक्रार, बोंब

गाळण उडणे – तारांबळ
उडणे 

दंश करणे – चावा घेणे

आ. खालील
प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

1.गावाकडे
मित्रमंडळी कशासाठी जमली होती
?

उत्तर – गावाकडील
मंडळी गणपतीसाठी जमली होती.

2. गावातील
लोक सर्पमित्र म्हणून कोणाला ओळखत
?

उत्तर – गावातील लोक
सर्पमित्र म्हणून श्रीकाकाला ओळखत.

3. आजोबानी
कोणते वाहन सुरु केले
?

उत्तर – आजोबानी ट्रॅक्टर
हे वाहन सुरु केले.

4. झुंबड
कोठे उडाली होती
?

उत्तर – देसाई
अण्णांच्या शेताजवळ झुंबड उडाली होती.

5. गर्दी
कोणी पांगविली
?

उत्तर – श्रीकाकांनी
गर्दी पांगविली.

6. बिनविषारी
साप भक्ष्याला कसे मारतो
?

उत्तर – बिनविषारी
साप भक्ष्याला वेटोळे घालून आवळून मारतो नी मग गिळतो.

7. सर्वांनी
कोणता संकल्प केला
?

उत्तर – सर्वांनी साप
न मारण्याचा संकल्प केला.

8. सगळेच
साप विषारी नसतात असे कोणी म्हटले?

उत्तर – सगळेच साप
विषारी नसतात असे श्रीकाकांच्या मित्राने म्हटले.

 


इ.खालील
प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिही.

1.जेवणानंतर
मंडळी कोणत्या गप्पा करीत होती
?

उत्तर  – जेवणानंतर मंडळी हवामानाच्या,पिक पाण्याच्या गप्पा
करीत होती.

2.सापापाठी
कोणकोण गेले
?

उत्तर  – सापापाठी श्रीकाका व त्याचे मित्र,लेखक व
त्यांचे बाबा,आजोबा,गुरुजी इत्यादी लोक गेले.

3.श्रीकाकाने
कोणकोणते साहित्य घेतले
?

उत्तर  – श्रीकाकाने पिशवी व त्यात कांही पिशव्या एवढे साहित्य
घेतले.

4. श्रीकाकाने
सापाबद्दल कोणती माहिती सांगितली
?

उत्तर  -श्रीकाकाने सापाबद्दल खालील माहिती सांगितली.

1.सापांना
माणसासारखी स्मरणशक्ती नसते.

2.भूतकाळ लाखात ठेवण्याएवढी
त्यांची बुद्धी विकसित झालेली नसते.

3.साप एक शांतताप्रिया
प्राणी आहे.

4.धामण हा बिनविषारी
साप आहे.

5. भिती पोटी साप स्वत:च्या
रक्षणार्थ दंश करतो.

5. सापाबद्दल
कोणते गैरसमज लोकांमध्ये आहेत
?

उत्तर  – सापाबद्दल लोकांमध्ये खालील गैरसमाज आहेत.

1.      साप सूड घेतात.

2.      रात्री शीळ घातल्यावर साप
घरात येतो
.

3.      साप दूध पितो.

6. साप शेतकऱ्यांचा
मित्र कसा
?

उत्तर  – कारण तो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना
खातो उंदरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवतो म्हणून साप हा शेतकऱ्यांचा मित्र
आहे.

7. सापाचा
आहार कोणता
?

उत्तर  – किडे,कीटक,बेडूक,उंदीर,घुशी,खारी,सरडे,पाली,छोटे
पक्षी व प्राणी इत्यादी सापाचा आहार आहेत.

8. सापाचे
प्रकार कोणकोणते आहेत
?

उत्तर  -धामण,नाग,मण्यार,घोणस,फुरसे,हरानाग,रात,अजगर
इत्यादी सापाचे प्रकार आहेत.

9. विषारी
साप भक्ष कसे पकडतात
?

उत्तर  -विषारी साप आधी विषाने भक्षाला ठार करतात आणि
मग त्याला गिळतात.

10. साप
पाहिल्यानंतर तू काय करशील
?

उत्तर  – साप पाहिल्यानंतर सर्पमित्रांच्या मदतीने
त्याला पकडून जंगलात सोडून येईन.
 


रिकाम्या
जागी योग्य शब्द भर.

1. पावसाची रिप् रिप् नुकतीच थांबली होती.

2. मी बाबांच्या खांद्यावर बसलो होतो.

3. साप जिवाच्या आकांताने सळसळत बाहेर आला.

4.लोकांनी गिल्ला केला.

5. धामणीला जंगलात सोडून येऊ.

6. सगळेच साप विषारी नसतात.

7. शेतकऱ्यांचा मित्र
सापाला म्हणतात.

8.भिती पोटी साप स्वत:च्या
रक्षणार्थ दंश करतो.

9. धामण हा बिनविषारी साप आहे.

10. लोकांचे चेहरे
समाधानी दिसत होते.

ऊ. खालील
वाक्ये कोणी कोणाला म्हटली आहेत ते सांग.

1.
“गुरुजी
, धामण आहे धामण”

उत्तर – वरील
वाक्य ‘आपला मित्र साप’ या पाठातील असून हे वाक्य श्रीकाकांनी गुरुजीना उद्देशून
म्हटले आहे.

2. “मित्रांनो
तुम्ही आधी शांत रहा बर”

उत्तर – वरील
वाक्य ‘आपला मित्र साप’ या पाठातील असून हे वाक्य श्रीकाकांनी गर्दी केलेय लोकाना
उद्देशून म्हटले आहे.

3. “चला
पोरानो
, तुमची परीक्षाच आहे आज असे समजा

उत्तर – वरील वाक्य ‘आपला मित्र साप’ या
पाठातील असून हे वाक्य गुरुजींनी श्रीकाका व त्यांच्या मित्राना उद्देशून म्हटले
आहे.

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा.  

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.