10. GATI ANI ANTARACHE MAPAN (10.गती आणि अंतराचे मापन)

 

10.गती आणि अंतराचे मापन

सारांश – 

●
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या विविध साधनाचा उपयोग केला जातो.

●
प्राचीन काळात लोक पायाची लांबी
, वित, बोटाची रुंदी इत्यादींचा उपयोग म ापनाच्या एककाच्या रूपात करत होते. यामुळे
गोंधळ होत होते यामुळेच एक समान मापन प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

●
आता आम्ही एककांची आंतरराष्ट्रीय एकक मापन पध्दती (
SI Unit) चा उपयोग (करतो. या पध्दतीला सर्व जगाभरातून मान्यता मिळाली आहे.

●
SI
एककांमध्ये लांबीचे एकक मीटर आहे.

●
सरळ रेषेच्या दिशेने होण्याऱ्या गतीला सरळ रेषीय गती असे म्हणतात.

●
वर्तुळाकार गतीमध्ये एखादा वस्तूची गती या प्रकारे होते की त्या वस्तूच्या एका निश्चित
बिंदूपासूनचे अंतर समान राहते.

●
जी गती एका निश्चित वेळेच्या अंतराने पुन्हा पुन्हा होते त्या गतीला आवर्तीय गती असे
म्हणतात.

 

स्वाध्याय

1: हवा, पाणी आणि जमिनीवर
उपयोगात आणल्या जाणाऱ्या दळणवळणाच्या साधनांची प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा.

उत्तर  –   हवा – विमान,
हेलिकॉप्टर

              पाणी  – जहाज,
नाव, होडी

            जमीन – बस, रेल्वे, कार

प्रश्न 2: रिकाम्या जागा भरा.

i) एका मीटरमध्ये 100 cm असतात.

ii) पाच किलोमीटरमध्ये 5000 m असतात.

iii) झोपाळ्यावर बसलेल्या एका मुलाची आवर्तीय गती असते.

(iv) शिलाई मशीनच्या सुईची आवर्तीय गती असते.

v) सायकलच्या चाकाची वर्तुळाकार गती असते.

3: पाऊलाचा उपयोग लांबीच्या प्रमाणित
एककाच्या रूपात का केला जात नाही
?

उत्तर:  कारण प्रामाणित एककाची लांबी सर्व वेळी समान
असावी लागते पाऊलाचा उपयोग लांबीच्या प्रमाणित एककाच्या रूपात केला जात नाही  कारण प्रत्येक व्यक्तीच्या पावलाची लांबी समान असत
नाही.

4: खालील लांबीना त्यांच्या चढत्या
परिमाणामध्ये लिहा.

1 मीटर, 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर

उत्तर: 1 मिलीमीटर,
1 सेंटीमीटर, 1 मीटर, 1 किलोमीटर

5: एका व्यक्तीची उंची 1.65m
आहे. त्याची उंची cm आणि mm मध्ये व्यक्त करा.

उत्तर : 1m =
100cm

त्या व्यक्तीची उंची = 1.65m

= 1.65 × 100 = 165
cm

 

1m = 1000mm

त्या व्यक्तीची उंची = 1.65m

= 1.65 × 1000 = 1650mm

{ त्या
व्यक्तीची उंची =
1.65m = 165cm = 1650mm

6: राधाचे घर आणि तिच्या शाळेमधील
अंतर
3250cm आहे. हे अंतर किलोमीटरमध्ये व्यक्त करा.

उत्तर :

7: एका स्वेटर विणणाऱ्याच्या सुईची
लांबी मोजताना मोजपट्टीवरील जर एका टोकाकडील नोंद
3.0 cm व दुसऱ्या
टोकाकडील नोंद
33.1cm आहे तर सुईची लांबी किती?

उत्तर  – सुईची लांबी = मोजपट्टीवरील दुसऱ्या टोकाकडील नोंद
 – मोजपट्टीवरील पहिल्या टोकाकडील नोंद

= 33.1 – 3.0 30.1 cm

= सुईची लांबी 30.1
cm

8: एका सायकलची गती आणि छताच्या पंख्याच्या गतीतील समानता आणि असमानता लिहा.

उत्तर : 

समानता  – सायकलचे चाक (चाके) आणि छताचा पंखा या दोघांनाही
वर्तुळाकार गती असते व दोघेही एका निश्चित अक्षाभोवती फिरतात.

असमानता – सायकलची चाके वर्तुळाकार गतीने फिरत
असतात आणि रेषीय गतीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.मात्र छताच्या पंख्याला फक्त
वर्तुळाकार गती असते.तो एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही.

9: तुम्ही अंतर मापनासाठी एका लवचिक
रबरासारख्या वस्तुपासून बनलेली मोजफितीचा वापर का करत नाही
? जर
तुम्ही एका अंतराचे मापन करताना लवचिक अशा मोजफितीचा वापर केला तर तुम्हाला तुमचे माप
दुसऱ्यांना सांगताना ज्या समस्या येतात त्यातील काही समस्या लिहा.

उत्तर –

9: आवर्तीय गतीची दोन उदाहरणे लिहा.

उत्तर: आवर्तीय गतीची उदाहरणे :

1) घड्याळाच्या
लंबकाची गती

2) झोक्याची
गती

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now