सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा पांगिरे बी येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांनी आवश्यक पोषक घटका पदार्थ फळे,पालेभाज्या,फळभाज्या इत्यादी साहित्य आणले होते.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका आर.पी.पोवार यांनी समतोल आहार म्हणजे काय,समतोल आहाराचे उपयोग,जीवनसत्वे,खनिजे,क्षार,कार्बोदके,पिष्ठमय पदार्थ यांचे आहारातील महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच प्रत्येक फळ,पालेभाज्या,फळभाज्या इत्यादींचे उपयोग समजावून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.बी.कुंभार यांनी राष्ट्रीय पोषण अभियानाचे उद्देश व महत्व याबद्दल माहिती सांगितली.
शाळेच्या सर्व शिक्षकांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कांही क्षण चित्रे –