पाठ – 4
स्वच्छता गीत
नवीन शब्दार्थ
Ø आवार – घराचे अंगण
Ø तुंबणे – साचणे,जमून राहणे
Ø मोकळी – रिकामी
Ø धुवेन – धुणे
Ø नेमाची – रोजची
Ø आंबलेले – खराब झालेले
Ø टरफले – साली
विरुद्धार्थी शब्द
Ø स्वच्छ × अस्वच्छ
Ø नियमित × अनियमित
Ø उघडे × झाकलेले
Ø घेणे × देणे
समानार्थी शब्द
Ø घर – सदन , वास्तू
Ø रस्ता – पथ , वाट
Ø हात – कर
Ø तोंड – वदन
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
१) प्रत्येकाने आपले घर व गाव कसे ठेवावे ?
उत्तर – प्रत्येकाने आपले घर व गाव स्वच्छ ठेवावे
२) तुंबलेल्या गटाराचे काय करणार आहे?
उत्तर – तुंबलेल्या गटारीतील साचलेली घाण काढून गटारी मोकळ्या करणार आहे.
३) कागद कोठे फेकू नये ?
उत्तर – कागद रस्त्यावर फेकू नये
४) बिया, साली, टरफले टाकण्याची जागा कोणती ?
उत्तर – कचरा कुंडी ही बिया, साली, टरफले टाकण्याची जागा आहे.
आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.
१) आपण काय काय स्वच्छ ठेवणार आहोत ?
उत्तर – आपण नेहमी आपले घर,घराचे अंगण,गाव स्वच्छ ठेवणार आहोत.तसेच नखे,केस स्वच्छ करून वैयक्तिक स्वच्छताही करणार आहे.
२) सकाळी उठल्याबरोबर शरिराची स्वच्छता कशी करावी?
उत्तर – सकाळी उठल्याबरोबर प्रथम शौचाला जावे.नंतर हात पाय स्वच्छ धुवावेत व स्वच्छ टॉवेलने पुसावेत.त्यानंतर दात स्वच्छ घासून अंघोळ करावी व स्वच्छ धुतलेली कपडे घालावे अशाप्रकारे शरीराची स्वच्छता करावी.
३) शिळे, आंबलेले, उघडे पदार्थ का खाऊ नये?
उत्तर – कारण शिळे,आंबलेले व उघड्यावरील अन्न खाण्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अनेक रोग होऊ शकतात.कारण अशा
अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते.
इ) खालील वाक्ये वाचून त्यांचे चांगल्या सवयी व वाईट सवयी यामध्ये वर्गीकरण कर.
चांगल्या | वाईट |
1. आपले घर, आवार स्वच्छ ठेवावे. | 1. तुंबलेली |
2. दररोज आंघोळ करावी. | 2. दररोज हात, पाय,तोंड,धुवू नयेत. |
3. कचरा आणि कागद रस्त्यावर फेकू नये. | 3. शिळे, आंबलेले अन्न खावे. |
4. रस्त्यावरचे उघडे खाद्य पदार्थ खाऊ नयेत. | 4. स्वच्छ कपडे घालू नयेत |
5. बिया,साले,टरफले कचरा कुंडीतच टाकावी. | 5. नखे वाढू द्यावीत. |
ई) नमुन्याप्रमाणे जोड शब्द तयार कर.
उदा. पाला – पाचोळा
१) घर – दार
२)केर – कचरा
३) हात – पाय
४) भाजी – भाकरी
५) चहा – नाष्टा
६) खाणे – पिणे
७) वेणी – फणी
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..
abc