6. PAROPAKARI NARENDRA

 

इयत्ता – चौथी

विषय – मराठी

पाठ – 6

परोपकारी नरेंद्र

LK

 

खालील वाक्प्रचारांचा अर्थ समजून घ्या.

१) काढता पाय घेणे – निघून जाणे.

२) मलमपट्टी करणे – जखमेवर औषधोपचार करणे. I

३) कौशल्य दाखविणे – हुशारी दाखविणे.

४) हळहळणे – दुःख व्यक्त करणे.

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

१) व्यायामशाळेत कोणकोणते व्यायामप्रकार केले जात असत ?

उत्तर – व्यायामशाळेत जोर,कुस्ती,मलखांब,बैठका,वजन उचलणे इत्यादी व्यायामप्रकार केले जात असत

२) साखळी कोणाच्या डोक्यावर आदळली?

उत्तर – साखळी एका माणसाच्या डोक्यावर आदळली.

३) व्यवस्थापक व व्यायामपटूंनी काय केले ?

उत्तर – व्यवस्थापक व व्यायामपटूंनी पळ काढला.

४) देबूदाला दवाखान्यात कोण घेऊन गेले?

उत्तर – नरेंद्र व त्याच्या मित्रांनी देबूदाला दवाखान्यात नेले.

५) विवेकानंद यांनी जगाला कोणती शिकवण दिली?

उत्तर – विवेकानंद यांनी जगाला विश्वबंधुत्व,तत्वज्ञान आणि परोपकाराची शिकवण दिली.

आ) खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिही.

१) देबूदा कसा जखमी झाला?

उत्तर – एकदा एक नामवंत व्यायामपट्टू व्यायामशाळेत वेगवेगळे व्यायाम प्रकार सहज करून दाखवत होता.ते देबुदा व इतर माणसे पाहत होती.त्यावेळी
अचानक लोंबकळणारी साखळी कडाड्कड असा आवाज करीत तुटली व येऊन देबुदा च्या डोक्यावर आदळली व देबुदा जखमी झाला.

२) नरेंद्रने देबूदाला कशी मदत केली ?

उत्तर – नरेंद्रने धावतच देबुदा जवळ गेला.मित्रांना सांगून व्यायामशाळेतील कापूस व पट्टी आणली आणि देबुदाची जखम स्वच्छ करून त्यावर पट्टी बांधली.पण जखम मोठी
होती म्हणून नरेंद्रने देबुदाना दवाखान्यात नेले.देबुदा शुद्धीवर आल्यावर त्यांना त्यांच्या घरी सोडून मलमपट्टीसाठी  थोडे पैसे दिले.अशा पद्धतीने नरेंद्रने देबुदाला मदत केली.

३) देबुदाच्या कुटुंबाविषयी माहिती लिही.

उत्तर – देबुदा एक नाविक होता. गंगेमध्ये नाव चालवून आणि मासेमारी करून तो आपला संसार चालवीत होता.त्याला बायको व तीन मुले होती.

४) समज! नरेंद्रच्या ठिकाणी तू असतास तर काय केले असतेस?

उत्तर – तर मी पण नरेंद्रप्रमाणे देबुदाला मदत केळी असती व औषधोपचार केले असते.

इ) खालील रिकाम्या जागा भर.

१) नरेंद्र आणि त्याचे मित्र दररोज व्यायामशाळेत जात असत.

२) लोंबकळणारी साखळी देबुदाच्या डोक्यावर आदळली.

३) नरेंद्रने देबूदाची जखम स्वच्छ केली.

४) देबूदा हा एक नाविक होता.

५) नरेंद्र हाच पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखला जाऊ लागला.

ई) नमुन्याप्रमाणे कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागी भर.. (परावलंबी, परममित्र, पाहुणचार, परदेशी)

उदा. दुसऱ्याला मदत करणारा परोपकारी

१) घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे  पाहुणचार

२) दुसऱ्या देशातील व्यक्तीपरदेशी

३) दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी

४) खास जिवलग मित्रपरममित्र

Share with your best friend :)