पाठ 4 घरचा वैद्य
अभ्यास
अ.bखालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यात लिही
१.bदिव्या व अंकुर कोठे आली होती ?
उत्तर – दिव्या व अंकुर आजोळी आली होती.
२. बागेत फेरफटका कोण मारत होते ?
उत्तर – बागेत फेरफटका आजोबा मारत होते.
३. झाडावर पक्षी काय करत होते ?
उत्तर – झाडावर पक्षी किलाबिलाट करत होते.
४. कोणत्या रोपामुळे डास कमी होतात?
उत्तर – तुळशीच्या रोपामुळे डास कमी होतात.
५. निसर्ग म्हणजे काय ?
उत्तर – निसर्ग म्हणजे हवा,पाणी,वृक्ष इत्यादी होय.
आ. खालील आजारावरील औषधी वनस्पती औषधांच्या जोड्या लावा.
अ ब
१.सर्दी गवती चहा
२.खोकला आडुळसा
३. पोटदुखी ओवा
४. पित्त आले
५. त्वचाविकार कडुलिंब
इ. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिही.
१. बागेत कोणकोणती झाडे होती ?
उत्तर – तुळस,दुर्वा,सब्जा,गवती चहा,अडुळसा,ओवा,बडिशेप,कोरफड,आले अशा
वनस्पती होत्या. त्याचप्रमाणे कडुलिंब, बेलाचे झाड, आंबा, डाळिंब, पेरु अशी
झाडेही होती.
२. तुळशीच्या रोपाचा काय उपयोग होतो?
उत्तर -तुळशीच्या रोपामुळे हवा स्वच्छ राहते. खोकल्यावर
तुळशीची पाने गुणकारी आहेत. त्याच्या पानांचा रस घेतल्याने खोकला बरा होतो, शिवाय
तुळशीमुळे परिसरातले डास कमी होतात.
३. आजोबांच्या बागेतील औषधी वनस्पतींची नावे लिहा.
उत्तर – तुळस,दुर्वा,सब्जा,गवती चहा,अडुळसा,ओवा,बडिशेप,कोरफड,आले
४. बागेला घरचा वैद्य का म्हटले आहे?
उत्तर – ताप,सर्दी,खोकला,पित्त,पोटदुखी यासारख्या आजारात बागेतील तुळस,गवती चहा,अडुळसा,ओवा यासारख्या वनस्पतींचा उपयोग होतो.म्हणून बागेला घरचा वैद्य म्हटले आहे.
५. पर्यावरणाचे रक्षण कसे करावे?
उत्तर –झाडे लावून त्यांची देखभाल करावी.निसर्गावर,पशुपक्ष्यावर प्रेम करावे व वनराईशी मैत्री करुन पर्यावरणाचे रक्षण करावे.
ई. खालील वर्तुळात वनस्पतींची नावे दिलेली आहेत.
वेल | रोप | झाड |
दोडका | भात | नारळ |
कारले | जोंधळा | चिंच |
द्राक्ष | गहू | पपई |
भोपळा | नाचना | पेरू |
उ. उदा. दर्शविल्याप्रमाणे लिही.
पळणे पळा पळतात
ओरडणे ओरडा ओरडतात
बसणे बसा बसतात
बघणे बघा बघतात
झोपणे झोपा झोपतात
वाचणे वाचा वाचतात
ऊ.
खालील शब्द योग्य क्रमाने लिही.
पान, फांदी, फूल, रोप, बीज, अंकुर, फळ
उत्तर – बीज,अंकुर, रोप,पान,फांदी,फूल,फळ
वरील प्रशोत्तरे PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा…