पाठ – ३
आई मला पावसात जाऊ दे
कवयित्री – वंदना विटणकर
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. पाऊस कोणकोणत्या महिन्यात पडतो ?
उत्तर – पाऊस मे ते नोव्हेंबर महिन्यात पडतो.
२. मुलाला पावसात कसे भिजायचे आहे?
उत्तर – मुलाला पावसात चिंब भिजायचे आहे
३. पाऊस पडल्यानंतर काय झाले ?
उत्तर – पाऊस पडल्यानंतर खिडकीखाली तळे
साचले व गुडघ्याएवढे पाणी भरले.
४. पावसात कवितेतील मुले कोणते खेळ खेळतात?
उत्तर – पावसात कवितेतील मुले होड्या
सोडणे,पाण्यात उद्या मारणे यासारखे खेळ खेळतात.
५. मुलांना पावसाच्या पाण्यामधून कुणाचा पाठलाग
करावासा वाटतो?
उत्तर – मुलांना पावसाच्या पाण्यामधून बेदालांचा व बदकांचा पाठलाग करावासा वाटतो.
६. कवितेतील मुलास पावसात जाण्यापासून आई का
अडवीत असेल असे तुम्हास वाटते ?
उत्तर – पावसात भिजून ताप,खोकला,सर्दी यासारखे आजार होऊ नयेत
म्हणून कवितेतील मुलास पावसात जाण्यापासून आई अडवीत असेल असे वाटते.
आ खालील ओळी पूर्ण कर
1. मेघ कसे हे
गडगड करिती
विजा नभातून मला खुणविती
2. खिडकीखाली तळे
साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
3. बदकांचा बघ थवा
नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
4. धारे खाली उभा
राहुनी
पायाने मी उडविन पाणी I
इ. प्राणी/पक्ष्यांचे नाव व त्यांचे आवाज
त्यांच्या जोड्या जुळव.
(कुंजन, भुंकणे, किलबिल, डरकाळी, चिवचिव, गर्जना, गुणगुण, हंबरणे)
उदा. कोंबड्याचे – आरवणे
१. कोकिळेचे –
२. गायीचे – हंबरणे
३. सिंहाची – गर्जना
४. चिमणीची – चिवचिव
५. कुत्र्याचे – भुंकणे
६. पक्ष्यांची – किलबिल
७. वाघाची – डरकाळी
उ. आईबद्दल तुला काय वाटते? तुझ्या
शब्दात सांग.
आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत.पण या शब्दात आभाळाएवढे सामर्थ्य
आहे.आई माझी खूप काळजी घेते.मला चांगल्या सवयी शिकवते.आईच्या प्रेमापुढे साऱ्या जगाचे
प्रेम फिके पडते. सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे. आईची महती सांगायला माझे शब्द अपुरे
पडतात.
ऊ. कवितेस चाल लावून ती तोंडपाठ कर.
कविता चालीत म्हणण्यासाठी येथे स्पर्श करा…
ए. अक्षरे योग्य क्रमाने जुळवून शब्द लिही.
नमुना – ड ग ड ब – गडबड
१. णा अं तं ग – अंगणात
२. दा बे क डू दा – बेडूकदादा
३. ग पा ला ठ – पाठलाग
४. भा न तू न – नभातून
५. त दि मं रा – मंदिरात
ऐ. खालील वाक्ये वाच व लिही.
१. आईसारखे दैवत नाही.
२. गुरुजनांचा आदर करावा.
३. पाण्याचा वापर जपून करावा.
४. झाडे लावा,झाडे जगवा.
इ. तुमच्या नात्यातील व्यक्तींची नावे लिही.
१. बाबा
२. आई
३. ताई
४. दादा
५. आजोबा
६. आजी
वरील प्रशोत्तरे PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा…