3.चल ऊठ रे मुकुंदा
ही कविता चालीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा..
कवी – सुरेश भट
परिचय :
पूर्ण नाव – सुरेश श्रीधर भट (1932-2003)
मराठीतील एक प्रसिद्ध कवी. यानी मराठीत गझल या काव्य प्रकाराचे पुनरुज्जीवन केले व त्याला आशयसंपन्न असे नवे रूप दिले. त्यामुळे गझल या प्रकाराला बहुमान्यता मिळाली.
‘रुपगंधा‘,’रंग कवितेचा माझा वेगळा‘ हे त्यांचे काव्य संग्रह आहेत. ‘गेयता‘ हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.
पुरस्कार – काव्याबद्दल त्यांना दमाणी,केशवसुत पुरस्कार मिळाले आहेत.
चल ऊठ रे मुकुंदा ही कविता सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा‘ मधून ही कविता निवडली आहे.
या कवितेचा साहित्य प्रकार ‘भूपाळी‘ आहे.
प्रस्तुत कवितेत श्रीकृष्णाला जागवत असल्याचे वर्णन,तसेच प्रातःकाळच्या निसर्ग वर्णन केले आहे.
कवितेचे मुल्य – निसर्ग वर्णन – वात्सल्य
शब्दार्थ आणि टीपा :
उषा – पहाट
कुंज – वृक्षवेलिनी बहरलेली बाग
इशारा – सूचना
शुक्रतारा – एक ग्रह-पहाटे व सायंकाळी उगवणार
कालिंदी – यमुना नदी
प्र 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. यशोदा कोणाला उठवत आहे?
उत्तर – यशोदा श्रीकृष्णाला उठवत आहे.
2. पहाटवारा कसा आला ?
उत्तर – पहाटवारा चोरपावलांनी आला.
3. बेचैन गोकुळाने कोणाचा पुकारा केला?
उत्तर – बेचैन गोकुळाने श्रीकृष्णाचा पुकारा केला
प्र 2. खालील प्रश्नाचे दोन-तीन वाक्यात उत्तर लिहा.
1. गोकुळ बेचैन का झाले होते?
उत्तर – पहाट झाली होती.सर्वत्र लक्ख प्रकाश पडला होता.तरीही अजून श्रीकुष्ण उठला नव्हता म्हणून गोकुळ बेचैन झालेहोते.
प्र3. खालील प्रश्नाचे उत्तर चार-पाच वाक्यात लिहा.
1. कृष्णाला उठविण्याच्या वेळी सृष्टीत काय घडले होते?
उत्तर – यशोदा माता श्रीकृष्णाला पहाटे उठवीत होती त्यावेळी बाहेर चांदण्याला जाग आली होती.पहाटवारा चोर पावलांनी येत होता.आकाशातील शुक्रतारा मंदावला होता.उषेच्या गालावर लाली पसरली होती.गोकुळ बेचैन होऊन श्रीकृष्णाचा पुकारा करत होते.यमुना नदीचा किनारा किनाराही श्रीकृष्णाला हाक मारीत होता.बागेतल्या कळ्याही श्रीकृष्णाला उठण्याचा इशारा करत होत्या.मैत्रीण राधाही पुन्हा श्रीकृष्णाला शोधण्यासाठी निघाली होती.
प्र. 4. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1. “तव गीत गात सारी ही पाखरे उडाली”
उत्तर :
संदर्भ : वरील कवितेची ओळ कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘चल ऊठ रे मुकुंदा‘ या कवितेतील आहेत.
स्पष्टीकरण: ही ओळ यशोदा मातेने झोपेत असलेल्या कृष्णाला उठविताना म्हटली आहे. पहाटवारा चोर पावलांनी येत होता.आकाशातील शुक्रतारा मंदावला होता.उषेच्या गालावर लाली पसरली होती.गोकुळ बेचैन होऊन श्रीकृष्णाचा पुकारा करत होते.तरी आता तुझ्या स्वप्नांचा पसारा आवर कारण तुझे गीत गात सारी पाखरेही उडून गेली आहेत असे सांगून यशोदा श्रीकृष्णाला उठवत आहे.
प्र6. जोड्या जुळवा
उत्तर – अ ब
1. चांदण्याला – जाग
2.शुक्रतारा – मंदावला
3.पहाटवारा – चोरपावलांनी
4. कालिंदीचा किनारा – हाक मारी
5. फुलांनी (कळ्यांनी) – इशारा केला
Sunil