दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित कर्नाटक शिक्षण
विभागाच्या आदेशानुसार 2021-22 सालातील कर्नाटक राज्य
अभ्यासक्रमाच्या शाळेत पहिली ते दहावी चे मौल्यांकन (परीक्षा) पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.
2021-22 या शैक्षणिक वर्षात कोविड 19 च्या परिणामाने शैक्षणिक कालावधी बदलला
असल्याने मिळणाऱ्या अवधीत अध्ययन अध्यापन कार्य चालू राहावे यासाठी मार्गदर्शन
होईल या उद्देशाने खालील वेळापत्रक व सुचना सांगण्यात आल्या आहेत.दिनांक 01/07/2021
पासून कर्नाटकातील सरकारी,अनुदानित व अनुदानरहित शाळेतून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने
अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरु आहे.या परिस्थितीतीत विद्यार्थ्यांचे शाळेकडून
निरंतर मूल्यमापन व्हावे या उद्देशाने पुढील वेळापत्रक देण्यात आले आहे.
2021-22 वर्षात शाळेतील परीक्षेसंबंधी
वेळापत्रक पुढीलप्रमाणे…फक्त याच वर्षासाठी 4 रुपणात्मक मूल्यमापन (FA) व 1 संकलनात्मक
मूल्यमापन (SA) घेण्यात यावे असे सांगितले आहे.
सूचना
1. कोविड -19 च्या प्रतिकूल परिस्थितीत शाळेत प्रत्यक्ष वर्ग
भरवण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने मुलांना पर्यायी माध्यमांद्वारे (दूरदर्शन, e संवेद,
रेडिओ कार्यक्रम, ऑनलाइन वर्ग, दूरध्वनी संप्रेषण आणि इतर ऑफलाइन चॅनेल) विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु
ठेवावे. शाळेने निरंतर मूल्यमापन सुरु ठेवून आपल्या शाळेतील कोणत्याही मुलाला
त्याच्या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये.
2. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मुल्यांकन कार्य करून त्याला
संबंधित दाखले विद्यार्थ्यांच्या कृती संपुट (CHILD PROFILE) मध्ये ठेवावे.
उदाहरणार्थ –शिक्षकांनी मुलांना दिलेल्या प्रश्नपत्रिका,ऑनलाईन परीक्षेचे गुण किंवा
ऑनलाईन अपलोड केलेल्या उत्तरपत्रिका यांच्या SOFT किंवा हार्ड कॉपी संग्रहित करून
ठेवणे.
3. खाली दिलेल्या वेळेत सर्व मुल्यांकन प्रक्रिया पार
पाडावी.जर कोणत्याही कारणास्तव एखादा विद्यार्थी गैर हजार असेल तर त्या मुलाने आदी
सोडवलेल्या प्रश्नपत्रिका,इतर कृती यांच्या आधारे त्याचे मुल्यांकन कार्य पूर्ण करणे.
4. शिक्षकांनी सर्व मूल्यांकनाचे वैयक्तिक व एकत्रित
रजिस्टर ठेवावे.
5. रुपणात्मक आणि संकलनात्मक मूल्यमापनच्या लेखी परीक्षा
घेताना कोविड -19 च्या सावधगिरीच्या उपायांचे पालन करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन
प्रश्नपत्रिका काढून त्याच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि मूल्यमापन करावे.
6. कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांच्या सुरक्षिततेच्या
अनुषंगाने भाग-बी मधील विषयांच्या लेखी किंवा प्रात्यक्षिक कृती राबवणे. याबाबत
सविस्तर परिपत्रक नंतर दिले जाईल.
7. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी तयार केलेले वैयक्तिक
गुणांचे रजिस्टर वेळोवेळी तपासून पहावे. तसेच शाळेचे एकत्रित मुल्यांकन रजिस्टर
तयार करून ते वेळोवेळी भारत आहेत का याची खात्री करून घ्यावी.
8. कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून इयत्ता 1 ते
10 वर्गांचे रुपणात्मक मूल्यांकन करताना मुलांचे गृहपाठ, सराव पेपर,
इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपक्रमांचा विचार करावा. विद्यार्थ्यांना
आपण दिलेले उपक्रम/प्रकल्प सोपे असावेत आणि ते उपक्रम करण्यासाठी मुलांनी
स्वेच्छेने त्यात भाग घ्यावा.तसेच या उपक्रमांचा पालकांवर आर्थिक भार पडणार यांची
दक्षता घ्यावी.
सरकारी आदेशासाठी येथे क्लिक करा. CLICK HERE
1 ली ते 8 वी साठी मुल्यांकन
वेळापत्रक –
विवरण | गुण | कृती घेण्याचा कालावधी |
सेतुबंध | – | जुलै 2021(पूर्ण महिना) |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 1 – (या | 15 | 06/09/2021 ते 08/09/2021 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 2 -(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये | 15 | 28/10/2021 ते 30/10/2021 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 3 – (या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये | 15 | 13/12/2021 ते 15/12/2021 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 4 -(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये | 15 | 27/01/2022 ते 29/01/2022 |
संकलनात्मक मूल्यमापन (SA) 1ली ते 5 वी 1ली ते 5 वी 10 गुण लेखी 6वी ते 8वी – | 40 | 11/04/2022 ते 20/04/2022 |
वार्षिक निकाल एकूण | 100 | 1 ली |
9वी व 10वी साठी मुल्यांकन
वेळापत्रक –
विवरण | गुण | कृती घेण्याचा कालावधी |
सेतुबंध | – | जुलै 2021(पूर्ण महिना) |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 1 ( 2 Activity [15 + 15 गुण ] ) ( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } ) एकूण 50 | 20 | 06/09/2021 ते 08/09/2021 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 2 ( 2 Activity [15 + 15 गुण ] ) ( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } ) एकूण 50 | 28/10/2021 ते 30/10/2021 | |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 3 ( 2 Activity [15 + 15 गुण ] ) ( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } ) एकूण 50 | 13/12/2021 ते 15/12/2021 | |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 4 ( 2 Activity [15 + 15 गुण ] ) ( 1 पेन,पेपर टेस्ट {20 गुण } ) एकूण 50 | 27/01/2022 ते 29/01/2022 | |
अंतर्गत मूल्यमापन – 9वी व 10वी वर्गांसाठी घेण्यात आलेले ५० | ||
संकलनात्मक मूल्यमापन (SA) इयत्ता नववी – 80 गुणांची लेखी वार्षिक इयत्ता – दहावी कर्नाटक माध्यमिक | 80 | 11/04/2022 ते 20/04/2022 |
वार्षिक निकाल एकूण | 100 | इयत्ता नववी वर्गाचा निकाल 30/04/2022 रोजी |
सरकारी आदेशासाठी येथे क्लिक करा. CLICK HERE