आठवी समाज विज्ञान
प्रश्नोत्तरे
भूगोल 1. पृथ्वी- आमचा सजीवांचा ग्रह
1 पृथ्वी या ग्रहास कोण कोणत्या नावाने ओळखतात ?
उत्तर – पृथ्वी या ग्रहास सजीव ग्रह,अद्वितीय ग्रह,जलग्रह,नील ग्रह या नावाने ओळखतात.
2 पृथ्वीवर सजीव सृष्टी का आहे?
उत्तर–कारण पृथ्वीचे सूर्यापासूनचे योग्य अंतर,तापमानाचा आवाका,जीवनावश्यक वायू वातावरण व जलचक्र यांच्यामुळे पृथ्वीवरती सजीव सृष्टी आहे.
3 खंड कशाला म्हणतात?
उत्तर –पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या तुकड्यांना खंड म्हणतात.
4 पृथ्वीवरील खंडांची नावे सांगा?
उत्तर -1.आशिया,
2.आफ्रिका
3.उत्तर अमेरिका
4.दक्षिण अमेरिका
5.अंटार्टिका
6.युरोप
7.ऑस्ट्रेलिया
5 पृथ्वीवरील प्रमुख महासागर कोणते?
उत्तर – 1. पॅसिफिक महासागर,
2. अटलांटिक महासागर,
3. हिंदी महासागर
4.. आर्क्टिक महासागर
हे चार प्रमुख महासागर होत.
6 पृथ्वीवरील दोन गोलार्ध कोणते?
उत्तर –जल गोलार्ध व भू गोलार्ध हे दोन पृथ्वीवरील गोलार्ध होत.
7 अक्षांश कशाला म्हणतात?
उत्तर –नकाशावरील किंवा पृथ्वी गोलावरील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षांश म्हणतात.
8 रेखांश कशाला म्हणतात
उत्तर- नकाशावरील किंवा पृथ्वी गोलावरील दक्षिण-उत्तर जाणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषांना रेखांश म्हणतात
9 पृथ्वीवरील प्रमुख अक्षवृत्ते कोणते?
उतर – 1.विषुववृत्त
,
2.कर्कवृत्त
3.मकरवृत्त
4.आर्क्टिक वृत्त
5.अंटार्टिका वृत्त ,
6.उत्तर ध्रुव वृत्त
7.दक्षिण ध्रुव वृत्त
ही प्रमुख अक्षवृत्ते होय
10 प्रमाणवेळ कशाला म्हणतात?
उत्तर –जेव्हा एखाद्या ठिकाणाची स्थानिक वेळ ही विस्तृत क्षेत्र असलेल्या संपूर्ण देशाची वेळ अशी मानली जाती तेंव्हा तिला त्या देशाचे प्रमाण वेळ म्हणतात.
रिकाम्या जागा
1 सूर्यमालेतील तिसरा क्रमांकाचा ग्रह पृथ्वी होय.
2 पृथ्वीचे एकूण क्षेत्र 510 मिली स्क्वेअर किलोमीटर आहे.
3 पृथ्वीच्या विषुववृत्तीय व्यास 12756 किलोमीटर आहे.
4 जगातील सर्वात मोठा खंड आशिया खंड.
5 जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड.
6 सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर होय.
7 सर्वात लहान महासागर आर्क्टिक महासागर होय.
8 पृथ्वीवर एकूण 180 अक्षवृत्ते आहेत.
9 पृथ्वी वर 360 रेखावृत्ते आहेत.
10 भारताची प्रमाणवेळ ही ,82 1/2 पूर्व रेखांशावर आधारित आहे.
11. पृथ्वीच्या आकाराला Geoid(गोलाकार) असे म्हणतात.