सातवी मराठी 2 . अभ्यास एक छंद




                                    

                            पाठ 2 – अभ्यास एक छंद

या पाठाच्या व्हिडिओसाठी येथे स्पर्श  करा.. CLICK HERE

लेखक परिचय –   पु.ल.देशपांडे 








पूर्ण नाव – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

टोपण नाव – पु.ल. , भाई 

जन्म – 8 नोव्हेंबर 1919

मृत्यू – 12 जून 2000

लेखन साहित्य – 

नाटके – सुंदर मी होणार, तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी इत्यादी नाटके.

व्यक्ति चित्रे – गणगोत,’व्यक्ती आणि वल्ली’, गुण गाईन आवडी 

प्रवास वर्णन – अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी 

एकपात्री प्रयोग  – बटाटयाची चाळ, वाऱ्यावरची वरात, ‘असा मी असा मी’ 

पुरस्कार – पद्मश्री सन्मान,महाराष्ट्र भूषण,साहित्य अकादमी,महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार,पद्मभूषण

नवीन शब्दार्थ – 

संवाद साधणे – चर्चा करणे 

रुक्ष – कंटाळवाणा

कानगोष्ट – गुपित सांगणे 

धूम ठोकणे – पळत सुटणे

छंद –  आवडीने केलेली कृती

अधाशासारखे – खादाडासारखे

भ्याडपणा – भित्रेपणा

हात पुढे करणे – मदत करणे, मैत्रीसाठी पुढाकार घेणे

अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. पुस्तकातील पाठांशी आपला संवाद केव्हा सुरू होईल ? 

उत्तर – जेंव्हा पाठातील माहिती म्हणजे कुणी तरी आपल्याशी केलेली कानगोष्ट आहे, कुणी आपल्याला आवडलेली माहिती खूप हौसेन देतो आहे.अशा भावनेने पुस्तक वाचू तेंव्हा पुस्तकातील पाठांशी आपला संवाद सुरू होईल.

2. पुस्तक मित्रासारखे केव्हा वाटेल ? 

उत्तर : जेंव्हा आपण कोणत्याही पुस्तकाच्या सहवासात असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि ते देखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आपण राहणार आहोत असे समजू तेंव्हा पुस्तक मित्रासारखे वाटेल.

3. अभ्यासाच्या सरावाची लेखकाने कशाशी तुलना केली आहे ? 

उत्तर:  अभ्यासाच्या सरावाची तुलना लेखकाने कोडी सोडविण्याशी केली आहे.कोडे सुटेपर्यंत कठीणच वाटत असते मात्र ते सुटत नाही म्हणून भ्याडपणाने ते अर्धवट सोडून देता येत नाही.अशाच प्रकारे अभ्यासाला न घाबरता सराव करत गेलात की अभ्यास ही सोपा होऊन जातो.

4. इंग्रजी विषयाशी दोस्ती केव्हा जमेल ? 

उत्तर : आपल्याला आवडत नाही किंवा अवघड वाटतो म्हणून इंग्रजी विषयाला टाळण्यापेक्षा इंग्रजी विषयाशी दोस्ती करा. इंग्रजी विषयाशी दोस्ती करायची असेल तर इंग्रजी भाषेतील शब्दांशी मैत्री जमवा.इंग्रजी भाषेतील एक एक शब्द गोळा करत गेलात की इंग्रजी विषयाशी दोस्ती जमेल.

5. अभ्यासाला एक छंद असे का म्हटले आहे ?

उत्तर : कारण कुणीतरी अभ्यास कर म्हणतय म्हणून किंवा परीक्षेत पास व्हायचे आहे.म्हणून अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाला एक छंद म्हणून जोपासले तर अवघड विषयही सोपे होतील व अभ्यासाची गोडी लागेल.म्हणून लेखकाने अभ्यासाला एक छंद असे म्हटले आहे.

6. परीक्षा हा आनंद सोहळा केव्हा होईल ?

उत्तर : जेंव्हा आपल्याला असलेल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांशी मैत्री होईल व अभ्यासाला छंद म्हणून जोपासू तेंव्हा परीक्षा हा आनंद सोहळा होईल. 






आ.वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1. कानगोष्टी करणे : गुपित सांगणे . 

माझ्या भावाने मला अभ्यास सोपा कसा करायचा याची कानगोष्ट सांगितली.

2. हातपाय गळणे: खूप भिती वाटणे 

माझ्या मित्राचा अपघात झाला हे ऐकताच माझे हातपाय गळाले.

3. हात पुढे करणे : काहीतरी मागणे 

माझ्या मित्राने माझ्याकडे पुस्तकासाठी हात पुढे केला.

इ. नमुन्याप्रमाणे लिहा.

नमुना : कवी – कविता

2. चित्रकार  – चित्र

3. शिल्पकार – शिल्प 

4. कादंबरीकार – कादंबरी

5. नकलाकार – नक्कल 

ई. फरक लिहा.

1. कोडी,कोंडी

उत्तर: कोडी म्हणजे आपण एकमेकांना घालतो ती कोडी

       कोंडी शब्दाचा आणखी एक अर्थ ‘दाटी’ असा होतो.

2. चिता चिंता

उत्तर: चिता म्हणजे मृत व्यक्तीला जाळण्यासाठी रचलेली लाकडे, 

         चिंता म्हणजे काळजी

3. तोड – तोंड

उत्तर: तोड म्हणजे एखाद्या वस्तूच्या तोलामोलाची दुसरी वस्तू नसणे तर 

        तोंड म्हणजे वदन, मुख 

4. नदी नंदी

उत्तर: नदी म्हणजे पाण्याचा प्रवाह 

तर नंदी म्हणजे शंकराच्या मंदीरात असतो तो बैल

उ. पाठाच्या आधारे वाक्य पूर्ण कर.

1. परीक्षेला पुस्तक नेमलय म्हणून वाचलं तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही.

2. पुस्तकाशी मैत्री केली तर ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल.

3. एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढं करणे.

4. इंग्रजीशी दोस्ती जमविण्याकरीता त्या भाषेतील शब्दांशी मैत्री जमवा. 

ऊ – कंसातील योग्य विशेषण वापरून मोकळ्या जागा भर. 

(पांढराशुभ्र, निळाभोर, हिरवीगार, काळेकुट्ट, पिवळीजर्द)

1. पिंपळाची हिरवीगार पाने सळसळत होती. 

2. बागेत शेवंतीची पिवळीजर्द फुले फुलली आहेत.

3. दारात जाईजुईचा पांढराशुभ्र सडा पडला होता.

4. निळ्याभोर तलावात कमळे फुलली होती.

5. आकाशात काळेकुट्ट ढग जमले होते.

ए. “माझा आवडता छंद” या विषयावर 10 वाक्ये लिहा. 


ऐ. विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. थोर x लहान 

2. आरंभ x शेवट

4. सुसंवाद x  वादविवाद 

 5. आनंद x दुःख

ओ. लिंग बदल करून शब्द लिहा.

1. कवी  – कवयित्री    

2. लेखक – लेखिका   

3. वक्ता – वक्त्या 


 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *