सेतूबंध म्हणजे काय?
सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.
सेतुबंध कधी करता येईल?
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कौशल्ये वाढवण्यासाठी सेतुबंध –
शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला दीर्घ सुट्टीतून शाळेत परत आलेल्या विद्यार्थ्यामध्ये पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये किती अवघड आहेत?कोणती कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत? पुढील अध्ययनांशास पूरक सामर्थ्ये कोणकोणती?
हे सर्व लक्षात घेऊन या आधी आत्मसात केलेल्या क्षमतांना पुढे आत्मसात करण्यास आवश्यक असलेल्या क्षमतांमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे सेतुबंध.
सेतुबंध का करावा? (Importance of bridge course)
इयत्ता – तिसरी
सेतुबंध साफल्य परीक्षा
विषय– मराठी
नमुना प्रश्नपत्रिका
तोंडी परीक्षा
1) तू ऐकलेली एखादी कथा सांग.
2) तुझ्या घरात कोण कोण आहेत? त्याबद्दल सांग.
3)तू शिकलेली एखादी कविता सुरात म्हण.
4) तुझ्या आवडीची कविता अभिनयासहित सुरात गा.
5) चित्र पाहून चित्रातील वस्तू ओळख व त्यांच्या बद्द्ल थोडक्यात माहिती सांग.
प्रात्यक्षिक परीक्षा
6) तक्त्यातील चित्रे पाहून क्रमवार घडलेली घटना गोष्टरुपात सांग.(चित्रांचा तक्ता तयार करून घेऊन संदर्भ दर्शविणे.)
7)वाक्य ऐकून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांग. ( एखादा संदर्भ ऐकवून त्यावर आधारित प्रश्न विचारून घेणे) उदा.मोर थुईथुई नाचतो.
प्रश्न -1) कोण नाचतो?
2)मोर कसा नाचतो?
8) चौकटीतील शब्द वाच.
ऐटदार |
दयानंद |
9)खालील अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द सांग.
(अक्षर पट्ट्या दाखवून कृती करून घेणे)
उदा.1) ट पु शे
2)व पं डा ल
10) फळ्यावरील वाक्य पाहून जसेच्या तसे पाटीवर लिही .(एखादे वाक्य लिहून त्याचे अनुलेखन करुन घेणे.)
उदा.1) गुरुजनांचा आदर करावा.
2) झाडे लावा, झाडे जगवा.